Monday, April 26, 2010

मैत्री म्हणजे विश्वास

मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे अभिमान मैत्री म्हणजे जीवनातील जगण्याचा स्वाभीमान मैत्री म्हणजे प्रेम मैत्री म्हणजे जाणीव मैत्री शिवाय जीवनात आधाराची उणीव मैत्री म्हणजे विश्व मैत्री म्हणजे आकाश मैत्री म्हणजे तिमिरात वाट दावणारा प्रकाश मैत्री म्हणजे सुख दु:ख मैत्री म्हणजे हर्श मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा हळुवार स्पर्श मैत्री म्हणजे रान मैत्री म्हणजे कोवळे उन मैत्री म्हणजे जीव जडणारी सुमधुर वार्याची धुन मैत्री म्हणजे खेड मैत्री म्हणजे पायवाट मैत्री म्हणजे पिकाला पाणी पाजणारा मळ्यातील पाट मैत्री म्हणजे तेज मैत्री म्हणजे तारा मैत्री म्हणजे प्रत्येकाला हवा असणारा मोहक वारा मैत्री म्हणजे दिलेला शब्द मैत्री म्हणजे आन मैत्री म्हणजे घातलेली शपथ मैत्री म्हणजे प्राण मैत्री म्हणजे ओढ मैत्री म्हणजे आठवण मैत्री म्हणजे आयुश्यातील न सम्पणारी साठवण मैत्री म्हणजे मस्करी मैत्री म्हण्जे राग तरीही आपल्या जीवनातील हा एक अविभाज्य भाग.

मैत्री म्हणजे सुंदर पहाट

मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट.. आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.. फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ.. मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा अन् जणू दरवळणारा मारवा अंगावर घ्यावा असा राघवशेला एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला... ऍकत रहावी अशी हरीची बासरी अस्मानीची असावी जशी एक परी... मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी दु:खावरची हळुवार जादूची झप्पी मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात

मैत्री हा असा एक धागा,

मैत्री हा असा एक धागा, जो रक्ताची नातीच काय पण परक्यालाही खेचून आणतो आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो. मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर काहीजण मैत्री कशी करतात? उबेसाठी शेकोटी पेटवतात अन जणू शेकोटीची कसोटी पहातात. स्वार्थासाठी मैत्री करतात अन कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात. शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय? दोन्हीपण एकच जाणवतात. मैत्री करणारे खूप भेटतील परंतू निभावणारे कमी असतील मग सांगा, खरे मित्र कसे असतील? कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो? नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं जीवनाला खरा अर्थ समजावणारं अशी असते ती मैत्री .....

कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,

कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते, गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते.... गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते, तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते.... अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात, चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात.... आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी, चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी........

Friday, April 23, 2010

परत येशील ना ग तू??

परत येशील ना ग तू?? हसतेस एवढी छान की... हसत रहायला शिकवलेस तू... बोलतेस एवढी की... बोलत रहायला शिकवलेस तू.... लाजतेस एवढी छान की... मला आवडायला लागलीस तू.. जीव एवढा लावलास की.. प्रेम करायला लावलेस तू... किती प्रेम करतेस तू?? एवढ प्रेम नको ना करूस... मग काय झाल अचानक?? सोडून का गेलीस तू?? गेलीस तर गेलीस .. पण तुला विसरु कस?? हे शिकवायला विसरलीस बघ तू!! ए!! ते शिकवायला तरी परत येशील ना ग तू??

Thursday, April 22, 2010

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो.............

मी हि कधी कुणाच्या प्रेमात होतो
माझ्यावरहि कुणाचं नियंत्रण असायचं
नकळत का होईना मी हि हरवून जायचो
कधी कधी तर वेळेचाहि भान विसरून जायचो

दिवसभराच्या कामात एकदा तरी फोने करायचो
हळूच का होईना पण "I Love U" म्हणायचो
नाहीच Phone तर Miss Call तरी द्यायचो
रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ
पण मी मात्र SMS -SMS खेळत राहायचो

Weekends ला कधी MALL मध्ये जायचो
खूप Try केल्यावर तिचा हाथ पकडायचो
ओठातून काही शब्दच निघेनात
फक्त चेहर्याकडे बघून Blush करायचो

सगळंच आता भूतकाळात विरून गेलं
माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं
जाता जाता मला खूप वेदना दिल्या
पण माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं
जाता जाता खूप काही शिकवून गेलं

किती तरी नाती आपण गृहीत धरतो
त्यांचं अस्तित्वच आपण Assume करतो
समजत नाही कधी मोल नात्यांचं
आणि मग दुख करतो ते दुरावल्याचं

आज खरंच समाधान वाटतंय
कि मी हि कधी प्रेम केलं होतं
खरंच माझं प्रेम व्यर्थ न्हवतं
जाता जाता मला जगण्याच्या जवळ घेऊन गेलं.


वाच्ानात आलेलि कविता..........

Wednesday, April 21, 2010

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....
 मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून जातात....
तिला कळतच नाही
 तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून जाते...
 क्षुब्ध होऊन चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
 मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब आठवतो
 पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत नाही
बोलणच काय, तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
 मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच फुकट जातं
 काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत नाही
माझं मन तिच्याशिवाय काहिसुद्धा मागत नाही
 ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते पण
तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
 तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच स्वाधीन करायचं ...

Tuesday, April 20, 2010

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते

तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते, तर हे प्रेम नाही हा तर मोह.....! तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही, तर हे प्रेम नाही ही तर वासना....! तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल, तर हे प्रेम नाही ही तर तडजोड...! तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात, तर हे प्रेम नाही ही तर मैत्री...! जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो..., तर ते आहे प्रेम....! जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता...., तर ते आहे प्रेम....! जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता...., तर ते आहे प्रेम....! जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल...., तर ते आहे प्रेम....!

आयुष्य म्हणजे कटकट..

आयुष्य म्हणजे कटकट.. जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं आयुष्य म्हणजे वणवा.... इथे वेदनांना घेउन जळावं लागत पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं आयुष्य म्हणजे अंधार... इथे काळोखात बुडाव लागतं परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं आयुष्य म्हणजे पाऊस.... आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं पण ...आयुष्य हे असेच का ? मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत. आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

आयुष्यात पुढे सरकत राहा

आयुष्यात पुढे सरकत राहा मित्र मित्र म्हणता म्हणता मैत्री होते मैत्री मैत्री म्हणता म्हणता नाते जुळते अशी अनेक म्हणता म्हणता नाती जुळतात अनेक नात्यांतून असे ऋणानुबंध निर्माण होतात हात हवा असतो प्रत्येकाला प्रत्येकाचा साथ हवी असते प्रत्येकाला प्रत्येकाची पण जेव्हा तो हात नकोसा होतो तेव्हा नकोशी होते ती साथ त्या साथीदाराची नाती जोडता जुळवता प्रेम जडते साय्रा जगाला सोडून प्रीती ह्रुदयात दडते तुटतात जेव्हा ही नाती,ती जुळवणे होते कठिण तुकडे होतात जेव्हा त्या ह्रुदयाचे,त्याला जोडणे होते कठिण आत्मविश्वास असतो एकमेकांना एकमेकांवर अनेकांना आपल्या आणि आपल्यांवर जेव्हा उठतो तो विश्वास स्वत:च्याच आत्म्यावरूनच नाही उरत कोणी आपले नाही उरत कोणी कोणाचे आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात अनेक प्रसंग अनुभवत असतो तो अनेक अनुभव येता जाता अनेक वाईट असतात थोडेसे चांगले असतात असाच काहीतरी म्हणे माणूस घडत असतो

जॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं,

जॆ घडॆल तॆ सहन करायचं असतं, बदलत्या जगाबरॊबर बदलायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं. कु‍ठून सुरू झालं हॆ माहित नसलं, तरी कुठेतरी थांबायचं असतं आयुष्य असचं जगायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणॆ करायचं असतं, स्वतःच्या सुखापॆक्षा इतरांना सुखवायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं. दुःख आणि अश्रुंना मनात कॊडुन ठेवायचं असतं, हसता नाहि आलं तरी हसवायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं. पंखामध्यॆ बळ आल्यावर घरटं सोडायचं असतं, आकाशात झॆपाहुनही धरतीला विसरायचं नसतं, आयुष्य असचं जगायचं असतं. मरणानं समॊर यॆऊन जीव जरी मागितला, तरी मागून मागून काय मागितलस? असचं म्हनायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं. इच्छा असॆल नसॆल तरी जन्मभर जगायचं असतं, पण जग सोडताना मात्र समाधानानॆ जायचं असतं, आयुष्य असचं जगायचं असतं.

Saturday, April 17, 2010

कधी कधी येते का ग माझी आठवण....

