Monday, April 12, 2010

Ek Tarfi Prem Kavita : होता एक वेडा मुलगा

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
तिची आठवण आल्यावर कविता करत बसायचा..
 कधी तिच्या केसांत फ़िदा, कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा, तर कधी गालवर गोड हसू आणायचा…
 नेहमी काहीना काही उपमा द्याचा, आज परी तर उद्या सरी……….!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा
 पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
 कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा
 कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून खुप गोड हसायची…………!
 पण कवीता तिला कधीच समजली नव्हती कारण प्रेम फक्त तोच करायचा………….!
आज नाही त्याच्या आयुषात ती तरी कवीता करतोय………..!
एक आठवण म्हणुन, एक समाधान म्हणुन,
 होता एक वेडा मुलगा,
 तिच्यावर खुप प्रेम करायचा, अगदी माझ्यासारखा..

No comments: