खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच भेटते
ह्या एकाच ओळीने मनात प्रश्नांचे काहूर माजते
आयुष्यात परत मिळणारे प्रेम कधीच का खरे नसते???
तू माझ्यावर केलेले प्रेम खूप निस्वार्थी होते
मनाला हळुवार स्पर्शिणारे जणू मोरपीस होते
मग खरच का तुझे प्रेम माझ्यासाठी शेवटचे होते ???
मैत्रीच्याही पुढे पाऊल टाकण्यास मी होते नेहमीच घाबरले
तू पुढे केलेला प्रेमाचा हात हाती घेण्यास सदैव नाही म्हंटले
तू माझ्या मनातील भाव समजून घेशील याचीच वाट पाहत राहिले..
तुझे प्रेम माझ्यासाठी खरच खूप मौल्यवान होते
तुझ्या हितापाई तुझ्यापासून दुरावण्याच्या प्रयत्नात मी होते
पण खरच रे वेड्या मी हि तुझ्यावर तेवढच प्रेम करत होते
मग खरच का रे तुझे प्रेम माझ्यासाठी अखेरचे होते ???
नव आयुष्याच्या सुरवातीस नव प्रेमाची चाहूल असेल
माहित आहे कदाचित ते प्रेम तुझ्या एवढे अनमोल नसेल
पण मग काय ते प्रेम माझ्यासाठी कधीच खर नसेल???
खरच का रे तुझ प्रेम माझ्यासाठी आखेरंच असेल????
( मोनिका साळुंके )