Sunday, April 19, 2015

का दिले आहे मन ? | Prem Kavita | Feelings Marathi Kavita | Kavita on Feelings | Marathi Kavita Blog

तुझ्या आठवणीची एक एक लाट ,
आज तुला भेटावे म्हणुन  सांगत आहे !

का अशी रागावुंन दुर आहेस तू ,
कशी तू अशी ,नाराज होऊ शकतेस तू !

अग मी तुझाच आहे ,
का हेच नेमके विसरतेस तू !

मन का दिले आहे ,
तूच एकदा सांग न मला !

मनात तूच आहेस फक्त ,
हेच जाणवत आहे मला!


मी इकडे तर तू तिकडे ,
का हा दुरावा असे आपल्यात !

तुझ्या हातात घालुन बांगड्या ,
माझ्या नावचे कुंकु कपाळी तुझ्या !

गळ्यात मंगलसूत्र माझ्या नावाचे ,
समोर हवी तू मला आता . !

तरी ही मन का दिले आहे,
सांग ना तूच मला ……….


क्षितीज समर्पण|