Sunday, May 31, 2015

आज खुप एकटे वाटत आहे | Marathi Broken Heart Kavita | Feeling Lonely Alone, Sad Kavita in Marathi

आज खुप एकटे वाटत आहे माहित नाही का?
जेव्हा पासून हे ३रे वर्ष सुरु झाले आहे माझ्या माघे problems हाथ धूउन पडले आहे....
एक संपले तर दुसरे पाठोपाठ ready असतात.
असे वाटते की कुठे तरी दूर जावे पण काही विचार जाऊ देत नाहीत अणि काही थोड़े जन माझे जास्तच टेंशन घेतात .
मी खुप एकटी पडली आहे कोणाला  सांगू पण शकत नाही अणि मी हे मानत पण ठेऊ शकत नाही करण ते खुप जास्त झाले आहे काय करू कळत नाही . clg चे  prob ,घरचे prob ,स्वताला होणारा  श्वास घेण्याचा त्रास खूप जास्त झालय सहन होत नाही,
पण तरी आनंदात रहन्याचा आटोकाट प्रयत्न करते कारण कोणाला तरी मला  आनंदात  बघायचे   

Wednesday, May 27, 2015

काय करावे कळत नाही | Prem Kavita Marathi Blog | Marathi Kavita on Love

काय करावे कळत नाही, कोरी पानं बघवत नाही

भावनांचा बॉम डोक्यामध्ये फुटलाय,
त्यामुळे शब्दांचा धूर खूप साठलाय
मांडायला गेले तर शब्द धडपडतात,
मांडले नाही तर डोळ्यांतून बडबडतात

भांडण तंटा कान ऐकून घेत नाहीत, मस्तकाच्या शिरा नाचणं सोडत नाहीत
काय करावे कळत नाही, कोरी पानं बघवत नाही

सांगायला गेले तर मारायला उठतात,
सांगितले नाही तर टोचून बोलतात
अपशब्द आता सहन होत नाहीत,
जेवणही वेळेवर पोटात जात नाही

काय करावे कळत नाही, कोरी पानं बघवत नाही!!!!!!!!!


शितल ….

प्रेमात हरलो | Lost Love Marathi Kavita | Broken Heart Love Poems in Marathi

मीही प्रेमात तुझ्या काही काळ रडलो
आठवणींच्या अश्रूंनी पूर्णपणे भिजलो
तुझविन अधुरी माझी नेहमी कहाणी
कसं काय सांगू तुला व्यथा या मनाची

गेली का दूर माझ्या चूक काय झाली
सांग तरी गुन्हा तुझ्या मना काय चाली
भोगेन शिक्षा जो तू ठरवून तर बघ
माझं जसं प्रेम कुठे मिळवून तर बघ

वचन देतो कधीच तुला दिसणार नाही
तुझ्या वाटेला कधी मी अळनार नाही
विसरू नको तू दिसं गेले सोबतीचे
दिले घेतले जे वचन आपण प्रेमाचे

मीही प्रेमात तुझ्या काही काळ रडलो
आठवणींच्या अश्रूंनी पूर्ण मी भिजलो
काय सांगू आजवरी कसं काय जगलो
आता वाटतं जणू तुझ्या प्रेमात हरलो
प्रेमात हरलो

शशिकांत शांडीले (SD), नागपूर 

तुझ्याचसाठी हे आयुष्यं माझे | Prem Kavita For Her | Read Marathi Kavita in Marathi Font Online

हातांवरच्या  रेषांचे  चित्र पाहतो  आहे
जगण्यातल्या रंगात सुगंधी तुझा रंग शोधतो आहे

डोळ्यांसमोर दिसतात दु:ख माझे
दुखांस ही हरवतो आहे  ..

तुझ्या हसण्याने बहरला ऋतु  हा
तुझ्या स्वप्नांना पाकळ्यांमध्ये तुज सोपवतो आहे....

हसत रहावी  एवढेच आहे  स्वप्नं माझे
तुझ्याचसाठी हे आयुष्यं माझे.....
-
©प्रशांत डी शिंदे....

एकटाच उभा स्तब्ध | Lonely Marathi Sad Poems | Alone Marathi Kavita | Feeling Lonely Kavita

एकटाच उभा स्तब्ध
पक्षी ही फिरकला नाही
सावलीला ही माझ्या
सावलीच उरली नाही

ओसाड झाले जग
खेळ संपला भावला भावलीचा
आधार फक्त राहिला
मला माझ्या सावलीचा

या खुल्या आसमंती
ना कोणी माझ्या सोबती
सोडुन गेले साथी
आता सावलीच माझा सारथी

सुन्न झाले आभाळ
ओसाड पडली जागा
एकटाच उरलो मी
विस्कटला आयुष्याचा धागा

हो तू तरी होशील का | Marathi Propose Kavita | Prem Love Kavita in Marathi | Facebook Whatsapp Share

हो तू तरी होशील का
माझी आज प्रियसी ....!
माझ्या मनात  प्रेमाची
तू लाव आग आज अशी ....!

ओळखून घेणा तू
मजला आज आशि....!
तुझ्या हया प्रेमा वासुन
मन माझे का उपाशी ....!

आज तरी बोल तू
या वेड्या प्रियकराशी ....!
सांग तुझ्या मनात ही
प्रेम आहे फक्त माझ्याशी ....!

आज तरी माझ्या मनाचे
एकांत तू दूर करआशी ....!
बोल माझ्या मनाशी....!
जोडणार नाही मी
तुला एकांताशी....!

              कवी-बबलु 

तुझ्या येण्याने | Best Prem Kavita | Long Marathi Poems in Marathi | Prem Kavita For Girlfriend/Her

मदनगंध वाऱ्यात मिसळला
प्रणयउमंग अंगात उसळला
दाटल्या कंठाला पाझर फुटला
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
नंदादीप उजळले… तुझ्या येण्याने ।। धृ . ।।

स्पंदनतरंग दरवळले
सप्तरंगांत विरघळले
आतुरलेले मन हरवळले
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
शीतल चांदणे अवतरले… तुझ्या येण्याने ।। १. ।।

उजळली कांती कांचनी
लावण्य भरती लोचणी
ऐशा एकांत क्षणी येना जवळ साजनी
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
सप्तसुर नभी विसावले… तुझ्या येण्याने ।। २. ।।

स्वप्न असे की मृगजळ हे
आभास तर नव्हे ना, कैसे मज कळे
मनचातक चिंब न्हाले पहिल्या धुंद सरीने
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
घनामृत बरसले… तुझ्या येण्याने ।। ३. ।।

ती :
मी तुझीच जाहले ज्याक्षणी तुज पाहिले
मिलनाच्या ओढीने मनिमन हरकले
घेना मिठीत सामावून आता सर्व तुज अर्पिले
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
मेंदीच्या पानावर नक्षत्र उमटले… तुझ्या येण्याने ।। ४. ।।

तो :
येणा प्रिये तू अशी जवळी माझ्या राहा
न राहील भान कसले अशी डोळ्यांत पाहा
कसे सांगू किती सौख्य मज लाभले
हळुवार क्षण हे झाले तुझ्या कोमल स्पर्शाने
स्वप्न अंतरीचे साकारले… तुझ्या येण्याने ।। ५. ।।

कवी : सचिन निकम
कवितासंग्रह : मुक्तस्पंदन
पुणे 

Saturday, May 23, 2015

भेटशील ना ग | Missing You Marathi Kavita | Athavani Marathi Poems | Please Come back Marathi Kavita | Miss You Kavita Marathi

काहीच सुचत नाही तेव्हा ,जेव्हा मला येतेतुझी आठवन.
संपर्क हि राहीला नाही,हे असल कसल कुंपन .

पावसाच्या सरींमधे वाटेनाच ग  ओलावा,
चिंब भिजायला नाही वाटत गारवा.

