Sunday, April 19, 2015

अजब हे जग | Marathi Motivational Kavita | Kavita On Life in Marathi | Inspirational Motivational Best Marathi Kavita

किती निराळ असते ते बालपण
जिथे वडिलांची शिकवण आणि आई ची माया असते,
भविष्यतल्या अजब असलेल्या जगाची आपल्याला सवय नसते

कधी हळूच दूर होते ती साथ
आपल्याला मात्र ते कळत नसते,
कारण अजब या जगाची आपल्याला सवय नसते

पोटा पाण्यासाठी दूर निघुन यावे लागते
पण मनात मात्र ती वडिलांची साथ आणि आई च्या मायेची उणीव भास्ते

लोकांच्या या गर्दीत कोण मित्र आणि कोण शत्रु हे आपणच समजून घ्यावे लागते
कारण अजब या जगाची आपल्याला सवय नसते

ईथे स्वतःच्या जीवना पेक्षा
दुसर्याच्या जीवनात लोकांचा जास्त लक्ष असतो
कारण दुसर्याच्या झखमेवर मलम लावण्या पेक्षा त्यावर मीठ चोळणे यातच लोकांना जास्त रस असतो

स्वार्थी बनून गेलेल्या या जगात
आपण मात्र मरत असतो
वाटते की वडिलांची साथ
आणि आई ची माया
किती बरी असते
कारण अजब या जगाची आपल्याला सवय नसते