Monday, June 8, 2015

खूप चांगला डाव खेळते नशिबही | Marathi Kavita On Nashib | Life Marathi Poems

खूप  चांगला डाव  खेळते नशिबही
डोळ्यांनाही अंधत्व देत असतं प्रेमही

विश्वासाची  नाती  राहिलीच कुठे
आधार तर  देतात परकेही
पण साऱ्यांत असूनही  नेहमी  एकटाच मी  ........

असाच मी  मोहात अडकून  नात्यांच्या
शोधू लागलो  रेशीमगाठी  आपुलकीच्या

समोरच होते आपलेही माझेच  त्यांना म्हणायचो
पण  निर्णय नेहमीच  होते   चुकीचेच

शोधले  आपले मी   माणसांतही
पण  देहावरही शेवटी  येणार होते फुले  ती मतलबाचीच     ......

खूप चांगला डाव  खेळते हे  नशीबही .........
-
© प्रशांत डी शिंदे
दि.१९/११/२०१३
स.१०.२४ मि