कधी कधी येते का ग माझी आठवण................ आठवणी त्या गेल्या वाहून का तुझ्या ग अश्रू मधून कि आठवतो पुसट पुसट चेहरा माझा अजून कधी कधी येते का ग माझी आठवण................ आठवतात का तुला कधी ते क्षण................... घालवले जे सोबत आपण त्या क्षणांची ग आणि घालवू शकलो नाही क्षण जे सोबत कधी कधी येते का ग माझी आठवण................ आठवतात का तुला कधी ते क्षण................... पुढ्यात ताट आणि मनात येतो का माझा विचार विचारात त्या लक्ष न लागे कधी मग जेवणावर जेवताना ग कधी तो घास अडे का ओठांवर आणि डोळ्यातून वाहते का ग अश्रूंची धार कधी कधी येते का ग माझी आठवण................ आठवतात का तुला कधी ते क्षण................... फिरता फिरता थांबतेस का कधी त्या जागी येऊन ज्या ठिकाणी कधी भेटायचो आपण लपून छपून कधी प्रेम तर कधी भांडण आपली अधून मधून तुझी नजर चहू ओर कोणी बघेल म्हणून कधी कधी येते का ग माझी आठवण................ आठवतात का तुला कधी ते क्षण...................

माझे मलाच कळत नाही, का असं होतं??

माझे मलाच कळत नाही, का असं होतं?? तू समोर आलीस की, काहीच सुचत नाही.. आणि जातेस दूर जेव्हा.. स्वताशीच बोलणे माझे काही केल्या थांबत नाही!! खरंच गं...का असं होत?? कधी,कधी मी तुझ्यावर खुप चिडतो खुप रागवायचे तुला ...असे मनात् ठरवतो त्यासाठी डोळ्यात प्राण् आणि डोक्यात राख घालून तुझी वाट पाहतो... आणि येतेस जेव्हा तु... सारे काही विसरुन मीच्,"सॉरी!" म्हणतो!!! खरंच सांग ना.. का असं होतं?? तुझा निरोप घेऊन परत येताना...दिवस ढळत आलेला असतो.. त्यावेळी खुप वाटंत की तुझे आणि माझे एक घरटे असावे पण हा विचार मी करत नसतो... कारण बसचा टाईम होत असतो खरंच मला कळत नाही..का असं होतं??? कधी,कधी खुप काही ,बोलावंस वाटतं तुझ्याशी.. पण समोर नसतेस तु..तेव्हाच मी पेन हाताशी घेतो आणि चार ओळी लिहुन काढतो.. चार म्हणता म्हणता खुपकाही लिहुन होतं वेडे मन माझे त्यालाच कविता म्हणतं खरंच कळले नाही मला...का असं होतं?? तसा मी हुशार आहे गं... पण हे कोडे काही केल्या सुटत नाही... वेड्या मनाला माझ्या दुरावा तुझा पटत नाही खरंच कळले नाही मला...का असं होतं??

Marathi Virah Kavita : चुकलंच.. पण कुणाचं ?

कधी कधी माझं मन मला खायला उठतं,
 मी तिला असं दुःखवायला नको होतं…
 हां, झालं असेल काही उलटं सुलटं,
 कदाचित ते तिच्या मनात नसेल सुद्धा..!!
 मी कधी याचा विचारच का केला नाही?
 आत्ताच का डोकं खायला लागलाय हा मुद्दा..??
 पण तरीही ती माझीच होती, कमीतकमी त्या क्षणापर्यंत तरी..!!
 झालं गेलं विसरून जां !!
असं म्हणायला पाहिजे होतं, पण कुणी?,
मी नाही म्हटलं… तिनं तरी??
 तिला काय वाटत असेल आत्ता?
 जे घडलं त्या दिवशी, याचा ती विचार करत असेल का…? 
शेवटी मान्य करुन चूक तिनं केली घोडचूक …पण, मी काय करू? काय नको ? …
असं मलाच कोड्यात टाकलं .. ते का?
 मी काहीच बोललो नाही. बोलायचं होतं, पण शब्दच फुटले नाही..
 बस्स.. डोळ्यात डोळे घालून बघत राहिलो, पण कदाचित म्हणूनच ती तिथं थांबली सुद्धा नाही..!!
 शेवटचा निर्णय तिचाच होता , त्यावर तरी मी काहीतरी बोलायला हवं होतं, दुःखवायचं होतं तिला, म्हणून चूप राहिलो,
पण.. आत्ता वाटतं.. मी तिला असं दुःखवायला नको होतं…
 मी तिला असं दुःखवायला नको होतं…….

Thursday, April 15, 2010

Marathi Prem Kavita : पहिली मैत्री..... पहिलं प्रेम..!

नकळत तुझं मित्रत्व मी जेव्हा हसून स्वीकारलं होतं माझ्या भावनांचं विश्व तेव्हाच विस्तारलं होतं.
  तुला रोज बघणं आयुष्यातली एक सवय बनत गेली.
 तुझ्या फोनची वाट पाहण्यात संध्याकाळ माझी विरत.
 गेली तू समोर आल्यावर शब्द सारेच पळून जायचे .
तू गेल्यावर मग मात्र काय काय सांगायचं होतं याची आठवण करून द्यायचे .
 तुझ्या पहिल्याच हास्यात मी पूर्णपणे डूबायचे आणि आपल्या मैत्रीच्या वेलीला आणखीनच जपायचे.
  मैत्री एवढी सुंदर असते हे तुझ्या रूपाने जाणवलं .
मनाला मोहवणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्या वेळी तुझंच रूप दिसलं.
  धबधब्यासारखे दिवस वाहत राहिले असताना तुझ्या सहवासात मैत्री नकळत मागे पडली
आणि एक प्रेमांकुर उमलला मनात .
स्वभाव तुझा मी रोज पडताळून बघायचे.
 रोजच्या बोलण्यात मात्र नवीनच अनुमान निघायचे.
  तू दिसला नाहीस कधी तर मेघ डोळ्यात उतरायचे
 आणि घरी परत जाताना मला चिंब भिजवायचे.
  परत दुसऱ्या दिवशी तू त्याच गोड चेहऱ्याने हजर सगळं विसरून पुन्हा तुला बघायला आतुर असायची नजर.  पण सुखाची चाहूल दुःख घेतं तसंच काहीसं झालं मैत्री
आणि प्रेम मिश्रित हे नातं एका गैरसमजामुळे विरत गेलं.
  कदाचित चूक नव्हती दोघांचीही ,पण जिद्द होती ना, आपापला इगो मिरवण्याची मनातली ठसठस जेव्हा खूपच तीव्र झाली,
मैत्रीने एक पाउल पुढे टाकलं ,आणि मी माघार घेतली हो , मी माघार घेतली
 आणि इगो सोडून दिला कारण तू दिलेल्या दुःखापेक्षा मला तू स्वतः जास्त मोलाचा वाटला
 तू सुद्धा मनातलं किल्मिष काढून टाकलस आणि हसून मी तुझ्या सोबत आहे , हे दाखवून दिलंस ....
 आता तू असतोस सोबत म्हणून मी स्वतःवरच खुश असते
 रोजचीच संध्याकाळ आता अजूनच छान दिसते
 वाटतं एकदा सांगून टाकावं मनातलं गुपित सारं ,
दुसरयाच क्षणी जाणवतं समजल्यावर सगळं तू अजूनच दूर गेलास तर ?
 मला माहित आहे रे , तुझ्या पसंतीत मी कुठेच बसत नाही ,
पण काय करू , मन असं धावतं कि थांबतच नाही
 एकदा हो म्हणून तर बघ , तुझ्यासाठी पूर्णपणे स्वताला बदलेन, तुझ्या वाटेतले काटे पापण्यांनी उचलून फक्त फुलंच त्यावर पसरेन,
 मला तुला आयुष्यात खूप सुखी झालेलं बघायचंय
रात्री झोपशील ना जेव्हा, तेव्हा तुझ्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हसू , हळूच डोळ्यांनी टिपायचय.

Wednesday, April 14, 2010

प्रेम करतो तुझ्यावर...

प्रेम करतो तुझ्यावर... तू पण माझ्यावर करशील ना...? मी विचारलेल्या प्रश्नाचं.... होकारात उत्तर देशील ना...? स्वप्न पूर्ण करताना.. हात तुझा देशील ना...? नको करूस प्रेम.... मैत्री तरी करशील ना...? मैत्री नुसती करू नकोस... शेवट पर्यंत निभावशील ना...? मैत्री कधी तोडू नकोस.. ह्या वेड्याचा जिव जाईल ना...!! मैत्री तोडल्यावर.. मला विसरणार तर नाहीस ना...? कधी चुकून भेटलो तर.... नुसती ओळख तरी देशील ना..? मी मेल्यानंतर.... दोन थेम्ब अश्रु तरी काढशील ना...? - मोहित

Monday, April 12, 2010

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही..

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही.. प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही… का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवन हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण… मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही पण तिच्या शिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही… रात्री छान च असतात … तिच्या स्वप्नानी भरलेल्या देऊन जातात उभारी … मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला… प्रेम कधी सफल होते तर कधी नाही… ते जीवनात कधी ही सब कूच नसत पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असत… प्रेमाचे हे कोड कदाचित कधी च कुणाला उलगडणार नाही … पण त्या साठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं

कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं, कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं

बघ तिला सांगुन

बघ तिला सांगुन कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात. कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात. कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही असेच काही ‘दुसरी’ कडेही होत असेल… शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच… म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन ! किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन “थॅंक्स!” म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून ! तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन म्हणूनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगून !

