Sunday, April 19, 2015

एकटा मी पडलो आहे | Lonely Marathi KAvita | Marathi Kavita on Alone | Ekta, Feeling Lonelly Marathi KAvita

आज पुनः आपल्या नेहमीच्या ठिकाणी आलो आहे
जरा वेळ तुझ्या आठवणीत स्वतःला विसरायचे आहे

बघ आज गुलमोहर पुनः बहरला आहे
आपल्या प्रेमाच्या आठवणी ही मनात दाटल्या आहेत

ती सायंकाळची वेळ पुनः आली आहे
आणि तुझ्या गप्पा ही रंगल्या आहेत


वार्याची मंद झुळुक देह स्पर्श करते आहे
तुझ्या केसातल्या गजरा ही दरवळतो आहे

पक्ष्यांचि किलबिल ही एक मधुर  संगीत देत आहे
आणि तुझे ते निरागस हसु ही खुलत आहे

सूर्य मावळतीला आला आहे
तुही माझ्या मिठीत हळूच समावत आहेस

तुझ्या बंद डोळ्यात स्वप्न कैद झाली आहेत
घडाळ्यातलि वेळ ही अशीच थांबली आहे

आज पुनः गुलमोहर तर बहरला आहे
पण आज एकटा मी पडलो आहे
एकटा मी पडलो आहे......

मनात फक्त आठवाणीच उरल्या आहेत
कारण आज एकटा मी पडलो आहे
एकटा मी पडलो आहे......

गजेंद्र वळवि