Sunday, June 7, 2015

जगायला शिक | Virah Marathi Kavita | Without Me Marathi Kavita

जगायला शिक माझ्याविना तू
पुन्हा स्वप्न नवे पाहायला शिक
जीवनाचे डाव खेळलो आपण
मी हरलो तू फक्त जिंकायला शिक
हातात नशीब गोंदलय तुझ्याही
एकटेच दुखांशी लढायला तू शिक
हरवलेत दोन जीव
एकाचे हृदय तर स्पंदन दुसरयाचे
देवाकडे अश्रू गाळून
प्रेम आपले परत मागायला शिक
जगायला शिक वेडी
नसेल उद्या मी तू माझ्याविना
जगायला शिक ..............
-
©प्रशांत डी शिंदे
दि.१०-०७-२०१४