गुलाब सांगतो,

गुलाब सांगतो, येता जाता रडायच नसत, काट्यात सुद्धा हसायच असत... रात राणी म्हणते, अंधाराला घाबरायच नसत, काळ-ओखात ही फुलायाच असत... सदाफुली सांगते, रुसून रुसून रहायच नसत, हसून हसून हसायच असत... बकुळी म्हणते, सावळ्या रंगाने हिरमुसायाचे नसते, गुणाच्या गंधाने जिंकायचे असते... मोगरा म्हणतो, स्वतःचा बडेजावपणा सांगायचा नसतो, सदगुनांचा सुगंध मैलावरून ही येतो... कमळ म्हणतो, संकटात चिखलात बुडायच नसत, संकटांना बुडवून फुलायाच असत...

जगातलं सर्वात महत्वाचं नातं मैत्रीचं...

जगातलं सर्वात महत्वाचं नातं मैत्रीचं... कारण हे एकमेव नातं असं आहे की, तिथे हुकुमशाही नसते. मालकीची भावना नसते; तर जीवनाचा सुर असतो. हुकुमाशाहिचा सुर उमटला की, जाणावं वाद होणार आहेत... मैत्रीचं नातं फक्त मनातूनच फुलतं.... श्वासाइतकच महत्त्व मैत्रीचं असतं... त्याला कुठलंच बंधन नसतं. ते फक्त जीवाची ओढ लावतं ... सगळया भावना समजून उमजतं, श्वासाइतकच महत्त्व मैत्रीचं असतं... मैत्री मोर पिसाऱ्या सारखी फुलवयाची असते... मैत्री कधीच पाटी वरच्या अक्षरांसारखी पुसायची नसते... मैत्री एखाद्या दवबिंदुप्रमाणे असते. सुर्याच्या कोवळया उन्हात चमकते; पण संशयाची थोडीशी जरी झुळूक आली तरी ती नष्ट होते, म्हणुनच एक वेळ सर्व जग जिंकण सहज शक्य आहे; पण मन जिंकण अत्यंत कठीण आहे...

विसर मला कायमच.......

विसर मला कायमच.......
तु विसर मला कायमच.......
पण-
"मी तुला विसरलो"
अस कधीही म्हणु नकोस...


तु कधीच वाचु नकोस
माझी कुठलीही कविता
पण म्हण-
मी वाचेल तुझी कविता कधीतरी...


तु कधीच स्वीकारु नकोस
माझ्या या खऱ्याखुऱ्या प्रेमाला
पण.. "तुझं प्रेम खर आहे रे"
एवढं तरी म्हण...


तु कधीच देऊ नकोस
मला फ़ुलांचा गुछ
पण- एखादं गुलाबाचं फुल तरी
ठेवुन जा गं या माझ्या हातावर.....


तु कधी लक्षही देवु नकोस
मला होणाऱ्या यातनांकडे...
तु कधी रडुही नकोस
माझ्यासाठी.......


पण जाता जाता
अंत्यदर्शनाला ठेवलेल्या त्या माझ्या प्रेताला
एकदा , फक्त्त एकदा घट्ट कवटाळ
आणि म्हण- आपल ........

सागरी मीठीत हळुच शिरले किनारे

सागरी मीठीत हळुच शिरले किनारे आसवे गाळून परत फ़िरले किनारे. आयुष्यात एकरुप असुन सागराशी दुष्ट लाटांनी हसत उधळले किनारे. मीठ चोळूनी हळूच लहर फ़ीरली ती शेवटी कीचांळत तडफ़डले किनारे. वादळाच्या मीठित जणु उरलाच वारा सागरा घेऊन कुशित निजले किनारे. साउलीसाठी जिव गुदमरला उन्हांत संपण्याआधीच जिव हरले किनारे. आज येऊदे प्रलय अचल मी उरेन ठोकुन छाती मग गडगडले कीनारे. पापण्यांती घेउन जखम जगी जगलो निवडूंगा पाहुन कुजबुजले किनारे. लाट वेडी, गेली अलगद स्पर्शुन, शोधिता ठसे गहिवरले किनारे, ....... क्षणभंगुर प्रेमाचे शव घेउन आली लाट, क्षणभर रडले आणि थिजले किनारे, ....

Marathi Emotional Kavita : चार दिवसांचा खेळ

जाताना एक पक्षी सांगत होता झाडाला,
 मी परतुन येणार नाही सावर स्वताला.
 " तु मला आश्रय दिला, माझ्यावर मायेचा वर्षाव केला.
आलेल्या संकटांपासून वाचवले, तेव्हाच माझ्या डोळ्यातील आश्रु तु तुझ्या मनात साठवले."
 " पण............. आता मी कधीच येणार नाही परत,
तु हि बसू नको माझी आठवण काढत."
 त्याच वेळी झाड होत विचार हा करत , गेलेली माणस कधीच येत नाही का परत ?
 चार दिवसांचा खेळ मांडून, पटकन उडून जातात.
 चार क्षणांचा मेळ घालून, आठवण ठेवून जातात.
आपल्यापासुन दुर जाऊन आपल्या मनात वावरत असतात.
आपल्या मनात वावरतांना, आश्रुंद्वारे प्रकट होत असतात.
जगण्याच धैर्य देवून, पुन्हा दुर निघुन जातात.
 काहीतरी आठवण ठेऊन, मनात साठुन राहतात.
 आठवण त्यांची काढताक्षणी, आश्रु डोळ्यात उभे राहतात.
शब्द सगळे आठवून पुन्हा, जगण्याच धैर्य देतात.
 झाडच हे बोलन ऐकून, पक्षी दुर उडून जातात.
 झाड मात्र त्यांच्या पाठमोऱ्या सावल्यांकडे, स्तब्द मनाने निशब्द होऊन पाहत राहतात.
 पुन्हा त्या आठवणी काढून, स्वतातला अश्रूंच्या पावसात भिजवून घेतात.

Marathi Maitri Kavita (Marathi Friendship Poem) : मित्र मोठे होऊ लागलेत

मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
कामाच्या एस एम् एस शिवाय एकही विनोदी एस एम् एस येत नाही.
मित्रांच्या कॉल साठी आता मीटिंग ही मोड़ता येत नाही.
 बहुतेक कामाचा व्यापच आता सर्व जागा व्यापयाला लागलाय.

 मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
 फालतू विनोदावर ही हसण्याची सवय आता मोडायला लागलीये,
 चेष्टेने केलेली ही चेष्टा आजकाल भुरातीगिरी वाटायला लागलीये .
आणि वाटतय की आजकाल धिंगाना ही कमी होऊ लागलाय.

 मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
 पूर्वी वेळ सर्वांसाठी असायचा आता स्वत साठीचा वेळ वाढायला लागलाय.
 पजेशनचा वेळ येइल तसा रूम मधील कालवा दडायला लागलाय.
 ट्रिप चा रविवार आता नविन जोडीदार शोधण्यात जाऊ लागलाय .

मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!
 मान्य आहे स्वतसाठीही जीवन जगायच असत, मग त्यासाठी कुणाला खरच दुखवयाचे असत
पण हे मात्र खर आहे की मित्राबरोबर मैत्रीचा अभिमानही वाढू लागलाय .
मित्र मोठे होऊ लागलेत आणि थोडा दुरावा जाणवायला लागलाय..!

Marathi Miss You Kavita (Athavan) : वेळ असेल तुला तर

वेळ असेल तुला तर एकदा मला भेटशील का?
 दोन शब्द बोलायच होत थोड ऐकून घेशील का?
 पहिला तू माझ्याशी खुप काही बोलाय्चास,
 वेळ नसला तरी माझ्यासाठी खुप वेळ काढ़ाय्चास,
 तासन तास माझ्याशी खुप गप्पा मारायचास,
 नसले विषय तरी नविन विषय काढ़ायाचास,
 काही ही बोलूंन मला खुप खुप हसवाय्चास,
 माझा फ़ोन एंगेज असला की खुप खुप रागवाय्चास ,
दिवस भर माझ्याशी कट्टी फू करायचास ,
आता कशाला आमची गरज पडेल अस सारख चिडवाय्चास,
 माझा चेहरा पडला तर खुप नाराज होय्चास,
 हळूच जवळ घेउन सॉरी बोलायचास,
 आज ही मला तुझा सारखा होतो भास् ,
कारे असा वागतोस का देतोस त्रास ?
नाही पुन्हा भेटणार एकदा बंद पडल्यावर श्वास,
 एकदाच भेट मला पुन्हा नाही देणार त्रास..

Marathi Kavita On Life : आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय?

आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय?
 स्वत:हून ठरावित जगत जाण की........ दैवाने लिहलेल्या पुस्तकाची पाने उलगड़णे.
दूधावरच्या सायेसारखी कधी सूखे उपभोगणे... तर कधी ताकावरच मन भागवण.

आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय?
नागमोडी वाटेवर सुद्धा सरळ चालत जाण..की सरळ वाटेवर उगाचच वळण घेण.
 माणसाच्या जन्मात येउन सुद्धा माणूस म्हणुन न जगण....की स्पर्धेच्या ह्या युगात रोबोट बनुन आपल अस्तित्व टिकवण.

