Friday, June 12, 2015

मैत्री विरुद्ध प्रेम | Friendship Poems in Marathi | Kavita For Friendship in Marathi Font

एका मुली - मुलात कधी
निखळ मैत्री का हो नसते ?
नेहमी त्यांच नात काहो
प्रेमा वरती येवून फसते ?

मैत्रिणी -मैत्रिनित गप्पा
आणि मित्रा -मित्रात मजा
मुली -मुलाच्याच मैत्रीला
प्रेमाची व्हावी सजा ?

विरुद्ध लिंगी आकर्षण
आणि खो घालतो सहवास
हळू हळू  वाढते जवलिक
अन सुरु प्रेमाचा वनवास

उनाड पोरांच्या घोळक्यात मधून
तो थोडा वेगळा होतो
प्रेमाच्या त्या जादुपोटी
कावळ्यांमध्ये बगळा  होतो

तीही नंतर दूर होते
चिव चीवणाऱ्या सखिंपासून
त्या बिचाऱ्या पाहत रहातात
तीच वागन आवासून

त्या दोघांच बोलन मग
विषय विषायानी वाढत जात
मैत्री सारख पवित्र प्रेम
आकर्षणवर थांबत जात

दोघे नंतर वेगळे  होतात
निरोप देतात मैत्रीला
विराम पडतो त्यांच्याशिवाय
हास्यविनोद अन मस्तिला

मित्र फक्त मित्र बनतात
औपचारिकतेने बोलायला
सख्या फक्त सख्या रहातात
खोट्या गप्पा तोलायला

त्या घोळक्यातील  मुला मुलित
दरी पडत जाते खोल
प्रत्येकाला मिळते  साथ
ढासळत  जातो मैत्रीतला  तोल

मैत्री मधली शुद्धता
प्रेमामुळे  झिरपत जाते
प्रेम आणि मैत्रीमध्ये
मैत्री तेवढी विखरत  जाते

हेवा वाटावा अशी दोस्ती
हळू हळू  फ़स्त होते
फुटकळ  अशा प्रेमासाठी
खरी मैत्री पण स्वस्त होते