Monday, March 30, 2015

नशिबाची खेळी | Marathi Kavita On Bad Fate/DESTINY | Unlucky Marathi Kavita | Sad Nasib/Naseeb Marathi Kavita

अजुन कसं हसावं
खोटं तरी कसं जगावं

मनात काहुर दु:खांचा असे
देवासमोर उभे राहुन
आसवांनी मी ओवाळावं किती

धडपड सारखीच सुखांना एकदा पाहण्याची
आजवर मिळेना कदाचीत भेट घडावी निजलेल्या देहापाशी

अशी नशिबाची खेळी ही
बारी असे कधी तुझी कधी माझी....
-
©प्रशांत डी शिंदे....

दाखउ नाही शकलो कधी | Marathi Adhuri Prem Kahani | Prem Kavita | Uncomplete Without You Marathi Kavita

तिच्यासाठी झुरायचे मन
पण सांगू नाही शकलो कधी
ती असायची बसायची आजुबाजुल
पण बोलू नाही शकलो कधी
ती बोलता बोलता डोळ्यात पहायची
वाचायची माझ्या मनातले भाव
पण लपउ नाही शकलो कधी
कित्येकदा तिने खोल पाहिले असेल
पण नजर चोरु नाही शकलो कधी
तीला संशय होता माझ्यावर
माझे प्रेम असणार तीच्यावर
प्रेम होते खुप प्रेम होते पण
दाखउ नाही शकलो कधी
दाखउ नाही शकलो कधी...
...अंकुश नवघरे
.... (स्वलिखित)
सकाळी ११.२८
दी. २४.०३.२०१५

तुझी जादू | Marathi Prem Kavita | Best Marathi Prem KAvita in Marathi Font

नजरेस पडल्यापासून तू
घडलीय कसली जादू
जिकडे पाहतो तिकडे तू
प्रतिमेत तू प्रतीबिंबात तू

मनात तू ध्यानात तू
अन मंतरलेल्या क्षणांत तू

पानांत तू फुलांत तू
दरवळनाऱ्या सुगंधात तू

नजरेत तू डोळ्यांत तू
अन ओघळणाऱ्या अश्रूंत तू

सुरांत तू तालात तू
अंगांत भिनलेल्या लयात तू

चंद्रात तू चांदण्यांत तू
अन नक्षत्रांच्या नक्षीत तू

सांजेत तू दिवसात तू
अन पहाटेच्या स्वप्नांत तू

सागरात तू अंबरात तू
अन रिमझिमणाऱ्या धारांत तू

नवल म्हणू कि किमया
मनमोहक झाली दुनिया
नवीनावीशी हवीहवीशी
चंदन शीतल छाया .

कवितासंग्रह : मुखदर्पण
कवी: सचिन निकम
पुणे 

मित्रा तुझा सोबत, आसे का घडले रे | Ek Tarfi Sad Prem Kavita | One Side Love Poems in Marathi

मित्रा  तुझा सोबत
आसे का घडले रे
एक तरफी प्रेम तुझे
माझ्यावर का जडले रे

तुला ही माहीत आहे
मी नाही म्हणणार नाही रे
पण मी तुझ्या साठी
त्याचा त्याग करू शकेल का  रे

मित्रा  आसे घडेल  का  रे
तुझ्या प्रेमा मुळे माझा जिवनातुन
आस्तित्व  त्याचे संपेल का रे
माझ्या या मनाचे मार्ग  हे
तुझ्या मनाकडे वळेल का रे

मित्रा तुला माहीत आहे रे
तू  वीचारल्या  नंतर
मी  हो ही म्हणणार रे
पण माझ्या होठात हे
शब्द आडकलेले बाहेर
कवा येणार रे

मित्रा मी तुला होकार ही देईल रे
आवडीने तुला मीठीत ही घेईल रे
पण क्षनभर का  होइना
मी प्रेम तुला त्याचायेवढे
देईल का रे

                                कवी
                           बबलु पिस्के 

कुणी तरी हवा | Heart touching Marathi Prem Kavita | Prem Kavita in Marathi font

वाटतं कि कुणीतरी सोबत हवा
साथीला कुणाचा तरी साथ हवा
किती एकटं काटायचा हा जीवन
कुणीतरी आपलं म्हणणारा हवा

सोबत हसेल कुणी रळेल कुणी
माझ्या भावना समझणारा हवा
शब्द माझे आवाज त्याचा हवा
जीवनाचा गीत गायला साथी हवा

कुणीतरी मला वाचणारा हवा
न सांगता मन माझे समझणारा
मला मनापासून प्रेम करणारा
हृदयात बसेल असा कुणीतरी हवा

शशिकांत शांडीले (S D), नागपूर

मुंबई ची मैत्रीण | Friendship Marathi Poems | Marathi Kavita on Maitri | Best friendship Marathi Poems

माझी हे मुंबई  ची मैत्रीण
मजला फार बोलायली
तिच्या मनातली सार
दुःख आज मला सांगायली

तिच्या वाटेवर सजलेले
फूलाचे रंग मला दाखवायली
तिच्या वाटेवर किती काटे
ती मोज मला म्हणायली

होते सारे काही माझ्या
पाशी आस का ती म्हणायली
माझी हे मुंबई  ची मैत्रीण
मजला फार बोलायली

तो होता सोबत  तेव्हा
सार जग तिचे होते की
आज तो गेला सोडून
म्हणून स्वताला ती  हारली की

मनात तिच्या आग किती
आज मी ते पाहिलो  की
जीवनात तिच्या त्याग
किती मी आज ओळखलो की

माझी हे मुंबई ची मैत्रीण
मजला फार बोलायली
सुख दुखाचे गणित  ती
माझ्या समोर माडायली
                     
                                 कवी
                            बबलु पिस्के 

आरोप-प्रत्यारोप करताना | Marathi Gambhir Kavita on Life | Marathi Poems Related to Life

आरोप प्रत्यारोप करताना,...