आयुष्य आयुष्य म्हणजे तरी काय?
फ़क्त शेवट येण्याची वाट बघण....की मृत्युलाही आपल्या डोळ्यात पाणी आणायला लावण....!

Marathi Maitri Kavita Poem : तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपित लपलय

तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपित लपलय.
 तुझ्या माझ्या मैत्रीने फकत आपलेपण जपलंय .
नात्यांचे स्नेह बांध कोण शोधत बसलय.
 जीवा पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलय .
दरवलनारया सुगंधाला कोणी कैद केलय.
 तुझ्या माझ्या मैत्रीने सार जग व्यापलय.

Marathi Poems For Those who are Single : जोडीदार

आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!
 एकमेकांना, दिलेल्या दुःखांवर एकमेकांसोबत, घालवलेल्या अनेक आनंदी क्षणांचा, लेप लावण्यासाठी.. आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!
 अनेक जुन्या, आठवणींनी आणलेले एकमेकांच्या, डोळ्यातील आनंदाश्रु पुसण्यासाठी…..
 आयुष्यात एक तरी जोडीदार हवाच!
 आयुष्यात पुढे येणारया, अनेक दुःखी क्षणांच्या वेळी एकमेकांच्या हातात, चेहरा लपवून मनसोक्त रडण्यासाठी!
 आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच! प्रत्येक दुःखी, क्षणानंतर येणारया आनंदी क्षणात एकमेकांचा, हात धरण्यासाठी एकमेकाला, सावरण्यासाठी…………
 आयुष्यात एक तरी, जोडीदार हवाच!

Marathi Breakup Kavita : जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील तुला माझी आठवण होईल ,
तुझ्याही डोळ्यांत तेव्हा माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल,
  आठवणी जेव्हा माझ्या तुला एकांतात कवटाळतील,
तुझ्याही नजरा तेव्हा माझ्या शोधात सैरावैरा पळतील.
  जेव्हा त्याला प्रेमाने बघशील तेव्हा तुला मी दिसेन...
त्याला शोधणा‍-या तुझ्या नजरेत तेव्हा फक्त मी असेन...
 तेव्हा तुला माझे शब्द पटतील. तुझ्याही नजरेत तेव्हा माझ्यासाठी अश्रू दाटतील...
 माझ्यासाठी रडणारे ते अश्रू तेव्हा तुझ्यावरच हसतील,
 कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना ते ऒठ तेव्हा माझे नसतील...!!!

Marathi Prem Kavita : होउन गारवा आयुष्यात ती आली

होउन गारवा आयुष्यात ती आली
घेउन सुखांची बरसात ती आली
 मी तर पाकळ्यांची आस केली बनुन सडा पारीजात ती आली
 रस्ता चालत होतो काट्यांचा जेव्हां सोडून तीची पाउलवाट ती आली
 बुडता बुडता किनारा गवसला मला होऊन माझा आधार लाट आली
 आसवात होतो कधी मी चिबं भिजलेला घेऊन मग मेघातुन बरसात ती आली
 आजवर या कुट्ट काळोखात जगलो होउन प्रकाश घरी साजंवात ती आली
 आसवात कधी आभाळ पाहील नाही उधळून चादंण्यात चादंरात ती आली
 कोण म्हणे मी भगांर भगांरात जगलो रगंवुन रांगोळी माझ्या दारात ती आली
 हा एक निवडूंग वाळवटांत होता एकटा होऊन हिरवळ या श्रावणात ती आली

Marathi Prem Kavita : सुखात नेहमी गोड गोड बोलण

सुखात नेहमी गोड गोड बोलण दुःखाच्या प्रंसगी पळवत शोधन.
 जबाबदारी कधी घेतलीच नाही त्यास प्रेम म्हणावे का.....?
 ज्याला हवे फक्त शरीर सुख त्यात नसते कधीच मनाची भूक.
 दुसरक़ विचारच करत नाही त्यास प्रेम म्हणावे का...?
 संशय सदा तिच्यावर घेई स्वतः मात्र दुसर्याबरोबर फिरायला जाई .
वरून तिलाच जाब विचरता राही त्यास प्रेम म्हणावे का...?
 हरघडी तिच्या वर रुबाब करी आपलाच म्हणन खर करी .
तीच कधी ऐकून घेतच नाही त्यास प्रेम म्हणावे का...?
 ते समजतात......... प्रेम म्हणजे घटकाभर करमणूक कशाला करायची
आयुष्यभर गुंतवणूक प्रेमाचा अर्थ कधी कळलाच नाही त्यास प्रेम म्हणावे का...?

Marathi Athavan Kavita : आयुष्याच्या अल्बममध्ये

आयुष्याच्या अल्बममध्ये आठवणींचे फ़ोटो असतात .
 आणखी एक कॉपी काढायला निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात.
  गजर तर रोजचाच आळसाने झोपले पाहिजे, गोडसर चहाचा घोट घेत Tom n Jerry पाहिल पाहिजे.
 आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे? एखाद्या दिवशी 1 तास द्या, आरश्यासमोर स्वतःला सुन्दर म्हणता आल पाहिजे.
 भसाडा का असेना आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत नाचणसुध्धा जमल पाहिजे.
 गीतेच रस्ता योग्यच आहे पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर BayWatch सुध्धा enjoy करता आली पाहिजे.
 कधीतरी एकटे उगाचच फ़िरले पाहिजे, तलावाच्या काठावर उताणे पडले पाहिजे.
 सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच बागेत फ़िरल पाहिजे 'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला कधीतरी भुलल पाहिजे. द्यायला कोनी नसल म्हणुन काय झाल? एक गजरा विकत घ्या ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या. रात्री झोपताना मात्र दोन मिनीटे देवाला द्या, एवढ्या सुन्दर जगण्यासाठी मैत्रि तुझी अशी असवी, आयुश्यभर सोबत राहावी, नको कधि त्यात दुरावा , नेहमीच नवा फ़ुलोरा, मैत्रि अपुली अशी असावी

" सावली "

सावलीला म्हणालो थांब ती म्हणाली मला जायचय मी म्हणालो का ? तुला नाही का माज्या बरोबर रहायचय ती म्हणाली तुज्यात आता काय राहिलय कारण तुज्या डोळ्यात तुला येणार मरण मी पाहिलय तीच उत्तर ऐकून मी तर सुन्नच पडलो आसवच हरवली डोळ्यातून क्षणभर कोरडाच रडलो पुन्हा सावलीला म्हणालो थांब ती पुन्हा म्हणाली मला जायचय मी म्हणालो थोडाच वेळ , तर म्हणाली तुला मरताना मला नाही पहायचय खुप आग्रह केला शेवटी ती निघून गेली पण हो, जाता जाता माज्यासाठी आसव दोन ढालून गेली आणि आता ..... आणि आता माज्याशिवय ती एक एकटीच रहातेय मी निजलोय सरणावर ती दुरून खेळ पहातेय होय ..... ती फक्त दुरून खेळ पहातेय.....

बाबा मी चुकलो

बाबा मी चुकलो माफ़ मला कराल का तुम्हाला, "बाबा" बोलायला मी लाजलो शिक्षा मला दयाल का ...उपास मारीचि वेळ आली हमालीच काम केलत स्वता: उपाशी मरून आम्हाला पोट भर जेऊ घातलत स्वता: फाटकी कपड़े घालून आम्हाला अंगभर कापड दिलित आम्ही आजारी पडलो तर रात्रभर दवाखाण्याच्या बाहेर रडत रडत .... रात्र काढलित स्वतहाच्या अंगातील रक्त देऊन मला तुम्ही वाचवलत नको तेवढा पैसा ओतून खुप खुप शिकवलत आज मी खुप मोठा झालोय एक दिवस तुम्ही मळकी कपड़े घालून माझा जेवणाचा डब्बा घेउन कॉलेज मधे आलात कोलेज मधल्या मुलींनी "हे कोंन" आहेत अस विचारल बाबा तुमची ओलख "आमच्या शेजारचे "आहेत अशी दिली ........ बाबा ....मी चुकलो माफ़ मला कराल का तुम्हाला बाबा बोलायला मी लाजलो ...शिक्षा मला दयाल का शिक्षा मला दयाल का आय लव यू बाबा .......

जीवन असच जगायच असत.

जीवन असच जगायच असत.
थोड दु:ख, थोड सुख झेलायच असत,
कळी सारख सुंदर फुलात उमलायच असत,
जीवन असच जगायच असत.

वार्‍यासंगे भीरभीरायच असत,
उन्हासंगे तळपायच असत,
पावसासंगे बरसायच असत,
जीवन असच जगायच असत.

अत्तरासंगे दरवळायच असत.
 भुग्यासोबत गुणगुणायच असत,
जीवन असच जगायच असत.

 फुलपाखरसंगे फिरायच असत,
सप्त रंगात डुबायच असत,
जीवन असच जगायच असत.

 भुतकाळासंगे आठवायच असत.
वर्तमानासंगे खुलायच असत,
 जीवन असच जगायच असत.

दु;खाला जवळ करुण भवीष्यकाळ घडवायचा असतो.
जीवन असच जगायच असत. .

