Sunday, June 7, 2015

तुला तर माझी आठवणही येत नसेल | Miss You Marathi Kavita Blog

तुला तर माझी आठवणही येत नसेल
माझ्या विचारांत , माझ्या मनात फक्त तूच असतेस
कसे एकटे जगतो आहे मी
माझे मला खरेच कळत नाही
पुन्हा गर्दीत शोधतो तुला मी
एकट्या जीवाला ह्या
वेदनांत जळताना बघतो मी
तू मात्र कुठेच दिसत नाहीस
त्या वाटा , ते लोक सारे काही तसेच आहे
त्यामध्ये फक्त तुझाच चेहरा दिसत नाही
नैराश्यात जखडलो आहे मी
आता तर स्वप्नांतही आधार असतो
खरेच एवढे कम नशिबी आहे का मी ..........
खूप त्रास होतो आता
तुझी सवय झाली आहे
तुला कळत नसेल ते
माझ्या भावना मात्र रडत राहतात
कसे समजवायचे मला मी
आईचेही डोळे माझ्याकडे पाहून वाहतात
आईला म्हणतो माझीच चुकी आहे ही
खरेच प्रेम असे दुखावरचं खपलं असतं .........
आता पहिल्यासारखी आपली भेट होत नसते
सुन्या पडलेल्या रस्त्यावर त्या
तुझी सावली कुठेच सापडत नसते
तरी शोधत राहतो तुला
हि रात्र मला छळत असते
मन ऐकत नाही
फुला-पानांमध्ये तुला शोधतं
वेड लागले तुझे मला
तुझ्याच विचारांतच हे माझे मन असतं
तुझे नाव विसरावं वाटत
पण कसे कळतच नाही
सारखा भास होतो तुझा
दूर जाऊनसुद्धा
तू आजही परवा एवढीच जवळ वाटतेस
आता मी थकलो आहे
त्यात तुझ्या आठवणींत हरवलो आहे
तू पुन्हा येशील ठाऊक नाही
आलीस तरी पुन्हा माझी होशील ठाऊक नाही ....
मी जेवढे तुला आठवतो
तेवढेच प्रेम तू देशील ठाऊक नाही ........
तुला तर माझी आठवणही येत नसेल ...........
तुला तर माझी आठवणही येत नसेल ...........
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.१६-०४-२०१४