Sunday, March 8, 2015

तूच तू | Marathi Prem Kavita for Her | Love Poems For Her/GirlFriend | Prem Kavita in Marathi Font

माझ्या  मनात  तूच तू
माझ्या ध्यानात तूच तू
पाहतो स्वप्नात तुला
पाहतो हृदयात माझ्या
आठवतायत ते दिवस
एकमेकांकडे पाहून हसताना
कधी राजा , कधी शुभ्या ,
तर कधी  शुभू  म्हणताना …

आठवतायत ते शब्द कानात टिपून घेतो मी
ते तुझे गोजिरे रूप डोळ्यात दिपून घेतो मी
मी नसलो तसा तरीही, तू म्हणतेस मला क्युट शुभू वगैरे
तुझे बोल ते वेडे मधुर असे ऐकत,
स्वतःच माझ्या मनाला भुरळ पाडतो मी …
तुटके फुटके प्रयत्न करीत तुझ्यासवे बोलतो मी
मनी बसतेस माझ्या जव्हा तुझे बोल ऐकतो मी …

रूप तुझे हे असे मोहक  शिम्पाल्यातल्या मोत्यावानी
त्याहुनी  स्वच्छ  तुझे मन सखे लावतेस जीव फुलावानी
शिंपल्यागत  नक्षीदार रूप तुझे
त्यात स्वच्छ मन मोत्यावाणी
जपतेस तू हर एक नाते
जणू जपतेस श्वासच स्वतःचा या काळजामधी …




                                                        Author:
                                                     शुभम शेट्ये ,

No comments: