Saturday, April 4, 2015

की ? खरच माझ्यावर प्रेम करतेस | Prem Kavita Online | Love Poems In Marathi | Read Marathi Kavita Online

मनातले अबोल भाव,
हळूच अश्रूंने खोलतेस,
मी जवळ येताच,
गोड गोड लाजतेस.....

कळत नाही अदा तुझी,
का तु असे वागतेस,
कधी दूर असूनही,
जवळपास भासतेस.....

कधी स्वप्नात येऊन,
झोपेत बडबडतेस,
कधी मधाळ हसतेस,
कधी तान्ह्या बाळासारखी रडतेस.....

कधी अचानक रुसतेस,
कधी प्रेमाचे मनवतेस,
कधी खुप खुप ओरडतेस,
कधी sorry बोलतेस.....

कधी i love u म्हणतेस,
कधी i hate u बोलून छळतेस,
कधी जवळ करतेस,
कधी दूर लोटतेस.....

कधी miss-call करुन सतवतेस,
कधी call न उचलतास cut करतेस,
कधी उबदार मिठीत घेतेस,
कधी क्षणोक्षणी तरसवतेस.....

कधी दुराव्याच्या गोष्टी करतेस,
कधी आपलसं करुन टाकतेस,
कधी परख्यागत वागतेस,
कधी मला माझ्या पासून चोरतेस.....

कधी वाट बघतेस,
कधी वाट चुकतेस,
कधी खुप खुप आठवतेस,
कधी विसरुन जातेस.....

खरच कळत नाही मला,
का तु असे करतेस,
मला जानून बुजून छळतेस,
की ? खरच माझ्यावर प्रेम करतेस.....

की ? खरच माझ्यावर प्रेम करतेस.....


स्वलिखित -
दिनांक २९-०९-२०१३...
सकाळी ०८,२९...
© सुरेश सोनावणे.....