Friday, June 5, 2015

हे कधी कळलेच नाही | Prem Kavita in Marathi | Poems in MArathi | Read Online

हे कधी कळलेच नाही

१)खोट खोट नापास होईन म्हणत
खर नापास झालो
हे कधी कळलेच नाही

2)खोट खोट झोपेच सोंग करताना
खरी झोप लागली
हे कधी कळलेच नाही

३)खोटा आनंद दाखवताना
खरा आनंद विसरून गेलो
हे कधी कळलेच नाही

४)खोट खोट हसताना
खर हसणं विसरलो
हे कधी कळालेच नाही

५)खोट खोट रडण्याच नाटक करताना
खरे अश्रू कधी आले
हे कळलेच नाही

६)खोट खोट प्रेम आहे म्हणताना
खर प्रेमात पडलो
हे कधी कळलेच नाही

७)खोटी आठवण काढताना
खरेच डोळे पाणावले
हे कधी कळलेच नाही

८)तुझ्या दुखाचा विचार करताना
माझे दुख हे कधी कळलेच नाही

९)तुझ्या आनंदाचा विचार करताना
माझा आनंद हा कधी कळलाच नाही

१०)माझ्या चुकांचा विचार करताना
तू चुकशील हे कधी कळलेच नाही

११)मरणाची खोटी भीती दाखवत
खरेच स्वताला मारले
हे कधी कळलेच नाही

१२)तुझ-माझ हे नात खर-खर अतूट वाटत असताना
त्याच मृगजळात कधी रुपांतर झाल
हे कळलेच नाही

१३)खोट खोट विसरण्याच नाटक करत
मला खरेच विसरलीस
हे कधी कळलेच नाही

१४)एवढ सार झाल.....
पण तुज मी न विसरलो
अन तू मला विसरलीस

१५)आयुष्याच स्वर्ग करायचं हे स्वप्न
उराशी असताना
नरकाच्या वाटेवर कधी गेलो
हे कळालेच नाही..........
ITS LITTLE EFFORT BY ME…
DEDICATED TO ALL MY LOVED ONES AND MOST LOVED.