Friday, June 5, 2015

आई साठी केलेली कविता | Marathi Kavita on Mother | Aai Marathi Kavita | Mother's Poems in Marathi

कोटी कोटी प्रणाम
माते , कोटी कोटी प्रणाम ||

तूच दिलास जन्म मला
वाढवलेस तूच मला
लहान पणी पायावर उभे राहायला
शिकवलेस तूच मला

चालता चालता पडले मी
तर स्वतः उठायची लावलीस सवय
चांगल्या वाईट गोष्टींमधून
चांगले आत्मसात करण्याची लावलीस सवय

कधी चुकले मी
तर तू मला मारायाचीस
पण नंतर मात्र तू
प्रेमाने जवळ घ्यायचीस

तुझ्या हाताच्या जेवणाला
आहे प्रेमाची चव
तुझ्या हाताचे पाणीही लागते
अमृता हूनही गोड

तू माझ्या कळत - न कळत
केलेस जे संस्कार माझ्यावर
त्यांच्यामुळेच मी आहे लायक
ह्या जगात जगायला

तुझ्या उपकारांमुळेच
माझ्यात आले धैर्य , प्रसंगाला सामोरी जाण्याचे
तुझ्या उपकारांमुळेच
मी बनले खंबीर
तुझ्या उपकारांमुळेच
मी बनले स्वावलंबी
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळते जीव माझा तुझ्यावरून आई
आई थोर तुझे उपकार

तुझे हे ऋण तू घातलेस माझ्या ओंजळीत
करतीये मी ओंजळ सांभाळण्याचा प्रयत्न
पण तू मला दिलेल्या ऋणान मुळे
मी झाले आहे नतमस्तक तूझ्या पुढे
होऊन नतमस्तक तुझ्यापुढे
मागणे मागते मी एक
सदा राहुदे माझ्यावर तुझ्या आशीर्वाद

मागणे आहे देवापाशी
भरपूर सुख तुला मिळो
तुझी माया मला मिळो
ह्या मायेच्या बदली माझे ,
आयुष्य तुला लागो

कोटी कोटी प्रणाम
माते , कोटी कोटी प्रणाम ||
-------------------------------------
  विशाखा  बेके  २९ / ०१ / २०१२