फक्त तू नकोस मला,साथही तुझी हवी आहे

फक्त तू नकोस मला
साथही तुझी हवी आहे
शांत स्थळी एकांतवेळी
प्रीत तुझी हवी आहे

शृंगार प्रेम नको मला
वात्सल्य प्रेम हव आहे
सांजवेळी सूर्यास्ताला
प्रेमगीत हव आहे

दवबिंदू नकोत मला
रिमझिम पाऊस हवा आहे
रानफुलाला सुखावणारा
गार वारा हवा आहे

फक्त शब्द नकोत मला
अर्थ त्यातला हवा आहे
तिमिरातून तेजाकडचा
मार्ग त्यातून हवा आहे

सृष्टी सारी नको मला
द्रुष्टी तुझी हवी आहे
तुझ्या डोळ्यात दिसणारा
विश्वास मला हवा आहे

तुझा दुरावा नको मला
सहवास तुझा हवा आहे
खचनाऱ्या माझ्या मनाला
आधार तुझा हवा आहे

क्षण तुझे नकोत मला
प्रत्येक क्षणी तू हवा आहेस
वेळ तुझी नको मला
वेळीस तू हवा आहेस.

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल ,

एकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल , तिला पाहताच त्याला तीच वेड लागल , वेलीला विचारू तरी कस? या प्रश्नाने त्याला पछाडल, पण, आपण जरा धीर धरावा अस म्हणत त्याने स्वतहाला सावरल, वेळ मात्र आपली हसत ,खेळत राहत होती, ते पाहून झाडाने तिच्याशी मैत्री केली होती , काही दिवसाने वेळ मात्र जमिनीवर पसरू लागली , ते पाहून झाडाने तिची विचारपूस केली , वेळ म्हणाली , झाडा मला तुझा आधार हवा आहे , तू मला आधार देशील का ?? यावर झाड़ म्हणाले , तू माझी होशील का ते ऐकताच वेलिने नकारार्थी मान हलवली , ते पाहून झाडाची निराशा झाली , हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर विचारात पडले , विचार करून त्याने वेलीला आधार देण्याचे वचन दिले , वचन देताच वेळ मात्र झाडाला बिलगली , अन , हसता हसता त्याची आसवे हळूच ओघळली , आसवे पुसत पुसत त्याने तिला आधार दिला , कारन …. तिला आधार देण हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला ..

काही नाती रक्ताची

काही नाती सक्तीची खरी नाती तीच जी असतात मैत्रीची तुझी मैत्री माझ्यासाठी परमेश्वराच वरदान आहे माझ्या जीवनात तुझ स्थान त्याच्याएवढच महान आहे तुझ्या माझ्या मैत्रीत नक्कीच काही खास तुझी माझी मैत्री म्हणजे दोन जीव एक श्वास तुझ्या माझ्या मैत्रीत येत असतो क्षणभंगुर टिकणारा रुसवा पण त्यातूनच तर वाढत असतो आपल्या मैत्रीतील गोडवा तुझ्या मैत्रीची महती शब्दांत मांडता येणे अवघड तुझ्याविन मी म्हणजे जणू एक बुरुजाविन गड तुझ्या मैत्रीच्या सावलीत ठेव मला नेहमी जपून कारण जगण्याचा खरा अर्थ उमगलाय मज फ़क्त त्यातून अशा या आपल्या मैत्रीत पडू नये कधी खंड सदैव टिकुनी रहावी मैत्री आपुली आणि लाभावे आयुष्य तुला उदंड

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही, सावलीशिवाय , "स्व" ची जाणिव कधीही होत नाही, सावली नकोस शोधु , ती आपल्या जवळच असते, नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते, सवयींचे काय , त्या कशाही जडतात, हळु हळु अंगवळणीही पडतात, म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते? एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते. विश्वासाला तडा गेल्यावर काही मार्गच ऊरत नाही, तरीपण विश्वास ठेवावा लागतो नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही...

देवा.....!

देवा.....! किती दिवस घालू तुला साकड का आहे प्रेमाचं अन माझ वाकड....... बघ एकदा तरी माझ्याकड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! आता वैताग आलाय आतल्या आत झुरण्याचा...... जुना झालाय फंडा तिच्यावर लाईन मारण्याचा...... बघ कुठतरी तोडक -मोडक होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! किती दिवस मी देवा स्वप्नातच झुरू..... किती वेळ मनातल्या मनात मनालाच हाक मारू..... असेल का कुणी खरोखर वेड-वाकड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! वय चोवीस झालय तिला शोधताना..... जीव कासावीस झालाय तिला बघताना मनाचा गारवा बघ असू दे कसलंही रूपड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......! फोन नको करू देवा पण miss call तरी दे..... पत्र नको पाठवू नको पण एक SMS तरी दे...... हसतात ऐकत बघून कॉलेज मधली माकड होऊ दे एखाद प्रेमाचं लफड.......!

गुलाबी कल्लोळ ...... !!

गुलाबी कल्लोळ ...... !! गंधाळलेला गुलाब, माझ्या ओठांवर फुलाला, मखमली स्पर्शाने त्या, ओठांचा रंग गडद केला ! चंचल वाराही, तुला फितूर झालेला, मला पाहण्यासाठी, खर तर तू आतुरलेला ! घननिले नभ तुझ्या, साथीला धावले, तुझ्या मिठीत मला, खेचून आणले ! थेम्बाथेम्बाने त्या, कशी जादू केलि, तुझ्या माझ्या अंतरी, सतार छेडूनी गेली ! पाहता तू असे चोरून, जिव वेडाउन गेला, तुझ्या मनातला कल्लोळ, माझ्या डोळ्यात उमटला

मैत्री म्हटली की

मैत्री म्हटली की आठवतं ते बालपण आणि मैत्रीतुन मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण कोणी कितीही बोललं तरी कोणाचं काही ऐकायचं नाही कधीही पकडले गेलो तरी मित्रांची नावं सांगायची नाही मैत्रीचं हे नातं सगळ्या नात्यांत श्रेष्ठ हे नातं टिकवण्यासाठी नकोत खुप सारे कष्ट मैत्रीचा हा धागा रेशमापेक्षाही मऊ सुत मैत्रीच्या कुशीतच शमते मायेची ती सुप्त भुक मैत्रीच्या सहवासात श्रम सारे विसरता येतात पण खरे मित्र मिळवण्यासाठी काहीदा कितीतरी पावसाळे जातात मैत्री म्हणजे रखरखत्या उन्हात मायेची सावली सुखाच्या दवात भिजुन चिंब-चिंब नाहली मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे जुन्या आठवणींना उजाळा देउन गालातल्या गालात हसणारे…

Marathi Kavita on Aai : आई तू खोठ का बोललीस ?

आई तू खोठ का बोललीस ?
तिन्ही जागाच चा स्वामी आई विना भिकारी झाला .
 माझ्या वरही शेवटी तोच प्रसंग आला .
 लहान होतो तेवा पोटभर जेवायला द्यायची तू .
जेव म्हटल कि तू जेव माझ पोट भरलाय रे बाला असच म्हणायची .
 माझ्या साठी तू उपाशी च राहिलीस .
 आई तू तेव्हा खोठ का बोललीस ? .
 दिवाळी आली कि छान कपडे घ्यायची मला .
 तुला एक साडी घे म्हटल कि म्हणायची खूप साडया आहेत रे मला .
माझया साठी तू दिवाळी अशीच काढलीस .
 आई तू तेव्हा खोठ का बोललीस ?.
 तू नेहमी म्हणायचीस खूप मोठा हो तुला मोठा माणूस होताना पहायचं आहे .
 आज मोठा माणूस झालो तर तूच नाहीस पाह्याल मला .
ह्या जगात एकत का सोडून गेलीस खर सांग आई तू इतक खोठ का बोललीस ?.

Marathi Virah Kavita : आता तर पानेफुले सुद्धा

आता तर पानेफुले सुद्धा त्याला सोडून गेली
जाता जाता आपल्या आठवणी सुद्धा खोडून गेली
आणि ...... आता तो एकटाच उरालय
अगदी सापळया सारखा
 आपल अंग न्याहाळत विनवणी करतोय सर्वाना की जाऊ नका ,
असा व्हीवळत तरीही कुणीच थांबत नाही मग .....
मग तो उदास होतो पण दुखी होत नाहि
फकत वाट पाहतो त्यांच्या परत येण्याची कारण.....
त्याला माहितीय की ती परततिल त्याच्या देहावर बागडायला
त्याच्या कुशीत निजायला
 पण तोपर्यंत त्याला वाट बघयाचीय फकत वाट बघयाचीय त्याची, त्या वसंताची .....

Marathi friendship Kavita : मित्रा तू फक्त …. !!

मित्रा तू फक्त हात दाखव, मीच तुला हात देईन .
मित्रा तू फक्त जीव लाव, तूझ्यासाठी मीच जीव देईन.
 मित्रा तू फक्त हाक मार, मी नक्की हजर असेन.
मित्रा तू फक्त नेहमी बोल नाहीतर मी नक्की कोलमडेन.
 मी चुकलो तरी एकदाच बघ, मीच स्वःताहुन माफी मागेन.
तू चुकलास तरी एकदाच बघ, मीच तुला माफ करेन.
 मित्रा तु फक्त गोड हस, सारे श्रम शमतील.
मित्रा फक्त एक मिठी मार, सगळी दुःख विसरतील.
 मित्रा फक्त तुझ्या आधारावर मी जीवन जगत असेन,
 मित्रा तू फक्त आठवण ठेव नाहीतर मी नक्की मरेन.

