Sunday, April 5, 2015

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते | Marathi Prem Kavita For Her | Best Marathi Prem Kavita | Marathi KAvita For Facebook Whatsapp Hike

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
ती समोर असली कि काही सुचेनासे होते
पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळेनासे होते
अन ती निघून गेली कि
उत्तरांची गर्दी मनात दाटून येते

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
चंद्र बघताना ती आठवते
अन तिला बघितले कि चंद्राकडे बघायचे राहून जाते
रात्री जागून चांदण्या मोजताना रात्र संपून जाते
स्वप्नांचीही पहाट होते झोपायचे मात्र राहून जाते

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
अल्लड वारा तिच्या येण्याची खुण देऊन जातो
अन गेला गेला म्हणता पाऊस पुन्हा येऊन जातो
पावसातून चालत राहतो फक्त भिजायचे मात्र राहून जाते ...

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
नास्तिक आहे म्हणता म्हणता तिच्यासाठी आता देवासमोर जातो
मला काहीच नको असे म्हणून तिलाच मागून जातो .....
हात जोडून उभा राहतो फक्त नवस बोलायचे मात्र राहून जाते

का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
मी प्रेमात पडूच शकत नाही असं बोलून
तिच्यात प्रेम शोधत राहतो
ती आल्यावर स्तब्ध होऊन जातो फक्त
मनातले बोलायचे मात्र राहून जाते ....
का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .....
का कुणास ठाऊक हल्ली माझे हे असे होते .