वाटतय पहाव तुला सार्यात ,ठरवुन सुधा दिसेना ग मि तुझ्यात.
आयुष्यात कधितरी भेटेल का मला तुझा सहवास . आता तर जगतोय याच आशेवर , भेटशिलना ग मला कुठल्यातरी वळनावर .
     -शुभंकर

वेड तू हे लावायची | Prem Veda Marathi Kavita | Mad in Love Poens in Marathi

वेड तू हे लावायची.....

वेडा तर मी केव्हाच नव्हतो
वेड तू हे लावायची...
प्रेमाचे हे खेळ तू
माझ्या सोबत खेळायची...

           मनात हया आग होती
           तुला आज मिळन्याची...
           मला भीती वाटत होती
            तुला सोडुन जाण्याची...

तू हासत हासत म्हणायचली
मला घरला जायची...
तू आसे म्हणुन का
मजला फार छळाची...

         तू येणाऱ्या त्या वळणावर
         तू मजला सदा बसवायची...
          मला तू पाहताच का
          मार्ग तुझा वळवायची...

वेडा तर मी केव्हाच नव्हतो
वेड तू हे लावायची...
प्रेमाचे हे खेळ तू
माझ्या सोबत खेळायची...
                         

                           कवी - बबलू 

खरंच कसं असतं ना ? Marathi Alone Kavita | Feeling Lonely Poems in Marathi Font | Alone Feeling Sad Marathi Kavita

खरंच कसं असतं ना ?
लोकं आपला
वापर करुन घेतात अन्
काम झालं
की एखादी खराब झालेल्या वस्तूप्रमाणे
टाकून देतात..
म्हणजे जोपर्यंत आपल्याकडून
त्यांचं काम होत
नाही तोपर्यंत
रोज फोन करायचा, रोज
बोलायचं
अन् एकदा काम झालं की काही
संबंध नसल्यासारखं
वागायचं
जर असंच करायचं तर
नातं जोडून काय
उपयोग..

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)






\

मी फक्त जीव लावला | Prem Kavita For Whatsapp Facebook Share | Prem Kavita in Marthi Font

माझं मलाच नाही कळलं,
प्रेम तुझ्यावर कधी झालं..
मी फक्त जीव लावला,
हृदय केव्हाच तुझं झालं..!!

आधी तुला मैत्रीण मानायचो,
रात्रं दिवस गप्पा मारायचो..
तुझ्या विणा एक एक क्षण,
तुझे msg वाचुन काटायचो..!!

माझ्या प्रत्येक कवितेत मी,
फक्त नि फक्त तुलाच शोधायचो..
तुला समोर पाहून मी,
एकटा गालातच हसायचो..!!

खुप प्रयत्न करुन आज,
तुला प्रपोज करायचं ठरवलं..
पण तुला समोर पाहताच,
शब्दांनीच शब्दांना फिरवलं..!!

तुच जाणशील माझं प्रेम,
वेड्या मनाची ही आशा होती..
मी कधी प्रेमात पडणारच नाही,
ही नेहमीच तुझी भाषा होती..!!

भिती वाटायची नेहमी मला,
तु मला सोडून जाण्याची..
माझ्या प्रेमाला नाकारुन,
माझी मैत्री पण तोडण्याची..!!

तु जरी माझं प्रेम नाकारलंस,
तरी मी तुझी मैत्री स्विकारेण..
पण आई भवानीची शपथ घेऊन सांगतो,
आयुष्यभर प्रेम मात्र तुझ्यावरच करेण...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार

स्वलिखीत...
(धनराज होवाळ)
पलुस, जि. सांगली

कधी संपेल दुख माझे | Sad Kavita On Life | Poems On Life | Dukhi Kavita On Life Aayusha

काय आहे हे आयुष्यं
का असे जगतो आहे
दुसर्यांनाच मिळावे  सुख
मला दिसावे फक्त दुख हे माझे
दिवस जातात तसे
नैराश्यात बंदिस्त मन माझे


कुणी तरी सांगावे आता
कधी संपेल दुख माझे .......

कुठे चुकलो मी
काय दोष आहे माझा
नशिबाच्या भांडणात कसा हा जन्म माझा
तरी जगतो आहे नव्या स्वप्नांच्या आशेत
कधी तरी यावे सुख ओंजळीतही  माझ्या

जिथे तिथे मिळाली निराशा माथी ह्या
देवाच्या दारात अश्रू वाहतो आहे
कसे दिसत नसावे हे अश्रू माझे तयासी
का ऐकू न यावी हि हाक माझी
तरी देव शोधतो आहे

कसेबसे मिळावे प्रेम क्षणभरांचे  
ते ही नशिबातून हरवते आहे

कोण समजेल दुख माझे
कोण असावे माझे
न सोबती न इथे कोण कुणाचे

कुणी तरी सांगावे आता
कधी संपेल  दुख माझे ....................
-
प्रशांत डी शिंदे....
दि.२३-०४-२०१५

एक प्रियकर | Prem Kavita For Her | Marathi Prem Kavita For Girlfriend | Kavita Blog Marathi

तुझ्या देहाकडे बघून नेत्रसुख घेणारे बरेच असतील पण,,
"ओढणी सांभाळ" सांगणारा कदाचित मी एकटाच
असेन ....♥

तुला हसवणारे बरेच असतील पण,,
तुझ्यासाठीच तुझ्यावर चिडणारा कदाचित मी
एकटाच असेन....♥

लगबगीत चालताना तुझ्या स्पर्शाची वाट पाहणारे
बरेच असतील पण,,
"जपून चाल" सांगणारा कदाचित मी एकटाच असेन....♥

हसत -हसवत तुला ताली देणारे बरेच असतील पण,,
तू रडताना,तुझा हात हातात घेवून धीर देणारा
कदाचित मी एकटाच असेन...♥

तुला कळाव म्हणू तुझी काळजी घेणारे बरेच असतील पण,
तुझ्या नकळत तुझ्यावर प्रेम करणारा मी एकटाच
असेन......♥

एक प्रियकर.....M.j....♥



❤आवडली तर नक्की शेयर करा ♥
( कविता जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये )

दिवस निघून गेले ते | Marathi Sad Kavita Blog | Dukhi Virah Prem Kavita in Marathi

दिवस निघून गेले ते
वेडं स्वप्न पाहायचे
एक नजर फक्त
आणि प्रेम व्हायचे

भरूनी  रंग पंखात
फुलपाखरू उडायचे
गंध घेऊनी फुलांचा
पाकळ्यात दडायचे

वेणीच्या फुलांनमध्ये
फुल होऊन रहायचे
दिवस निघून गेले ते
वेड स्वप्न पहायचे

विखुरलेल्या शब्दांना
एका सुरात बांधणे
दिवसाही पडायचे
आभाळात चांदणे

चांदण्यांच्या चंद्रमौळी
प्रकाशात न्हायचे
 दिवस निघून गेले ते
वेड स्वप्न पहायचे

ओठांवर शीळ घेऊन
नुसतेच चालायचे
तोंड न उघडता
डोळ्यांनी बोलायचे

भावनांच्या वाहत्या
प्रवाहात वहायचे
 दिवस निघून गेले ते
वेड स्वप्न पहायचे 

तू भेटलास | Marathi Prem Kavita For Collage Boys and Girls | Marathi Prem Kavita Blog Online

तू भेटलास तेव्हापासून
माझ् तुझ्याशी जुळेना
पण तुझ्यावाचून रमेना
ही ओढ मला बेचैन करी
ही अशी कशी माझ्या मनाची गाठ
तुझ्या मनाशी जुळे
म्हणून मी अखंड विचार करीत बसे
तुझ माझ्या जवळ येण मला न खपे
तुझ। माझ्यावरील विश्वास मला धैर्य देई
आनंद देई , प्रेमाची आस देई
माझ तुझ्याशी जुळे तुझ्यावाचून न रमे
मी तूजी तू माझ। आपला हा गोड संवाद
कुणा त्रास न होवो आपल्या जवळीकीने
आपण दूर झ।लो
तुझ। विरह न सहन होई
आता कळे हे आपल काही नसून
निःस्वार्थ निखळ अस प्रेम होत.