देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे
माणूस उपाशी मरतोय पण तुला लाडूचा भोग आहे
माणसाला खायला पोळी नाही पण तुझ्या आंघोळीला दुध आहे
म्हणायला तुझं मंदिर आहे पण मंदिरात तूच न्हाय
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे
माणसाला तू बनवलं मग हा कुठला न्याय आहे
एका हाती चांदीची थाळ दुसऱ्याच्या माथी कष्ट अपार आहे
मानलं कि कर्म सर्वोपरी पण कर्म कराया कुठाय हात
कुणाला डोळे नाही कुणाला हात नाही कुणाला नाही पाय
सांगणा तूच त्यांच्यासाठी काय-काय केले उपाय
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे
तूच घडविली श्रुष्टी सारी मग दोषीही तूच आहे
कुणाला बंगला कुणाला गाडी कुणाच्या डोक्यावर छतच नाही
माई बाप मुलाला रस्तावर सोडत नाही पण तू हे पाप केलं
करता धरता बनला नाही मग जन्म माणसाला का दिलं
कष्ट तर तोही करतो पण त्याच्या कष्टाला मोल नाही
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे
का मी तुझी पूजा करू का तुला मंदिरात विनवू मी
माझे कर्माचे फळ हेच आहे तर का तुला भोग चढवू मी
तुझी मायाहि त्यांच्यावर, तुला देतात सोन्याचे ताज जे
मी करेन मी जगेन मीच माझं बघून घेईन
पण आता तुझा दरवाजा ओलांडणार नाही मी
देवा तू आहेस कि नाही हिच तर दुविधा आहे
तुला नको तरी तुला किती सुविधा आहे
शशिकांत शांडीले (S D), नागपूर

No comments:
Post a Comment