Saturday, May 23, 2015

दिवस निघून गेले ते | Marathi Sad Kavita Blog | Dukhi Virah Prem Kavita in Marathi

दिवस निघून गेले ते
वेडं स्वप्न पाहायचे
एक नजर फक्त
आणि प्रेम व्हायचे

भरूनी  रंग पंखात
फुलपाखरू उडायचे
गंध घेऊनी फुलांचा
पाकळ्यात दडायचे

वेणीच्या फुलांनमध्ये
फुल होऊन रहायचे
दिवस निघून गेले ते
वेड स्वप्न पहायचे

विखुरलेल्या शब्दांना
एका सुरात बांधणे
दिवसाही पडायचे
आभाळात चांदणे

चांदण्यांच्या चंद्रमौळी
प्रकाशात न्हायचे
 दिवस निघून गेले ते
वेड स्वप्न पहायचे

ओठांवर शीळ घेऊन
नुसतेच चालायचे
तोंड न उघडता
डोळ्यांनी बोलायचे

भावनांच्या वाहत्या
प्रवाहात वहायचे
 दिवस निघून गेले ते
वेड स्वप्न पहायचे