Sunday, April 5, 2015

शिक्षा तुलाही अन मलाही | Heart Touchng Break-Up Marathi Poem | Sad Dukhi Emotional Marathi Kavita | Prem Kavita Blog Online

आपणच देऊ चल एकमेकांस शिक्षा..
विसर तू मला, मी तुला आठवणार नाही..

आपण वागू असेही एकदम परक्यासारखे
भेट होता तुझी , मी ओळखही दाखवणार नाही

कधी आलीस अचानक तू माझ्या समोर
तू अनोळखी असेल , मी जराही हसणार नाही

जरी जीवापाड प्रेम केलं मी तुझ्यावर
आजपासून तुला , स्वप्नातही बघणारं नाही

कितीही काळीज जळालं तुझ्या प्रेमासाठी
ती आग तुला , कधीच मी दाखवणार नाही

पण कुठलीही वेदना आली चुकून तुझ्याजवळ
तर तुझ्यासाठी मी , जीव देण्यास डगमगणार नाही .
----------------------------------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि. २८ . ९ . १३