समजु शकणार्‍या गोष्टींचे
कधी गैरसमज होऊ नयेत
फालतु अफवांच्या बळीही
आपल्या भावना जाऊ नयेत

प्रत्येक गोष्टीतली सत्यताही
चिकित्सकपणे जाणली जावी
आरोप-प्रत्यारोप करताना
आपली बुध्दी ना हिनली जावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.

Tuesday, March 24, 2015

आठवणीत तुझ्या | Marathi Kavita on Athavani | Miss You So Much Marathi Kavita

पहिल्या नजरेतच हृदय जिंकणारी तू,
पाहून नेहमी न पाहिल्यासारखं करणारी तू,
न दिसल्यावर फक्त मलाच शोधणारी तू,
या वेड्याला प्रपोज करणारी तू,
पहिल्या भेटीतच बिन्धास्त बोलणारी तू,
लहान-सहान गोष्टीत काळजी करणारी तू,
भांडणात प्रत्येकवेळी सांभाळणारी तू,
थोडा आवाज चढवल्यावर मुळूमुळू रडणारी तू,
माझ्या प्रत्येक पावलावर पाऊल ठेवण्याचं स्वप्न पाहणारी तू,
प्रेमातला खरा गोडवा समजवणारी तू,

आज कुठेच दिसत नाहीयेस..
आज कुठेच दिसत नाहीयेस..

आता तरी मला बोल | Waiting for Love Marathi Kavita | Waiting For You Marathi Kavita

आज एक वर्ष सरले की
तुझे शब्द ऐकूनी ग....
आज मन ही माझे
वेडे झाले की ग....

तू काही ही ना बोलता
मला सोडुन गेलीस....
ना तू मला हाक दिलीस....
ना माझे काही ऐकलीस....

आता तरी तू मला
फार सतवायलीस....
आठवड्यातून मला
एकदाच का दिसायलीस....

तूच सांग आता मला
तू आस का करालीस....
माझ्या या मनास
तू का जाळालीस....

आता तरी तू बोल
होठातले शब्द खोल....
तेव्हा कळेल तुला
प्रेम माझा मनात
फार आबोल....
आता तरी मला बोल....
आता तरी मला बोल....

                                  कवी
                             बबलु पिस्के 

तुझ्याविना कुणीच नाही | Marathi Kavita For Her | Only For You Marathi Poem | You are my Everything Marathi Kavita

तुझ्यापुढे काहीच नाही,
तुझ्याविना कुणीच नाही !

एकट्या जगात माझ्या,
माझेच आता अस्तित्व नाही !

बस ध्यास तुझा या जीवा,
करमत सुद्धा मुळीच नाही !

आसुसले हे मन अनं पाणावले डोळे,
प्रेम तुझे मिळवण्या कोणता मार्गच नाही !

पण होकार तुझा कानी पडल्या विना,
आता माघार नाही !

कारण , :(
  खरंच तुझ्यापुढे काहीच नाही,
तुझ्याविना कुणीच नाही !!

-Bêing Abhishêk
~ स्वलिखित

आयुष्य | Marathi Kavita On Life | MArathi Aayushya Kavita | Poems in Life | Small Marathi Kavita on Life

प्रेम भुकेल्या भावनांची भूक असत
आयुष्यात घडणारी एक चूक असते
प्रेम असत एक वादळ कधीही न रमणार
प्रेम असत एक नात पटेल त्याच्याशी जमणार
प्रेम असत हृदयात हळुवारपणे जपलेल
प्रेम असत पापण्या आडच्या पाण्यातही लपलेलं
प्रेम असत अबोल शब्दांशिवाय बोलणार
प्रेम असत गोड गुपित नात हळू सांगणार
हव तस  खुशाल जगावं आयुष्य असत प्रत्येकाच

By - PRIYA

विरह यातना | Virah Kavita in Marathi | Hurt Marathi Poems | Sad Broken Heart Kavita in Marathi Font

नाही विसरू शकणार कधी
तुला अन तुझ्या आठवणींना
नाही मिटवू शकणार कधी
हृदयात जपलेल्या साठवणींना
हरवलीय तुजवीन जगण्याची चेतना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।ध्रु.।।

न सांगता सोडून गेलीस
अशी अचानक पाठ फिरवलीस
जीव माझा ठेऊन ओलीस
काय मिळाले तुज सांगना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।१.।।

नाही पाठवलीस चिठ्ठी, ना धाडलास निरोप
विसरलीय तहान भूक गमावलीय झोप
नाही पाठवलीस ई-मेल, नाही केलास फोन
तुजवीन सावरे मज दुसरे कोण
सखे, कशा पोहचवू माझ्या भावना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।२.।।

काय चूक झाली माझ्या हातून
सुकलाय कंठ बसलाय दाटून
दिलीस अश्रुंची माळ, गेलय काळीज फाटून
प्रिये कशी विसरलीस सोबतीच्या सोनेरी क्षणांना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।३.।।