Marathi Prem Kavita : तुझ्या श्वासात राहत होतो मी

तुझ्या श्वासात राहत होतो मी ,
तुझ्या आठवणीत जगत होतो मी ,
रोज रात्री स्वप्नात माझ्या फ़क्त तुलाच पाहत होतो मी ,
 त्या सरसरत्या पावसातत्या ओल्या चींब दिवसात चोरुन चोरुन भिजत भिजत फ़क्त तुलाच न्याहाळात होतो मी ,
 कित्येक मित्र जवळ असुन कुठेतरी एकटाच बसुन फोटो तुझा समोर ठेवुन अलगदपणे तुलाच कुरवाळीत होतो मी,
 स्व:ताला तुझ्या प्रेमात पाडतांना रात्री तुला स्वप्नात बघतांना भरदिवसा तुझे भास होतांना तुला प्रेमात पाडायलाच विसरत होतो मी ,
 आजही तुझी वाट पाहत असतांना अजुनही तुझ्या प्रेमात जगत असतांना माझ्यापासुन दुर,
तुही दु:खी आहेस हे तुझ्या उदास चेह-यावर वाचत होतो मी,
  तुझ्या विरहात एकटाच जगुन भावना माझ्या मनातच दाबुन आयुष्यात नेहमी तुच जिंकावीस म्हनुन कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी कित्येकदा स्वत:लाच हरवत होतो मी.

Marathi Poems : मी असाच आहे

मी असाच आहे ,
अनोळखीशी ओळख करणारा ,
पण निखळ मैत्रीवर विसावणारा .
मी असाच आहे ,
कोणाच्या ध्येयासाठी ध्यास पणाला लावणारा ,
मायेच्या आशेसाठी आनंद वर्षाव करणार ,
डोळ्यातील अश्रू ओठांवर ठेऊन हसणारा .
मी असाच आहे ,
पाउसाच्या रिमझिम सरीवर ओलाचिब भिजणारा,
 हळूच कोणाच्या आठवणीत मावळणारा ,
दिलेला शब्दासाठी बेधुंदीने कर्तुत्व निभावणारा ,
मोठे तर सर्वच असतात पण मनाने मोठे असणारा ,
शब्दांची भाषा नको मला पण त्यांच्या भावनाने सर्वाना जाणणारा ,
कारण मी असाच आहे.........

Marathi Kavita : एक दिवस असा होता की

एक दिवस असा होता की कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं
 एक दिवस असा होता की कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं
 एक दिवस असा होता की कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
आज दिवस असा आहे की कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं
 आज दिवस असा आहे की मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं
 आज प्रश्न असा आहे की का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं का
 स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं
 दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

मे महिन्याच्या सुट्टी मधे

मे महिन्याच्या सुट्टी मधे मी मुंबई ला आलो गोड तीच रूप पाहून अगदी भाराउन गेलो माझ्या मनाला तिच्या कड़े पाहून खुप आनंद झालेला घरी कधी घेउन जातोय हाच विचार पडलेला पण वाटल आई बाबाना न विचारता कस घेउन जाव आणि घरी गेल्यावर आई बाबांच बोलन कोणी खाव मनात म्हटल ही आपल्या बरोबर येइल का आली तरी ही आपल्या गावाकडे राहिल का पण जाऊद्यात म्हटल , जरा डेरिंग केलि आणि तिला घेउन आमची स्वारी घराकड़े आली घरा मधे तिला पाहताच आई खुप रागविली बाबांन तर माझी लायकीच काढली कार्ट्याला कमवाय्ची अक्कल नाही आणि अशी नाटक करतोय , ताई बोलली दादा अस का केलस ..... सग्ल्यांच मी निमूट पने ऐकून घेत होतो तिच्या कड़े पाहून हळूच हसत होतो तिच्या सोबत देवलात जात असताना सगलेच पाहत होते ....जास्त दिवस नाही टिकणार असे बोलत होते मी देवलात गेलो ती बाहेरच होती आणि दर्शन करूंन आलो तर ती गायब झाली होती सग्ल्यान्ना विचारल पण कोनच सांगत न्हवत मन माझ आता कशावरच लागत न्हवत तिच्या विरहाने पायाला चटके खुप लागत होते , अहो खड़े तर रस्त्या वरुण चालूनच देत न्ह्व्ते ( कृपया माझी चप्पल हरवली आहे आणून दया..विनाकारण भांडंन होइल )

Marathi Sad Kavita : का कुणास ठाउक

का कुणास ठाउक,
 आज कस उदास वाटत होत
 भीर भीर नार मन माझ कुठच लागत न्हवत
लपून बसलेल्या पाउसान शरीर गुदमरून गेल होत
फ़क्त त्या उनातील वारयाने दाना नसलेल कनीस डोलत होत.....
मोहर आलेल्या अंब्या वर कोकिलेच गान बंद होत .....
पान गलूंन पडलेल्या फांदीवर त्या घुबडाच दुःख भर गुटर गुटर चालु होत
सकाळी सकाळी ...बा च्या बर भांडून मन खुप खचल होत
" काय केल माझ्यासाठी जन्म देऊन उपकार नाही केला " एवढ बोलून त्यांच मन खुप दुखवल होत.
 आता तोंड नाही दाखवायच घरी म्हणून म्य़ा तसाच बसून होतो,
 तेवढ्यात कुणाचा तरी सांगावा आला घरी चल लवकर... बा लय आजारी हाय.
 म्य़ा बिगी बिगी घराची वाट धरली ....
"बा..... मला नग सोडून जाऊ" या ताईच्या किंकालींन .. माझ्या पाया खालची वाट सरली.
 समोर झाडाला लटकलेला "बा" चा धेय ... आणि हातात एक कागदाची चिट्टी ,
त्यावर ...ल्हिवल होत लेकराहो म्य़ा तुमच्या साठी काय बी करू शकलो नाय , मला माफ़ करा .
सरकार कडून मिलालेल्या पैशात ताईच लगिन करा ,
आई वर लक्ष ठिवा लय लय शिका ......
काल्या आई च्या जिवावर बसु नगा ...
आता ती पण आपल्यावर कोपली हाय म्य़ा जगुन तरी काय करणार हुतो ... मला माफ़ करा.

Prem Kavita : कस सांगू तुला मनात माझ्या काय ?

कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
 नजरेला आस तुझी
 ओढ हृदयास तुझी
 आतुर हे नयन माझे झलक पाहण्यास तुझी
 पाहण्याचा तुला रोज शोधतो मी पर्याय,
 कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
 दिन रात भास तुझा,  मनाला या ध्यास तुझा.
 हवाहवासा ग वाटे मला सहवास तुझा,
तुझी साथ जीवनात हवी आता, ग जगाय कस सांगू तुला,
 मनात माझ्या काय ? कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
 देईन तुला सुख सारे, नाही याची देत हमी,  पण प्रेमात नाही राहणार कधी कोणतीही कमी.
  तुझी साथ नशिबात असो किंवा नसो,
  पण पाहवेना मला तुझ्या नयनात नमी ,तुझ्या खुशीतच माझी ख़ुशी जणू.
 काय कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय ?
 आयुष्यात माझ्या मला खुश तुला पहायचय, तुझ्या सोबत जगायचय, तुझ्या सोबत मारायचाय.
 स्वप्न माझी पूर्ण होण्यास तुझा होकार हवाय,
  कस सांगू तुला मनात माझ्या काय ?
कळेल कस तुला सांगितल्या शिवाय

Ek Tarfi Prem Kavita : होता एक वेडा मुलगा

होता एक वेडा मुलगा
तिच्यावर खुप प्रेम करायचा
तिची आठवण आल्यावर कविता करत बसायचा..
 कधी तिच्या केसांत फ़िदा, कधी तिच्या डोळ्यात बुडायचा,
कधी तिच्या ओठांवर अडकायचा, तर कधी गालवर गोड हसू आणायचा…
 नेहमी काहीना काही उपमा द्याचा, आज परी तर उद्या सरी……….!
प्रेम फक्त तोच करतो असे काही वागायचा
 पेनाची शाई संपली तरी शब्द काही संपे ना
त्याच्या कविता तिला हट्टाने दाखवायचा
 कवितेतील तीच तू अशी जाणीव मात्र दयाचा
 कवीता तिला आवडली की वही मागे चेहरा लपवून खुप गोड हसायची…………!
 पण कवीता तिला कधीच समजली नव्हती कारण प्रेम फक्त तोच करायचा………….!
आज नाही त्याच्या आयुषात ती तरी कवीता करतोय………..!
एक आठवण म्हणुन, एक समाधान म्हणुन,
 होता एक वेडा मुलगा,
 तिच्यावर खुप प्रेम करायचा, अगदी माझ्यासारखा..

