Wednesday, May 27, 2015

काय करावे कळत नाही | Prem Kavita Marathi Blog | Marathi Kavita on Love

काय करावे कळत नाही, कोरी पानं बघवत नाही

भावनांचा बॉम डोक्यामध्ये फुटलाय,
त्यामुळे शब्दांचा धूर खूप साठलाय
मांडायला गेले तर शब्द धडपडतात,
मांडले नाही तर डोळ्यांतून बडबडतात

भांडण तंटा कान ऐकून घेत नाहीत, मस्तकाच्या शिरा नाचणं सोडत नाहीत
काय करावे कळत नाही, कोरी पानं बघवत नाही

सांगायला गेले तर मारायला उठतात,
सांगितले नाही तर टोचून बोलतात
अपशब्द आता सहन होत नाहीत,
जेवणही वेळेवर पोटात जात नाही

काय करावे कळत नाही, कोरी पानं बघवत नाही!!!!!!!!!


शितल ….