Sunday, April 12, 2015

इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस | Best Prem Kavita in Marathi | Read Marathi Poems Online | Marathi Long Poems

इतकी रागावलीस....
इतकी रागावलीस की बोलणार हि नाहीस
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..
तुला माहित आहे ना
तुला किती miss करतो सर्वात जास्त तर
तुझ्यावरच प्रेम करतो
तुटलेले मन परत जोडणार नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
एक क्षणही तुझ्याशिवाय आता वेळ जात
नाही
तु नसलीस की मन
कशातही रमत नाही
एकदातरी हास ना
की कधीच हसणार नाहीस
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..
तुझ्याशी नाही बोललो
तर अन्न गोड लागत नाही
हरवलेल्या नझरेला
दुसर काही दिसत नाही
ए सांग ना ग आता की काहीच सांगणार
नाहीस
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
कोणी प्रेम नाही दिले
सर्वांनीच झिडकारले
ह्या दुर्दैवी जीवाला फक्त तूच प्रेम दिलेस
कसे फेडू उपकार तुझे
सात जन्मांत जमणार नाही
एकदा का होईना मला
माफ करणार नाहीस..
प्रेमाची किंमत मलाच कळू शकते
माणसांची किंमत
तुलाच मात्र कळते
तु नाही विचारले तर
मला कोणी विचारणार नाही
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..
माझ्या हृदयात तर
फक्त तू आणि तूच आहेस
पण तुझ्या हृदयात मला
छोटीशीही जागा देणार नाहीस
एकदा का होईना मला माफ करणार नाहीस..
♥→→♥←←♥
एक प्रियकर..M.jare