Tuesday, March 24, 2015

पहिली नजर | Poems In Marathi Font | Read Marathi Prem Kavita Online

कॉलेजच्या कट्ट्यावर  गप्पांच्या गठ्ठ्यावर
दंगला होता मित्रांचा ग्रूप
रमत नव्हते मन माझे
उमगत नव्हते काय करावे
कुणास ठाऊक काय शोधत होते
वाट कुणाची बघत होते.


लेवुनी रूप नवेनवे आले कुठून फुलपाखरू
पहिली नजर नजरेला भिडली
प्रीतस्पंदने अजूनच आवेगली
मनातल्या मनात म्हटले मन
वाह! किती सुंदर रूप, किती सुंदर तन
जीभ मात्र राहिली चूप
हर्षले मन आनंदले खूप.


आधी ना घडले कधी
उचंबळले ना काळीज कधी
पहिल्या पावसाचा पहिलाच थेंब
पहिल्या नजरेतल पहिलच प्रेम.


गंधित झाला स्वैर वारा
रंगीत झाल्या टिमटिम तारा
बरसल्या रिमझिम श्रावणधारा
पहिल्या नजरेचा पहिला इशारा.

कवितासंग्रह : मुक्तस्पंदन
कवी: सचिन निकम 

No comments: