Saturday, May 23, 2015

कधी संपेल दुख माझे | Sad Kavita On Life | Poems On Life | Dukhi Kavita On Life Aayusha

काय आहे हे आयुष्यं
का असे जगतो आहे
दुसर्यांनाच मिळावे  सुख
मला दिसावे फक्त दुख हे माझे
दिवस जातात तसे
नैराश्यात बंदिस्त मन माझे


कुणी तरी सांगावे आता
कधी संपेल दुख माझे .......

कुठे चुकलो मी
काय दोष आहे माझा
नशिबाच्या भांडणात कसा हा जन्म माझा
तरी जगतो आहे नव्या स्वप्नांच्या आशेत
कधी तरी यावे सुख ओंजळीतही  माझ्या

जिथे तिथे मिळाली निराशा माथी ह्या
देवाच्या दारात अश्रू वाहतो आहे
कसे दिसत नसावे हे अश्रू माझे तयासी
का ऐकू न यावी हि हाक माझी
तरी देव शोधतो आहे

कसेबसे मिळावे प्रेम क्षणभरांचे  
ते ही नशिबातून हरवते आहे

कोण समजेल दुख माझे
कोण असावे माझे
न सोबती न इथे कोण कुणाचे

कुणी तरी सांगावे आता
कधी संपेल  दुख माझे ....................
-
प्रशांत डी शिंदे....
दि.२३-०४-२०१५