Sunday, March 8, 2015

ते खरच काय होत गं...?? | Marathi Prem Kavita | Prem Kavita in Marathi

ते खरच काय होत गं...?
तु दिसताच ह्रदय जोरात धडधडायचं,
पाहु वाटायचं पण नजर चुकवायच..
समोर आलीस अचानक की
स्तब्धच ऊभा रहायचो..
अन निघुन जायचीस जेव्हा,
तेव्हा तुझ्या नकळत पहायचो...!!१!!

ते खरचं काय होचयत गं...??
तुला पाहताच मन वेड व्हायच,
बोलु तर खुप वाटायच
पण मनातच घाबरायच..
असायचीस तु बाजुला,
तेव्हा हळुवार जाणवायच..
बोलण,रुसण अन् ते रागावण,
तुझ सर्वच काही आवडायच..!!२!!

ते खरच काय होत गं...??
तुझा सारख पाठलाग करायचो,
तु एकदा हसत पहावीस म्हणुन
देवाकडे हात जोडायचो..
रात्ररभर तुझ्या आठवणीत रडायचो,
हुंदके देऊन तीळ तीळ तुटायचो...!!३!!
.
.
.
ते खरच काय होत गं...??
     ते खरच काय होत गं....???

:- निलेश आळंदे

No comments: