Sunday, June 7, 2015

कोणीच कुणाच काहीच लागत नाही | Sad Dukhi Marathi Kavita Online | Read Full Marathi Pomes

मनातल्या अबोल भावनांना,
कोणीच का समजत नाही.....

शब्दात लिहलेले दुःख,
कोणीच का जाणत नाही.....

दोन शब्द जिव्हाळ्याचे,
कोणीच का बोलत नाही.....

आपण एकटेपणात रडताना,
कोणीच का सोबत रडत नाही.....

का असे होते नेहमी,
खरच काही कळत नाही.....

आपलेच सोडतात साथ आपली,
परखी कधी आपली होत नाही.....

कुणाला कितीही आपलं करा,
कोणीच कुणाच काहीच लागत नाही.....

कोणीच कुणाच काहीच लागत नाही.....


स्वलिखित -
दिनांक १८-०९-२०१३...
सांयकाळी ०८,४६...
© सुरेश सोनावणे.....