स्पंदनात घुमतेय नाव तुझे
डोळ्यांत दिसती भाव तुझे
श्वासांत दरवळे गंध तुझा
हातांवर मखमली स्पर्श तुझा
मिटल्या पापण्यांवर उमटती गुलाबी घटना
कधी भेटशील पुन्हा…
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।४.।।

नाही विसरू शकणार कधी
तुला अन तुझ्या आठवणींना
नाही मिटवू शकणार कधी
हृदयात जपलेल्या साठवणींना
प्राणप्रिये अधुरा आहे मी तुझ्याविना
ये लवकर नि सावर …
असह्य झाल्यात तुझ्या विरहयातना  ।।५.।।
--------------------
कवितासंग्रह: मुक्तस्पंदन
कवी: सचिन निकम 

प्रयत्न तिला सांगायचे | Marathi Prem Kavita For Girl Friend | Marathi Poems For Her | Propose Marathi Kavita

सांगायचे तिला मी कित्येक प्रयत्न केले..
पण ती समोर येता सारेच व्यर्थ गेले..
मग मला ते मुक्याने समजावता ना आले..
तिला भाव माझे ते जाणता ना आले..

मग  सांगण्या तिला मी एक पत्र लिहिले..
त्यात सारे प्रेम जागून रात्र लिहिले..
अक्षरात प्रेम मला रचता ना आले..
तिला कोरे पत्र माझे वाचता ना आले..

मग सांगण्या तिला चित्र मी काढले..
एक तिचे माझे मी चित्र रेखाटले..
पण त्यात प्रेम रंग मला भरता ना आले..
बेरंग त्याचे अर्थ तिला लावता ना आले..

सांगावया तिला कविता मी केली..
स्तुतीमध्ये तिच्या काही लिहिल्या मी ओळी..
तिला मला उपमा त्यात देता ना आली..
तिला माझी कविता ती समजता ना आली..

सांगू तरी कसा आता प्रश्न असा पडला..
कळला भाव जगाला पण तिला तो ना कळला..
मग तिलाच का प्रेम माझे समजता ना आले..
कि मला तिला ते समजावता ना आले..
                                             - प्रसाद पाटील

पण तरीही मन म्हणते | Marathi Heart Touching Poems | Heart Touching Marathi Kavita

कुणाच्या इतक्याही जवळ जाऊ नये की
आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर हृदय कधी
तर असह्य यातना व्हावी……….
               कुणाला इतकाही वेळ देऊ नये कि आपल्या
               क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
               अन एक दिवस आरशासमोर
               आपणास आपलाच चेहरा परका व्हावा………….
कुणाची इतकी पण ओढ नसावी
कि पदोपदी त्याची वाट बघावी
अन त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी……………
                    पण तरीही मन म्हणते नाती अशी जपावी कि
                   त्यात मनाची मनाशी जोड असावी
                   निभवावे असे कि त्याला
                   कशाचीच तोड नसावी......................
                 
                                     - राधा 

विश्वासाचा ताल | Marathi Kavita On Trust | Vishawas Marathi Kavita | Trust Poems In Marathi

ज्याच्यावरती विश्वास ठेवला
त्याच्याहून विश्वास उडू शकतो
विश्वास भरलेल्या मनातही
कधी अविश्वास जडू शकतो

विश्वास कधी ढाल असतो तर
कधी तो मायाजाळ असतो
मात्र अविश्वासी निर्णयातही
विश्वासाचाच ताल असतो

विशाल मस्के

पहिली नजर | Poems In Marathi Font | Read Marathi Prem Kavita Online

कॉलेजच्या कट्ट्यावर  गप्पांच्या गठ्ठ्यावर
दंगला होता मित्रांचा ग्रूप
रमत नव्हते मन माझे
उमगत नव्हते काय करावे
कुणास ठाऊक काय शोधत होते
वाट कुणाची बघत होते.


लेवुनी रूप नवेनवे आले कुठून फुलपाखरू
पहिली नजर नजरेला भिडली
प्रीतस्पंदने अजूनच आवेगली
मनातल्या मनात म्हटले मन
वाह! किती सुंदर रूप, किती सुंदर तन
जीभ मात्र राहिली चूप
हर्षले मन आनंदले खूप.


आधी ना घडले कधी
उचंबळले ना काळीज कधी
पहिल्या पावसाचा पहिलाच थेंब
पहिल्या नजरेतल पहिलच प्रेम.


गंधित झाला स्वैर वारा
रंगीत झाल्या टिमटिम तारा
बरसल्या रिमझिम श्रावणधारा
पहिल्या नजरेचा पहिला इशारा.

कवितासंग्रह : मुक्तस्पंदन
कवी: सचिन निकम 

प्रेम म्हणजे मृगजळ | Marathi Prem Kavita Online | Love Poems In Marathi Font

आठवणीत तुझ्या सखे शब्दच  सारे विरले
अन् आकांताने साद घालती नयने भान सारेच हरपले.....
नुसतेच तू सतत समीप दिसणे अन् भाव मात्र प्रीतीचे
मग हे प्रेम म्हणजे मृगजळ की बंध फक्त भावनांचे.....
शोधले मी खूप तुला पण हाती आले काहीच नसलेले
अन् आता मला कळून चूकले की माझे ह्र्दयच तूझे घरटे शांत विसावलेले.....
इंद्रधनुसम रंगीतसा मनात हट्ट करतेस तू पसरण्याचा
अन् सुमनासम दरवळ तूझा दाही दिशा की खेळ फक्त आभासाचा.....
सायंकाळच्या रंगांसम क्षण पसरवतेस तू मनात रात्रीचे
अन् मध्यान्हीच्या उन्हासम चटके देतेस मात्र खूप दूर असल्याचे.....
हे गहिवरलेले मन की रडणारे ह्र्दय की वाट पाहून थकलेले डोळे की अजून काही की हे खेळ सारे नियतीचे
अन् हे प्रेम म्हणजे मृगजळ की बंध फक्त भावनांचे.....
बंध फक्त भावनांचे..........

