Sunday, June 7, 2015

कसे सांगायचे तुला | Dukhi Marathi Kavita | Sad Feeling Lonely Alone Marathi Kavita Blog

कसे सांगायचे तुला
किती दुख माझ्या ह्या मनात
भेटीचा आनंद की विरहाची नशा झाली ह्या जीवनात
तुझ्या मनात राहायचे आहे एवढेच स्वप्न माझे
तुझ्यासोबतच आयुष्य जगायचे
बांधायचे होते घरटे छोटेसे माझे
तु म्हणशील ती दिशा होती
तूच आरसा माझा
तूच माझे जग अन तूच होता आधार माझा
कसे सांगायचे तुला
हे आयुष्य म्हणजेच आहेस तू
तू नाहीस तर आहे अधुरे जीवन माझे
दुरावा कसा येतो
क्षणिक शब्दांच्या चर्चेत
हरवून जातात स्वप्न अन मिळतात फक्त मोती आसवांचे
कसे सांगायचे तुला
किती दुख माझ्या ह्या मनात ....................
-
©प्रशांत डी शिंदे....
दि. १९-०१-२०१५