Monday, March 16, 2015

शुन्य माझ्या जगात | Marathi Motivational प्रेरणादायी Kavita | Insipirational Marathi Poems

सर्व विचार  गोठुण जातात तेव्हा
 शुन्यात स्वत:ला  हरवून पाहिले मी
सर्वत्र  तर  तूच दिसतेस
मग शुन्यात राहिलो कसा मी

चेहरा आरश्यात पाहतो तेव्हा
आरसा सुद्धा दगा देतो
बंदिस्त मनाचे दार उघडून
तुझाच चेहरा दाखवत असतो


आठवणींचा तुझ्या मला
आज का ईतका उमाळा येतो
तुला न दिलेले ते पहिले पत्र
तास न तास मी वाचून काढतो

सर्व विचार जेव्हा  गोठुण जातात
 तेव्हा शुन्य माझ्या जगात मी
तुलाच विचारु पाहतोय
आणखी  किती प्रतीक्षा पाहु मी

क्षितीज समर्पण

No comments: