Wednesday, June 24, 2015

असं ही कधीतरी घडावं | Romantic Love Poems in MArathi | Romantic Prem Kavita in Marathi

मला पाहताच तुझं हृदय धडधडावं
कोणाची पर्वा न करता, तुझ्या डोळ्यांनी मला एकटक बघावं
मी ऐकत नसतानाही, तू बडबड करावं
असं ही कधीतरी घडावं ……

तुझं हृदय माझ्या प्रेमात पडावं
माझ्या एका शब्दासाठी तू हि तरसावं
स्वप्नात मी येईल या आशेने, रात्र-दिवस झोपावं
असं ही कधीतरी घडावं ……

मी कोणाशी बोलताना त्याने ही थोडं जळावं
स्वताचा हक्क गाजवून माझ्यावर प्रेम करावं
आज मी झुरते त्याच्यासाठी, त्याने हि थोडं झुरावं
असं ही कधीतरी घडावं ……


शितल ………

No comments: