Saturday, May 23, 2015

मी फक्त जीव लावला | Prem Kavita For Whatsapp Facebook Share | Prem Kavita in Marthi Font

माझं मलाच नाही कळलं,
प्रेम तुझ्यावर कधी झालं..
मी फक्त जीव लावला,
हृदय केव्हाच तुझं झालं..!!

आधी तुला मैत्रीण मानायचो,
रात्रं दिवस गप्पा मारायचो..
तुझ्या विणा एक एक क्षण,
तुझे msg वाचुन काटायचो..!!

माझ्या प्रत्येक कवितेत मी,
फक्त नि फक्त तुलाच शोधायचो..
तुला समोर पाहून मी,
एकटा गालातच हसायचो..!!

खुप प्रयत्न करुन आज,
तुला प्रपोज करायचं ठरवलं..
पण तुला समोर पाहताच,
शब्दांनीच शब्दांना फिरवलं..!!

तुच जाणशील माझं प्रेम,
वेड्या मनाची ही आशा होती..
मी कधी प्रेमात पडणारच नाही,
ही नेहमीच तुझी भाषा होती..!!

भिती वाटायची नेहमी मला,
तु मला सोडून जाण्याची..
माझ्या प्रेमाला नाकारुन,
माझी मैत्री पण तोडण्याची..!!

तु जरी माझं प्रेम नाकारलंस,
तरी मी तुझी मैत्री स्विकारेण..
पण आई भवानीची शपथ घेऊन सांगतो,
आयुष्यभर प्रेम मात्र तुझ्यावरच करेण...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार

स्वलिखीत...
(धनराज होवाळ)
पलुस, जि. सांगली