मयूर जाधव 

तूच माझा श्वास ही ध्यास ही | Marathi Prem Kavita For GF-GirlFriend | Read Marathi All Poems

तूच तू मनी
तूच अंतरी
माझा श्वास ही
तू ध्यास ही....

तुजीच् का चाहूल ही वेड्या मनी लागते
तुजीच् का ओढ़ ही हृदयी मला भासते...

तूच तू मनी
तूच अंतरी
माझे स्वप्न ही तू
भास् ही...

तुझ्यासवे का मला फिरावेसे वाटते
तुझ्यासवे रे का मला भिजावेसे वाटते...

तूच तू मनी
तूच अंतरी
माझे प्रेम तू
तूच स्पंदनी.....

तुझ्या कुशीत का मला यावेसे वाटते
तुझ्याच का मिठीत रे निजावेसे वाटते...

तूच तू मनी
तूच अंतरी
माझा प्राण तू
तू आस ही.....

तुजीच् वाट का पाहते ही कावरी ही बावरी
ही वाट ही का संपते तुज़ियाच् या वळणावरि...

तूच तू मनी
तूच अंतरी...

Monday, March 16, 2015

शुन्य माझ्या जगात | Marathi Motivational प्रेरणादायी Kavita | Insipirational Marathi Poems

सर्व विचार  गोठुण जातात तेव्हा
 शुन्यात स्वत:ला  हरवून पाहिले मी
सर्वत्र  तर  तूच दिसतेस
मग शुन्यात राहिलो कसा मी

चेहरा आरश्यात पाहतो तेव्हा
आरसा सुद्धा दगा देतो
बंदिस्त मनाचे दार उघडून
तुझाच चेहरा दाखवत असतो


आठवणींचा तुझ्या मला
आज का ईतका उमाळा येतो
तुला न दिलेले ते पहिले पत्र
तास न तास मी वाचून काढतो

सर्व विचार जेव्हा  गोठुण जातात
 तेव्हा शुन्य माझ्या जगात मी
तुलाच विचारु पाहतोय
आणखी  किती प्रतीक्षा पाहु मी

क्षितीज समर्पण

आठवण तिची येता | Marathi Kavita on Love Memories | Athavani Marathi Kavita | Long Marathi Poems

आठवण तिची येता;
मना वेगळीच चाहूल लागते,
नि:शब्दी ओठी;
एक कविता जुळूण येते...

शब्द सारे ओठांतच अडकतात;
समोर जेव्हा ती दिसते,
पाहता तिला वाळवंटी रानी;
नाजुक कळी फुलते...

स्वप्नफुलांची बाग;
मग अशी बहारते,
तिच्या प्रेमळ स्पर्शाने;
फुल न फुल गंधाळते...

गंधाळलेल्या रानी ती ;
फुलपाखरा गत भासते,
देखणे सुःखद रूप तिचे;
माझिया मना भूलवते...

तिच्या डोळ्यांतली नशा;
मला बेहोश करुण जाते,
सगळे काही विसरवूण मला;
ती स्वप्नात नेवूण पोहचवते...

पापण्यांनखाली हलकासा ओलावा जाणवतो;
जेव्हा फसवे स्वप्न हे माझे मोडते,
अन् तिच्या आठवणीने;
मन पुन्हा एकदा गहिवरते....

Saturday, March 14, 2015

तू आत्ता आहेस माझा | Marathi Kavita For Boy Friends | Share Kavita On Facebook Whatsapp Hike

 नकोय मला आत्ता
नुस्ता म्हनुन काय उपयोग
कधि वाटलच नाहि मला
तू  आहेस माझा
म्हनुन्च आत्ता
नाहिएस तु माझा .....

नकोय मला आत्ता
वरुन बोललेल खर नसत रे
माझ मन कधिच जानल नहिस  
म्हनुन्च आत्ता
नाहिएस तु माझा ......

नकोय मला आत्ता
सगळ सान्गितल मह्नुन
बोलुन दाखवलस अस
म्हनुन्च आत्ता
नाहिएस तु माझा.....


नकोय मला आत्ता
कशी राहु सोबत तुझ्या
मनाला मारुन माझ्या
म्हनुन्च आत्ता
नाहिएस तु माझा....

                       
नकोय मला आत्ता
का ओढ जानवते मनाला
सोडून जानार नहिए मी तुला
वेडू आहेस माझा
म्हनुन्च आत्ता
कायमसाठि तु आहेस माझा 

Thursday, March 12, 2015

माणुसकी | Marathi Manuski Kavita | Marathi Kavita on People | Kavita on Humans in Marathi

माणसाने माणसाला ओळखायला हवं
असला जरी गरीब तरी विचारायला हवं
माणुसकीच्या नात्याने मन जपायला हवं
भावनेत वाहून थोडं रडायला हवं
सुखात हसून दुःख पचवायला हवं...

