Thursday, March 12, 2015

माणुसकी | Marathi Manuski Kavita | Marathi Kavita on People | Kavita on Humans in Marathi

माणसाने माणसाला ओळखायला हवं
असला जरी गरीब तरी विचारायला हवं
माणुसकीच्या नात्याने मन जपायला हवं
भावनेत वाहून थोडं रडायला हवं
सुखात हसून दुःख पचवायला हवं...

माणसाने माणसाला ओळखायला हवं
दिसण्यापरी सुंदर मन असायला हवं
प्रेमात सार विसरून जगायला हवं
कधी कधी थोडं फार भांडायला हवं
भांडणं सारी विसरून नातं जपायला हवं...

माणसाने माणसाला ओळखायला हवं
चुकत असेल कुणी तर थोडं रागवायला हवं
मदतीला नेहमी धावून जायला हवं
भुकेल्याला अन्न नेहमी मिळायला हवं
प्रगतीच्या वाटेत मागे वळून पहायला हवं
माणसाने माणसाला ओळखायला हवं...

- गणेश म. तायडे
    खामगांव

No comments: