Monday, March 30, 2015

तुझी जादू | Marathi Prem Kavita | Best Marathi Prem KAvita in Marathi Font

नजरेस पडल्यापासून तू
घडलीय कसली जादू
जिकडे पाहतो तिकडे तू
प्रतिमेत तू प्रतीबिंबात तू

मनात तू ध्यानात तू
अन मंतरलेल्या क्षणांत तू

पानांत तू फुलांत तू
दरवळनाऱ्या सुगंधात तू

नजरेत तू डोळ्यांत तू
अन ओघळणाऱ्या अश्रूंत तू

सुरांत तू तालात तू
अंगांत भिनलेल्या लयात तू

चंद्रात तू चांदण्यांत तू
अन नक्षत्रांच्या नक्षीत तू

सांजेत तू दिवसात तू
अन पहाटेच्या स्वप्नांत तू

सागरात तू अंबरात तू
अन रिमझिमणाऱ्या धारांत तू

नवल म्हणू कि किमया
मनमोहक झाली दुनिया
नवीनावीशी हवीहवीशी
चंदन शीतल छाया .

कवितासंग्रह : मुखदर्पण
कवी: सचिन निकम
पुणे