Tuesday, June 2, 2015

पोरकी | Virah Kavita in Marathi Font | Sad Virah Kavita in Marathi Language

बांधला असता मीही बाळा
झुला तुला झुलवायला
कड्कन तुटली फांदी
अन् झाले पोरकी झाडाला!

खुप वाटते मनाला माझ्या
यावे फिरूनि तुला भेटायला
तुटलेली फांदी कशी जोडायची-
विचारशील का तुझ्या बाबांना?

आठवत असशिल तुही सदा
निघून आलेल्या तुझ्या आईला...
तुट तुट तुटतंय काळीज माझं
आंघोळ रोजची माझ्या ऊशीला!

असायला हवे बाळा तुला
बाबांचे छञ,कणखर व्हायला
मिळायला हवी होती तुला
माया आईची,जग रीत शिकवायला!

असाच सुटला कलहाचा वारा
सोसाट्यात `तो´ही सापडला
कड्कन तुटली फांदी
अन् झाले पोरकी झाडाला!
.....झाले पोरकी झाडाला!!


*अनिल सा.राऊत*|