माणसाने माणसाला ओळखायला हवं
दिसण्यापरी सुंदर मन असायला हवं
प्रेमात सार विसरून जगायला हवं
कधी कधी थोडं फार भांडायला हवं
भांडणं सारी विसरून नातं जपायला हवं...

माणसाने माणसाला ओळखायला हवं
चुकत असेल कुणी तर थोडं रागवायला हवं
मदतीला नेहमी धावून जायला हवं
भुकेल्याला अन्न नेहमी मिळायला हवं
प्रगतीच्या वाटेत मागे वळून पहायला हवं
माणसाने माणसाला ओळखायला हवं...

- गणेश म. तायडे
    खामगांव

मी भामटा नाही ग | Marathi Prem Kavita | Love Poems in Marathi Language

मी भामटा  नाही ग
तरीही ही चूक झाली  ग
ही चूक मला न कळली
पण तुला फार रुतली  ग

मी भामटा  नाहि  ग
जर हे  मला  कळाले  आसते ग
तर मन तुझे जळले नसते ग
ही चूक आहे आसे करने
हे मला कळाले नसते ग

मी भामटा नाही ग
चूक चुकून झाली
चुकीला हया  पोटात
ठेव  की ग
मनातला राग काडून
माफ मला करना ग
                               कवी
                          बबलु  पिस्के

Sunday, March 8, 2015

नात हे नात असतं | Marathi Kavita on Relations | Marathi Naati Kavita | Marathi Poems Marathi Font

नात हे नात असतं
एग्रीमेंट वरती होत नसतं
जस आमच तुमचं
तसच इतरांचंही जरा सेमच असतं
तर कधी कधी थोडं  डीफ्रंटही असतं
पण नात  हे नात असतं
एग्रीमेंट वरती मुळीच टिकत नसतं

एकाने ताणल तर दुसऱ्याने सैल सोडायचं असतं
दुसर्याने ताणल  तरी पहिल्याने अलगद पकडायचं असतं
कितीही काही झाला तरी एकत्र जोडून ठेवायचं असतं
त्यासाठी आधी मनातल्या इगोला तोडायचं असतं
कारण नात हे नात असतं
केवळ एग्रीमेंट वर टिकत नसतं

तुटायला आल तरी तुटू द्यायचं नसतं
कोणी जोडायला आला तर त्याला रुसू द्यायचं  नसतं
फुलावरल्या फुलपाखरा सारखं ,
तळहातावरच्या गुलाबी पाकळीगत
दवाबिंदुला जपायचं असतं
कारण ,नात हे नात असतं
नुसतं एग्रीमेंट वर सरत नसतं

आईच्या कुशिमधल इवलूस बाळ असतं
खिल्खिळून हसतं ,रमत असतं ,
तर कधी हट्टाला ही पेटलेलं असतं
खट्याळ कारट्या सारखं जरा कधी तरी लाडावलेलं असतं
त्याला प्रेमाने गोंजारून हृदयाशी कवटाळायचं असतं
कारण ,नात हे नात असतं
एग्रीमेंट करून संपत  नसतं
ते आपल्या हयातीनंतर ही चिरंजीवी असतं …
नात हे नात असतं ….


                                                   Author:
                                                     शुभम शेट्ये ,

तुझी सवय झाली | Prem Kavita For Her | Love Poems in Marathi For GirlFriend/Her

वर्षानुवर्ष असल्यासारखी
मनाशी तुझ्या ओळख झाली
आपल्यासारखे कोणी आहे
याची मनाला चाहुल लागली

मन तुला जाणु  लागले
तुझ्या मनात डोकावुन पाहु लागले
आडाखाळत, थोडं  घाबरतच
दोघांचे डोळे एकमेकांशी बोलु लागले

लांब जरी झालो आपण तरी
मानाने  अजिबात आन्तर नाही दिले
लागेल तेव्हा समजुन घेत
माघे सोडले याने शिकवे-गिले

कधि कुठे कळलेच नाही
अचानक जाणवले, काही उमल्लेच नाही

सुंदर हळुवार आडकवणारी
मला तुझी सवय ही झाली  

ते खरच काय होत गं...?? | Marathi Prem Kavita | Prem Kavita in Marathi

ते खरच काय होत गं...?
तु दिसताच ह्रदय जोरात धडधडायचं,
पाहु वाटायचं पण नजर चुकवायच..
समोर आलीस अचानक की
स्तब्धच ऊभा रहायचो..
अन निघुन जायचीस जेव्हा,
तेव्हा तुझ्या नकळत पहायचो...!!१!!

ते खरचं काय होचयत गं...??
तुला पाहताच मन वेड व्हायच,
बोलु तर खुप वाटायच
पण मनातच घाबरायच..
असायचीस तु बाजुला,
तेव्हा हळुवार जाणवायच..
बोलण,रुसण अन् ते रागावण,
तुझ सर्वच काही आवडायच..!!२!!

ते खरच काय होत गं...??
तुझा सारख पाठलाग करायचो,
तु एकदा हसत पहावीस म्हणुन
देवाकडे हात जोडायचो..
रात्ररभर तुझ्या आठवणीत रडायचो,
हुंदके देऊन तीळ तीळ तुटायचो...!!३!!
.
.
.
ते खरच काय होत गं...??
     ते खरच काय होत गं....???

