Sunday, April 12, 2015

मला प्रियसि नाही | Marathi Kavita on Love | Prem Kavita For Whatsapp | Marathi Kavita Read Online

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही मला एका
मुलीवर प्रेम का झाले रे
मन हे माझे तिच्यातच
का दडले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही मला तिच्या
रुपाचे वेड का लागले रे
तिला पाहताच मन का
माझे फुलले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही तिचे मला छंद
का लागले रे
मनात माझ्या तिचे गंध
का पसरले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
तरी ही क्षणो क्षणी
तिचे भास का झाले रे
ती समोर आल्यावर
माझे शब्द का रुकले रे

मला प्रियसि नाही...
मला प्रियसि नाही...
खरच मला प्रियसि नाही
तरी ही आसे का घडले रे
तिला पाहताच मन माझे
 वेडे का झाले रे

        (आज तरी माझी कोणी प्रियसि होईल का ?
         आज तरी कोणी माझ्या मनाला सावरील का ?
         आज तरी कोणी मला होकार देईल का ?
         आज तरी एकांत माझे दूर कोणी करील का ? )
           

                     कवी
                बबलु पिस्के