Monday, April 12, 2010

आज वेळ नाही | Marathi Prem Kavita on Life | Sad Life Poems in Marathi Fonts

आज वेळ नाही....
अमाप सुख आहे सगळ्यान्च्याच पदरात
पण ते अनुभवयला आज वेळ नाही.....
आईच्या अन्गाईची जाणिव आहे
पण आईला आज 'आई' म्हणायलाच वेळ नाही.....
सगळी नाती संपवुन झालीत
पण आज त्या नात्यान्ना पुरायलाही आज वेळ नाही.....
सगळ्यान्ची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत
पण प्रेमाचे चार शब्द बोलायलाही आज वेळ नाही.....
ज्या पोराबाळान्साठी मेहनत दिवस-रात्र करतात
त्यान्च्याकडे क्षणभर बघायलाही आज वेळ नाही....
सान्गेल कोण कशाला दुस-याबद्द्ल
 जेव्हा ईथे स्वतःकडेच बघायला वेळ नाही......
डोळ्यावर आलीये खुप झोप
पण आज कोणाकडे झोपयलाही वेळ नाही.....
ह्रुदयात वेदनान्चा पुर वाहतोय
पण त्या आठवुन रडायलाही वेळ नाही....
परक्यान्ची जाणिव कशी असेल
जर ईथे आपल्याच माणसान्साठि वेळ नाही...
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या या संघर्षात जरा माग वळुन पहायलाही वेळ नाही........
अरे जीवना तुच सान्ग जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत जगायलाच आज वेळ का नाही?

No comments: