नभी दाटूनी मेघ भरले
फिरूनी तो पाऊस आला,
थेंब ओला डोळा माझ्या
सजन माझा परदेस गेला !
साथ तूजला देतसे दामिनी
अंगणी मज कडकडाट झाला,
कारे असा बरसतो वेडा
जीव माझा घाबरून गेला !
यावे सत्वर फिरूनी पुन्हा
जाशिल परतूनी ठावे मजला,
हुरहूर मज चिंब भिजण्याची
आण माघारी प्रिय सजनाला !
©शिवाजी सांगळे
फिरूनी तो पाऊस आला,
थेंब ओला डोळा माझ्या
सजन माझा परदेस गेला !
साथ तूजला देतसे दामिनी
अंगणी मज कडकडाट झाला,
कारे असा बरसतो वेडा
जीव माझा घाबरून गेला !
यावे सत्वर फिरूनी पुन्हा
जाशिल परतूनी ठावे मजला,
हुरहूर मज चिंब भिजण्याची
आण माघारी प्रिय सजनाला !
©शिवाजी सांगळे