:- निलेश आळंदे

तूच तू | Marathi Prem Kavita for Her | Love Poems For Her/GirlFriend | Prem Kavita in Marathi Font

माझ्या  मनात  तूच तू
माझ्या ध्यानात तूच तू
पाहतो स्वप्नात तुला
पाहतो हृदयात माझ्या
आठवतायत ते दिवस
एकमेकांकडे पाहून हसताना
कधी राजा , कधी शुभ्या ,
तर कधी  शुभू  म्हणताना …

आठवतायत ते शब्द कानात टिपून घेतो मी
ते तुझे गोजिरे रूप डोळ्यात दिपून घेतो मी
मी नसलो तसा तरीही, तू म्हणतेस मला क्युट शुभू वगैरे
तुझे बोल ते वेडे मधुर असे ऐकत,
स्वतःच माझ्या मनाला भुरळ पाडतो मी …
तुटके फुटके प्रयत्न करीत तुझ्यासवे बोलतो मी
मनी बसतेस माझ्या जव्हा तुझे बोल ऐकतो मी …

रूप तुझे हे असे मोहक  शिम्पाल्यातल्या मोत्यावानी
त्याहुनी  स्वच्छ  तुझे मन सखे लावतेस जीव फुलावानी
शिंपल्यागत  नक्षीदार रूप तुझे
त्यात स्वच्छ मन मोत्यावाणी
जपतेस तू हर एक नाते
जणू जपतेस श्वासच स्वतःचा या काळजामधी …




                                                        Author:
                                                     शुभम शेट्ये ,

तु मिळावीस म्हणून | Marathi Prem Kavita | Love Poems For Her | Marathi Kavita For GirlFriend

शाळेत असल्या पासून ते आजपर्यत
शिकतोय खुप काही
अनेक जाड जाड बुक घातलीत डोळ्याखालून
नजर मात्र तुझ्यावरच असायची कायमची
तुझ्यावर इंम्प्रेशन पडेल म्हणून अनेक डिग्रीचे कागदही जमवलेत
तु भेटशील कुठेतरी म्हणून अनेक ठिकाणं ही धुंडाळली;
पण तु मारायची हूल नेहमीप्रमाणे
आता त्यात तुझा तो दोष तो काय?
माझ्याप्रमाणे अनेक जणही करतात तुझ्यावर प्रेम जीवापाड
आणि त्यामुळेच तु भेटू शकली नाही मला आजपर्यंत
पण म्हणून मी निराश न होता शोधत असतो तु भेटण्याची ठिकाणे
हल्ली तु खूपच फेमस झालीये हे माहीतीये मला म्हणून पेपरातही नजर असते नेहमी
आता तुझ्याशिवाय दुसरा उद्योगच नाही मला
म्हणून लोक प्रेमाने म्हणतात बेरोजगार मला
पण त्यांना कुठे माहीत तु भेटल्यावर माझे सर्वच प्रश्न मिटतील चुटकीसरशी
फक्त तुझ्या वाटेकडे डोळे लागलेत माझे
त्यामुळेच कि काय? हल्ली लग्नाचे वय होऊन ही कुणी विचारतही नाही लग्न
करतोय का म्हणून
वडील मात्र संतापून म्हणतात कधी कधी "अरे भाऊ दे सोडून तो नाद नोकरीचा!
आपल्या लोकाला कसली नोकरी अनं कसलं कायं!"

--राजेश खाकरे

खंत एका गृहिणीची | Marathi Kavita on Girls | Marathi Woman Kavita

खंत एका गृहिणीची......
देवा अजुन थोडेसे आयुष्य दे ,मी जगण्याचे विसरून गेले
चुली फुकण्यात माझे, आयुष्य जळून गेले
रांधन थोडेसे ठेवले आहे, वाढण्याचे बाकी आहे
आज पोटभर जेवायला देवा थोडेसे आयुष्य दे......
मायेच्या पाशातील डाव मी कधी जिंकलेच नाही
आज मलाही फासा टाकू दे, गळाला लागेल का कुणी?
एक श्वास माझ्या राज्यातला मुक्तपणे घेऊदे
देवा एका श्वासासाठी अजुन थोडेसे आयुष्य दे......
- सुवर्णा

प्रेमाचा अर्थ | Marathi Funny Poems | Vinodi Marathi Kavita in Marathi Font | Long Marathi Vinodi Comdedy Poems

प्रेम त्याचे इतके उतू जात होते
तिच्या आठवणीत ऋतु जात होते

प्रेमात इतका तो होता दिवाणा
विसरुन येई रोजच वहाणा

प्रेमाची त्याच्या इतकी होती खोली
तिच्यासाठी त्याने कविता ही केली

तिचे नाव नेहमी असे त्याच्या ओठी
जातायेता तो असे तिच्या पाठी

मिञास बोले प्रेम कसे व्यक्त व्हावे
सल्ला त्यांचा की तु बोलून पहावे  


रस्त्यावर एकदा त्याने तिला थांबवीले
गुलाब धरून  हात समोर लांबवीले

प्रतिक प्रेमाचे हे तु स्विकारावे
उत्तर मज प्रश्नाचे त्वरीतच द्यावे

जवाब याचा तिने गालावरती दिला
रंग गुलाबी प्रेमाचा कानाखाली आला

प्रेमाचा अर्थ आता कळतो आहे
अजुनही तो दुखरा गाल चोळतो आहे 

प्रेम म्हणजे काय | Marathi Prem Kavita | Whats is Love? | Marathi Love Poems

प्रेम म्हणजे काय..???