ती दिसली | Sad Prem Kavita | Heart Touching Sad Love Poem in Marathi

ती दिसली.....
भिजलेल्या डोळ्यातून आज, शब्द मनात उतरले
 तिला पाहताच क्षणी, डोळ्यातून अश्रु बरसले.....
 तिचीच आस धरून, आयुष्यात मी बिखरलो
नसताना ती जवळ, जगनेही मी विसरलो.....

 तिचीच वाट पाहत, पापण्या माझ्या पाणवल्या
 सावल्या डोळ्यातून ह्या, आभाळा सारख्या बरसल्या..... 
खुप काही म्हणायच होता,
शब्द माझे आतुरलेले मुखातून न उमलता, डोळ्यातून उमललेले.....

 म्हंटल ज़रा जवळ जाऊन, तिच्याशी थोड बोलाव तिच्या आठवणीसंगे जगतो, तिलाही थोड कळाव.....
 तिच्या आठवणीची ओंजंळ, तशीच भरून ठेवलेली एकही क्षण न सांडवता, जिवापाड मी जपलेली.....
 कंठ आज दाटून आला, तिला समोर पाहून बरच काही बोलायच होत, मनात गेले शब्द राहून.....
 इतक्यात तिने पाहिले मला, डोळ्यात अश्रु ढाळत अनेक प्रश्नांची उत्तर मिळाली, मलाही न कळत.....
 नव्हती ती आज माझी, झाली दुसर्या कोणाची रेशम गाठी तुटल्या आमच्या,
तरी सदैव राहिली ती या वेड्या मनाची.....

Marathi Viarah Kavita : मला एकदाच येऊन भेट. . .

मला एकदाच येऊन भेट.
माझ्या काळजाचे, तुकडे येऊन समेट;
एकदाच फक्त तू, मला एकदाच येऊन भेट.
 काळ सरला, ऋतु बदलले,
तरी मन तुझ्या आठवणींचा माग काही सोडत नाही;
 वारे बदलले,दिशा संपल्या,
पण तुझ्याशिवाय या मनाचा, ठाव कुठंही जडत नाही.
निस्तेज ह्या ह्रदयाला, तुझ्या आठवांचा सुर्य प्रकाश देतो;
निष्पर्ण ह्या जीवनाला, तुझ्या येण्याच्या आशेने पालवी देतो.
तुला शपथ आहे माझ्या प्रत्येक श्वासाची;
 घशात अडकलेल्या प्रत्येक घासाची;
वादळ हो, वारा हो, पाऊस बनून धाव;
एकदाच माझ्या ह्रदयावर घाल, मिलनाचा घाव;
आणि मग, फुटलेल्या माझ्या काळजाचे, तुकडे येऊन समेट.

Marathi Prem Kavita : तुज्यासाठी शब्दच सापडत नाही .

तुज्यासाठी शब्दच सापडत नाही .
 तुज्यावर खुप दिवसांपासून लिहायचे म्हणतो
पण तुज्यासाठी शब्दच सापडत नाही
तुजा विषय निघाला की शब्दच हरवतात।
कारण तेव्हा मी, मी नसतो , आसमात तुला शोधत भरकटत असतो
तू नसुनही कायम बरोबर असतेस
पाहतो जेव्हा चंद्र तेव्हा तू तिथे दिसतेस
आनंदाच्या वेळी तूझा बेभानपणा भासतो
निराश मनाची समजूत काढनारी तूच असतेस
तूझी प्रतिमा मी रोज रंगवत असतो, तुज्याशी मी रोज बोलत ही असतो, थट्टा-मस्करी आणि भांडण ही होते
तरीही तू कोण आहेस? कुठे आहेस? कशी आहेस? एक ना अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत
पण एक दिवस टू समोर येणार आणि तेव्हा मात्र शब्दांचा मुसळदार पाउस पडणार..

Marathi Viarah Kavita : कधी कधी येते का ग माझी आठवण................

कधी कधी येते का ग माझी आठवण................
 आठवणी त्या गेल्या वाहून का तुझ्या ग अश्रू मधून कि आठवतो पुसट पुसट चेहरा माझा अजून
 कधी कधी येते का ग माझी आठवण................
 आठवतात का तुला कधी ते क्षण...................
 घालवले जे सोबत आपण त्या क्षणांची ग आणि घालवू शकलो नाही क्षण जे सोबत
 कधी कधी येते का ग माझी आठवण................
 आठवतात का तुला कधी ते क्षण...................
 पुढ्यात ताट आणि मनात येतो का माझा विचार
 विचारात त्या लक्ष न लागे कधी मग जेवणावर जेवताना ग कधी तो घास अडे का ओठांवर आणि डोळ्यातून वाहते का ग अश्रूंची धार
 कधी कधी येते का ग माझी आठवण................
 आठवतात का तुला कधी ते क्षण...................
 फिरता फिरता थांबतेस का कधी त्या जागी येऊन ज्या ठिकाणी कधी भेटायचो आपण लपून छपून कधी प्रेम तर कधी भांडण आपली अधून मधून तुझी नजर चहू ओर कोणी बघेल म्हणून
 कधी कधी येते का ग माझी आठवण................
 आठवतात का तुला कधी ते क्षण...................

Marathi Miss You Kavita : मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते
 मी चालत आसताना पाय अचानक थांबतात
कुठुन तरि ओळखीचे शब्द काणी पडतात
ह्र्दयाचे ठोके ही हळुहळु वाढतात
मन आणी ङोळे दोघं ही मागं वळुन पहातात
त्या आशेच्या नजरेने मागं वळुन पहाताना मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते,
  त्या दीवशी मी जरा जास्तच घाईत होतो
गदी असताना ही ट्रेन मध्ये शीरलो होतो
अचानक कुणीतरी ओळखीचं वाटलं तोच तो चेहरा पाहील्या सारखं भासलं,
 उशीर झाला तरी चुकीच्या स्टेशनवर उतरताना मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते.
  नको असतानाही मीत्र फ़ीरायला घेवुन जातो
 एकांत हवा असतो पण मैत्री पुढे ईलाज नसतो
वीसरता यावं तुला म्हणुन मी हि त्या गदीत शीरतो शोधतो त्या मानसांत एखादा ओळ्खीचा चेहरा
त्या लाखोंच्या गदीत ही मी एकटाच फ़ीरताना मला तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते.
  दीवसा उजेडात स्वतःला सावरताना सायंकाळी सुर्य अस्ताला जाताना,
 रोज रात्री जागरन करताना, पांघरुन घेवुन अश्रु ढाळताना, जेव्हा मी स्वतःलाच जळताना पाहतो,
तुझी आणी फ़क्त तुझीच आठवण येते

Marathi Virah Kavita : जमलंच तर परत ये . .

जमलंच तर परत ये . . .
भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये!
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये!
कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये!
महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये!
मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य;
तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये!
थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये!
तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत......... .

आज वेळ नाही | Marathi Prem Kavita on Life | Sad Life Poems in Marathi Fonts

आज वेळ नाही....
अमाप सुख आहे सगळ्यान्च्याच पदरात
पण ते अनुभवयला आज वेळ नाही.....
आईच्या अन्गाईची जाणिव आहे
पण आईला आज 'आई' म्हणायलाच वेळ नाही.....
सगळी नाती संपवुन झालीत
पण आज त्या नात्यान्ना पुरायलाही आज वेळ नाही.....
सगळ्यान्ची नाव मोबाईल मध्ये सेव आहेत
पण प्रेमाचे चार शब्द बोलायलाही आज वेळ नाही.....
ज्या पोराबाळान्साठी मेहनत दिवस-रात्र करतात
त्यान्च्याकडे क्षणभर बघायलाही आज वेळ नाही....
सान्गेल कोण कशाला दुस-याबद्द्ल
 जेव्हा ईथे स्वतःकडेच बघायला वेळ नाही......
डोळ्यावर आलीये खुप झोप
पण आज कोणाकडे झोपयलाही वेळ नाही.....
ह्रुदयात वेदनान्चा पुर वाहतोय
पण त्या आठवुन रडायलाही वेळ नाही....
परक्यान्ची जाणिव कशी असेल
जर ईथे आपल्याच माणसान्साठि वेळ नाही...
आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या या संघर्षात जरा माग वळुन पहायलाही वेळ नाही........
अरे जीवना तुच सान्ग जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत जगायलाच आज वेळ का नाही?

Marathi Kavita : प्रेमामधे तर पडलो नाही..!

एकदा ती माझ्याकडे आली
 माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
 'हो' म्हणायच्या आतंच ती देऊन हात, घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत, कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत नभी चांदणे,
चंद्रासंगत गोड गप्पा नव्हत्या थांबत सुरेल आवाज जणू कोकिळेगत मौनामधे भासे
दिव्य एक रंगत अनवट सूर, बासरीचे उमलत हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची तरूतळी एका आम्ही बसलो मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात परि नजर थेट डोळ्यात
काय झालं पूढे सांगत नाही स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी, प्रेमामधे तर पडलो नाही....

अस ही प्रेम होत....

