Monday, June 8, 2015

मी मित्र नाही | Marathi Friendship Kavita | Kavita on Maitri | Marathi Poems For Friend | Friendship Poems in Marathi

मैत्रीच्या नादात फसवून
मी करतो विश्वासघात
माझा मित्र बनण्याचा
तू करू नको रे नाद

दुष्ट आहेत विचार माझे
कपटी माझ मन
चुकून जरी झालास मित्र
हरवून बसशील आयुष्याच रण

दूर राहा माझ्या पासून
मी.. मित्र नाही
शत्रू मी तुझ्या यशाचा
यशाचं सूत्र नाही

राहिलास जर मजपाशी
तू सर्वच गमवून बसशील
आयुष्य च वाया गेल्यावर
तू काय रे कमवशील

सावध ! हो आधीच
हि शेवटची चेतावणी
परत रडू नको
तुझी झाल्यावर कानउघाडणी

भरपूर मित्र भेटतील तुला
इथे मी एकटाच नाही
हाथ पुढे कर एकदा
तुला भेटतील भरपूर काही.

नको तुझ दुःख
आणि नको तुझ सुख
एकटच राहायला आवडत
मला नाही मैत्रीची भूख