मनावर आघात,
झाल्याशिवाय.....

ह्रदयाचा घात,
झाल्याशिवाय.....

प्रेमात विश्वासघात,
झाल्याशिवाय.....

प्रेम म्हणजे काय..???

हे पुर्णपणे कधी,
कळत नसतं.....

स्वलिखित -
दिनांक २१/०२/२०१५...
सांयकाळी ०८:४१...
©सुरेश अं सोनावणे.....

बेरंग झालेल्या आयुष्यात | Sad Dukhi Life Marathi Kavita | Marathi Poems On Lonely Alone Sad Life

बेरंग झालेल्या आयुष्यात...!!

बेरंग झालेल्या आयुष्यात,

थोडे रंग भरावे म्हणतो.....

मी माझ्या एकांताला,

थोडे एकटे सोडावे म्हणतो.....

विसरुनी जरासे दुःखाला,

थोडे सुख भोगावे म्हणतो.....

थांबवूनी जाणा-या वेळेला,

थोडे निवांत बसावे म्हणतो.....

हरपून देहभान पुर्णता,

नव्याने आयुष्य जगावे म्हणतो.....


स्वलिखित -
दिनांक २०/०२/२०१५...
सांयकाळी ०८:०६...
©सुरेश अं सोनावणे.....

एक तरफी प्रेम माझे | One Side Prem Kavita | Ek Tarfi Prem Kavita | Love Poems by One Sided | Marathi Prem Kavita for Her\Him

एक तरफी  प्रेम माझे....
आज तरी तुला कळेल का

तुझ्या मनाचे  मार्ग
माझ्या कडे वळेल का
माझा मनात तूच राणी
तुझा मनात मीच का

एक तरफी  प्रेम माझे ....
आज तरी तुला कळेल का

तू कॉलेजला  आसतना
गालातल्या  गालात  हसताना
वेड  मजला  लावताना
तुला ते प्रेम होते कळाले का

एक तरफी  प्रेम माझे ....
आज तरी तुला कळेल का

एकीकडे तू दुसऱ्याशी बोलायची
मजला  तू फारच सतवायची
मी तुज  समोर  आल्यावर
नजरा  तू झुकवायची

एक तरफी  प्रेम माझे....
आज तरी तुला कळेल का

तुला  कोणी  घेवून  फिरताना
तू  त्याच्या वर  हसताना
मी  तुला  मुक्यान  बगताना
ओळखून  घेशील  का तू मला

एक तरफी  प्रेम माझे....
आज तरी तुला कळेल का


                               कवी
                              प्रेम वेडा
                          बबलु  पिस्के 

का गेलीस | Marathi Prem Bhang Kavita | Sad Prem Kavita in Marathi | Breakup Poems in Marathi

अरे असे कसे तू वेडे बावरे ,
सतत विचारी माझेच काय चुकले

कोण विचारू नका मनच ते माझे
कोण विचारू नका मनच ते माझे
सतत विचारात  त्याच्या तिच्या प्रेमाचे जणू ओझे

ती का आली आणि लगेचच गेली
स्वप्नांची माझ्या पाटी झाली कोरी

जायचे होते तर आलीस का
कोमेजलेल्या फुलाला फुलवलेस का

आता तू गेलीस फुलाचा  सुगंध गेला
मध असला तरी भुंगा आटत सतत भुकेला

समझू नकोस कि गळून पडेन
तुझ्या साठी  सर्व काही त्याग करेन

तुझे उपकार कधीच नाही विसरणार
सगळ विसरून तू मात्र गेलीस पण
जरी सोडून गेलीस तरी माणस  ओळखायला  शिकवलीस


जान्हवी

मला ही वाटत Marathi Sad Prem Kavita |Dukhi Prem Kavita | Waiting for Love Poems in Marathi

मला ही वाटत...
एकदा तरी आपण भेटाव...,
तू माझ्यावर प्रेम कराव....
परत मी तुझ्या प्रेमात पड़ाव...

मल ही वाटत ....
एकदा तरी आपण भेटाव...
तुझ्या प्रेमात पुन्हा हराव..
आणि तू जिंकाव ...
हा प्रेमाचा खेळ पुन्हा खेळाव...


मलाही वाटत.....
तुजा हात माझ्या हातात असाव..
ह्या प्रेमाच्या दुनियेत खुप दूर जाव...
आणि तिथे फक्त तू आणि मीच असाव.....

मलाही वाटत ...
तू एकदा तरी माझ्याशी बोलाव..,
झालेल्या चुकानंबद्दल माफ़ कराव....

मलाही वाटत ......
परत मी जगाव...
परत तुझ्यावर मराव...

सवय झाली ग तुझी मला
तुझ्या वाचून नहीं राहवत गं मला
डोळे शोधतात गं अजुन तुला..

मलाही वाटत ...
एकदा तरी आपण भेटाव...
तू माझ्यावर प्रेम कराव....
              - आदित्य आळणे 

काय तुला गरज होती ? Marathi Sad Dukhi Lonely Kavita in Marathi Font | Marathi Poems for Whatsapp Facebook Social sites

काय तुला गरज होती
पुन्हा आयुष्यात येण्याची?
विझलेल्या निखार्‍याला
पुन्हा पुन्हा चेतविण्याची?
पिऊन आसवे मी
शांत पहूडलो होतो
काय तुला गरज होती
एकांती मला भेटण्याची?
काढून टाकिले मी होते
नांव तुझे ह्रदयातून माझ्या
काय तुला गरज होती
माझ्या ह्रदयी थांबण्याची?
बहरली पहाट होती
फूलून चांदण फूलांनी
काय तुला गरज होती
चांदणे फूलवण्याची?
तुझे शब्द माझ्या
ह्रदयात कोरले मी
काय तुला गरज होती
माझे ह्रदय चोरण्याची?
आलीस परतुन माझ्या
जिवनी फिरून प्रितिने
काय तुला गरज होती
मला फिरून भेटण्याची?

