खंत एका गृहिणीची......
देवा अजुन थोडेसे आयुष्य दे ,मी जगण्याचे विसरून गेले
चुली फुकण्यात माझे, आयुष्य जळून गेले
रांधन थोडेसे ठेवले आहे, वाढण्याचे बाकी आहे
आज पोटभर जेवायला देवा थोडेसे आयुष्य दे......
मायेच्या पाशातील डाव मी कधी जिंकलेच नाही
आज मलाही फासा टाकू दे, गळाला लागेल का कुणी?
एक श्वास माझ्या राज्यातला मुक्तपणे घेऊदे
देवा एका श्वासासाठी अजुन थोडेसे आयुष्य दे......
- सुवर्णा

No comments:
Post a Comment