अस ही प्रेम होत,
नाही नाही म्हणता ही कोणी आपलस होउन जात.......
 रबने बनायीं जोड़ी म्हणतात ना त्यातलच हे सार असत,
 सर्व काही विधिलिखित असत.....
 जे आपल्याला हव असत ते आपल्याला कधीच मिळत नाही
जे आपल्याला अपेक्षित नसत , तेच आपणास मिळत असत......
 संध्या आणि शाम यांच ही असच काहीस होत,
दोघांत जीवाभावाची मैत्री "हो!नक्कीच मैत्रीच होती".....
 मैत्री मैत्री म्हणता शामने अशीच एकदा संधि साधली
 "तुझ्या वर माझ खुप प्रेम आहे" असाच काहीस म्हणाला, " हो ! नक्की असाच म्हणाला होता ".....
 संध्याला काहीच समजेनास झाल, "मी तर तुला माझा चांगला मित्र समजते" हा! हा!
नेहमी सारखीच ही सुधा एक तर्फी प्रेम कथा......
 संध्या आणि शाम त्या दिवसा पासून नाहीसे झाले,
मैत्री संपल्या सारखीच असावी असच काहीस झाल ...
 दोन वर्षाने एक वादल आल्यासारखच काहीस घडल होत,
शाम पुन्हा संध्याच्या आयुष्यात आला होता ना त्याने संध्याला बोलावल , 'हो!नक्की बोलावल होत "......
 पण यंदा शाम काहीच बोलला नाही तो विसरला असेल का तिला?
 पण प्रेमाची लहर जाणवत होती,
संध्याच्या डोळ्यात प्रेमाआश्रू दिसत होत, "हो! नक्की दिसत होत !"......
 "कुठे होतास रे? त्या दिवसा पासून"
 "कुठेच नाही! इथेच होतो तुझ्या आठवणी आहेत ना तिथेच"
"कस सांगू रे तुला मी ?आज मी किती खुश आहे"
" नको सांगुस! नेहमी सारख जानवल मला तुझ्या त्या अबोल भावना पण इतका वेळा का लावलास ?"
 "कदाचि मी तेव्हा स्वताचा विचार केला असेल" ......
 अस ही प्रेम होत, नाही नाही म्हणता ही कोणी आपलस होउन जात.....

Marathi Poems : "तुझ्या आठवणी म्हणजे.."

तुझ्या आठवणी म्हणजे... मोरपिसाचा हळूवार स्पर्श .
 तुझ्या आठवणी म्हणजे... नकळत निर्माण होणारा हर्ष .
 तुझ्या आठवणी म्हणजे... स्वप्नांनी सजवलेलं एक गाव .
 तुझ्या आठवणी म्हणजे... विरह सागरात हरवलेली नाव .
तुझ्या आठवणी म्हणजे... आयुष्य जगण्याची आशा आणि ,
तुझ्या आठवणी म्हणजे... गमवलेल्या गोष्टींची निराशा .
तुझ्या आठवणी म्हणजे... पावसात चिंब भिजणं .
तुझ्या आठवणी म्हणजे... ओसाड वाळवंटात एकटच भटकणं .
तुझ्या आठवणींशिवाय आयुष्यच अर्थहीन आहे ,
तुझ्या आठवणींचा सहवास हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!!

Marathi Kavita : ती म्हणजे

ती म्हणजे, अगदीच निरागस नेहमीच हसणारी,
दु:खात सुद्धा सुख शोधणारी...
 मैत्रीण असावी अशी निरागस आणि प्रेमळ,
बोलणे तिचे रोखठोक आणि सरळ...
 दु:ख पचवण्याची क्षमता मात्र तिची अफाट होती,
 म्हणुनच की काय सर्वांना वाटे दु:खाची झालर तिजवर कधीच नव्हती...
 तिला समजण्यात इतरांसारखाच मी ही तसा कमीच पडलो, तिला काय हवे ! काय नको ! यासाठी अनेकदा धडपडलो...
 तिला त्रास होइल अशा सर्व व्यक्ति अन् गोष्टींना मी सहजतेने टाळले,
न बोलण्याचे दिले वचन मनापासून पाळले...
 यापूर्वी कधी मी रागावलो नाही, ती म्हणायची,
तुझं असलं वागण मला काही पटत नाही...
 आता काळजीच्या हेतूने अधूनमधून रागावतो,
तिचे आपले उगाच म्हणणे की, अविश्वास दाखवतो...
 दिवसागणिक दिवस जाता आठवणींचे क्षणही सारेच सरले,
 सोबत असावी कुणाची म्हणुनी तिलादेखील घेवुनी गेले...
 दूर वर गेली तरी तिची काळजी वाटतेच हो...!
न मिळालेले सुख तिला भावी आयुष्यात मिळत राहो...
 आता तरी मनाला थोडे हलके हलके वाटते,
प्रत्यक्ष्यात नाही पण स्वप्नात मात्र ती भेटते...
 विचारते मला, कसा आहेस ? काय करतोय ? मी म्हणतो, काही विशेष नाही ग..!
 चेह-यावर तुझ्या आनंद बघतोय...
 ती म्हणजे अगदीच निरागस नेहमीच हसणारी, दु:खात सुद्धा सुख शोधणारी...

Marathi Kavita : प्रेमात पडण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे

कॉलेजला admission घ्यायचं होतं
कुठं चांगलं शिकवतात पहायचं होतं
 विचार करून घ्यायचा होता निर्णय पण ऐनवेली एक मुलगी छान दिसली
आणि तिच्याच कॉलेजात admission घेवून टाकली कारण,
 मुलीच्या मागे फिरण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे
 admission घेताच गंभीर मी झालो जीव तोडून अभ्यासाला मी लागलो
 स्वप्न होतं काहीतरी करून दाखवायचं पण ऐनवेली mobile माझा वाजला मैत्रीणीशी बोलण्यात दिवस मी घालवला कारण, तिच्याशी तासंतास बोलण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे मैत्रिण झाली की त्याची चर्चा होणं सोबतच आलं मित्रांमद्धे गप्पांचा विषय होणं सोबतच आलं शेवटी त्यांना दुसरयांच्या गोष्टीत रस हा असतोच पण आपणही सर्वकाही सरळसोट सांगत नसतोच काही गोष्टी आपल्यापुरात्याच ठेवणं चांगलं आहे कारण, काही गोष्टी मित्रांपासून लपवण्यात एक वेगलीच मजा आहे मैत्रीच्या त्या नात्यात चार बागा फिरलो ओसंडणाऱ्या गर्दीत हातात हात घेवून तरलो एकदा movieला जाण्याचा plan ठरला तिच्या hostleपाशी मी जरा लवकरच पोचलो वेळ होता तिला यायला म्हणून खालीच उभारलो कारण, तिच्या hostleखाली वाट पहाण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे रोज रात्री मी तिच्या फोनची वाट पाहतो तिचा गोड आवाज ऐकण्यासाठी झुरत राहतो कितीही बोललं तरी मन भरत नसतं तरी शब्दांविना नातं कधी बोलत असतं बिछान्यावर पडल्यावरसुद्धा विचारचक्र सुरू असतं कारण, तिच्या विचारात गुंग होण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे आयुष्यात कॉलेजचे दिवस एकदाच येतात तेव्हा आकाशातले शुक्रचांदणे जवलीक साधतात अशा वेळेचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा लोक म्हणतात की शाहण्या माणसाने प्रेमात पडू नये पण मी म्हणतो की माणसाने एकदातरी प्रेमात जरूर पडावे कारण, तिच्या प्रेमात पडण्यातसुद्धा एक वेगलीच मजा आहे

जीव दंगला गुंगला रंगला असा

जीव दंगला गुंगला रंगला असा पीरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू पैलतीर नेशील साथ मला देशील काळीज माझा तू सुख भरतीला आलं नभ धरतीला आलं पुनावाचा चांद तू जीव दंगला गुंगला रंगला असा पीरमाची आस तू जीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा गहिवरला श्वास तू चांद सुगंधा येईल रात उसासा देईल सारी धरती तुझी रुजाव्याची माती तू खुलं आभाळ ढगाळ त्याला रुढीचा ईटाळ माझ्या लाख सजणा हि काकाणाची तोड माळ तू खुण काळीज हे माझं तुला दिलं मी आंदन तुझ्या पायावर माखीन माझ्या जन्माचा गोंधळ

आयुष्य हे असंच असतं...??? Marathi Kavita Sad Poems Prem

कधी कधी खुप आनन्द देतं न मागताही सुख देतं,
पण अच्यानक हासता हासता रडवतं
आयुष्य...हे असंच असतं.????
 आपण बरंच काही ठरवतो आयुष्याचे आराखडे बांधतो पण एका वळणांवर सगळ काही थांबतं
 आयुष्य...हे असंच असतं.????
 भुतकाळातल्या गोड आठवणी वेड मन आठवत रहातं पण त्या मनाला फ़सवुन रडवतं
 आयुष्य...हे असंच असतं.????
 सुखाबरोंबरच दु:खहीं देतं कधीही भरुन न येणां-या भळभळणां-या जखमाहीं देतं
आयुष्य...हे असंच असतं.????
 आयुष्यात खुप काही मिळतं त्यातल बरंच काही नको असतं पण जे हवं असतं तेच मिळत नसतं
आयुष्य...हे असंच असतं.????