श्री. प्रकाश साळवी
18-02-2015.

माझा राजा शिवछत्रपती | Marathi Kavita on Raja Shiv Chatrpati | Shivaji Raje Marathi Kavita

प्रथम...
       नमन , वंदन माझे
       महाराष्ट्राच्या जीजा आई मातेला
       पराक्रमी शुर वीर दीलास तू
       माझ्या भारत मातेच्या भुमिला

 शिवबा आमचा कुलदैवत आहे
 असंख्य मनात अमर आहे
 कालजातल्या देहरुपी अधीष्टानातला
 माझा शिवबा एकच राजा आहे

 माझ्या शिवबा मुलेच आता
 होते सोन्याची ही पहाट
 तो होता जगती म्हणून
 आज जगतो आपन सुखात

माझा राजा शिवछत्रपती
हाती सत्येची ढाल अन
निष्टेची तलवार होती
जिजाआउचे संस्कार उरी
स्वराज्याचा ध्यास
माझा राजा शिवछत्रपती

श्रवण केल कधी शिवचरित्र
शहारे कालजात उभी राहती
माझ्या राजासाठी मग नकलत
अश्रृं ही डोळ्यातुन आठवण काढती

इतिहासात राजे तर
खूपच होउन गेले पण
मनानी अन धनानी श्रीमंत
माझ्या शिवबा सारखा राजा
अजुन या भूवर झालाच नाही
माझ्या राजाची आठवन येत नाही
असा एक ही दिवस सरत नाही

 महाराष्ट्रात राहनारया
 प्रतेक माणसाला
 मराठी भाषा ही आलीच पाहिजे
 नाद केला जर मराठीचा तर
 "बालकडू" त्याला दिलाच पाहिजे

माझ्या मराठी
मातीच्या कुशीत
मराठी माणसाच्या
निधड्या छातीत
झलकत राहिल महाराजांचा इतिहास
फक्त माझ्या शिवबाच्या आठवणीत
फडकत राहिल भगव्याचा इतिहास
     
                      ... कवी...( मनिष सासे )

देवा तू आहेस कि नाही | Marathi Kavita on God | Marathi Serious Kavita | Marathi Poems

देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे
माणूस उपाशी मरतोय पण तुला लाडूचा भोग आहे
माणसाला खायला पोळी नाही पण तुझ्या आंघोळीला दुध आहे
म्हणायला तुझं मंदिर आहे पण मंदिरात तूच न्हाय
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे

माणसाला तू बनवलं मग  हा कुठला न्याय आहे
एका हाती चांदीची थाळ दुसऱ्याच्या माथी कष्ट अपार आहे
मानलं कि कर्म सर्वोपरी पण कर्म कराया कुठाय हात
कुणाला डोळे नाही कुणाला हात नाही कुणाला नाही पाय
सांगणा तूच त्यांच्यासाठी काय-काय केले उपाय
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे

तूच घडविली श्रुष्टी सारी मग दोषीही तूच आहे
कुणाला बंगला कुणाला गाडी कुणाच्या डोक्यावर छतच नाही
माई बाप मुलाला रस्तावर सोडत नाही पण तू हे पाप केलं
करता धरता बनला नाही मग जन्म माणसाला का दिलं
कष्ट तर तोही करतो पण त्याच्या कष्टाला मोल नाही
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे

का  मी तुझी  पूजा करू का तुला मंदिरात विनवू मी
माझे कर्माचे फळ हेच आहे तर का तुला भोग चढवू मी
तुझी मायाहि त्यांच्यावर, तुला देतात सोन्याचे ताज जे
मी करेन मी  जगेन मीच माझं बघून घेईन
पण आता तुझा दरवाजा  ओलांडणार नाही मी
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे

शशिकांत शांडीले (S D), नागपूर 

तुच असशील या जगाची सीमा | Marathi Prem Kavita in Marathi Text Font

विजय कर या जगावर
तोडुन सर्व बंधने आणि सीमा,
ईतीहास घडु दे नवा असा की
'तुच' असशील या जगाची 'सीमा'..!!1!!
(p.t.s)

मिळणारेय खुप यश तुला,
यात काही वाद नाही,,
तोड गं तु सर्व बंधनॆ आणी सीमा,
आडवण्याचा त्यांना हक्क नाही...!!2!!

चाल्लीस जरी सोडुन लांब,
मन हे अभिनंदनी गाणं गात,,
का कळाल नाही गं तुला,
आपल मैत्रीपलाकडच नात...!!3!!

सर्व काही मिळवुन तेव्हा,
परतशीलच ना त घरी,
भेटायचय गं परत तुले,
माझ्या स्वप्नातली परी...!!4!!

खरच विजय कर गं जगावर,
अभिमान वाटॆल आम्हा,,
ईतीहास घडु दे गं नवा असा की,
तुच असशील या जगाची सीमा....!!5!!

निलेश आळंदे