Sunday, March 8, 2015

प्रेमाचा अर्थ | Marathi Funny Poems | Vinodi Marathi Kavita in Marathi Font | Long Marathi Vinodi Comdedy Poems

प्रेम त्याचे इतके उतू जात होते
तिच्या आठवणीत ऋतु जात होते

प्रेमात इतका तो होता दिवाणा
विसरुन येई रोजच वहाणा

प्रेमाची त्याच्या इतकी होती खोली
तिच्यासाठी त्याने कविता ही केली

तिचे नाव नेहमी असे त्याच्या ओठी
जातायेता तो असे तिच्या पाठी

मिञास बोले प्रेम कसे व्यक्त व्हावे
सल्ला त्यांचा की तु बोलून पहावे  


रस्त्यावर एकदा त्याने तिला थांबवीले
गुलाब धरून  हात समोर लांबवीले

प्रतिक प्रेमाचे हे तु स्विकारावे
उत्तर मज प्रश्नाचे त्वरीतच द्यावे

जवाब याचा तिने गालावरती दिला
रंग गुलाबी प्रेमाचा कानाखाली आला

प्रेमाचा अर्थ आता कळतो आहे
अजुनही तो दुखरा गाल चोळतो आहे 

No comments: