ती दिसली.....
भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....
तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....
तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या.....
खुप काही म्हणायच होता,
शब्द माझे आतुरलेले मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....
म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....
तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....
कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....
इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....
नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची रेशम गाठी तुटल्या आमच्या,
तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....

No comments:
Post a Comment