Saturday, June 21, 2014

लिहिण्यापूर्वी | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Motivational Short Poems | Prernadai Kavita

कविता लिहिण्यापूर्वी
मनात विचारांचा कहर होतो
कल्पनेच्या झाडाला
मग शब्दांचा बहर येतो

भावनेच्या सागराला
मनात कसं उधाण येतं
विचारांच्या फेसाळल्या दर्यात
मन कसं वाहून जातं

लाटे परि शब्द ते
सारखे येऊन भेट घेतात
जाता जाता काव्य ओळी
मजला ते देऊन जातात

आजूबाजूची शब्द झाडे
मजसमोर डोलती
सांगती गुज मनाचे
शब्द शब्द बोलती

शब्दफुले पाहून मजला
हसतात ती
मी नाही पाहिलं तर
मजवरती रुसतात ती

मग घ्यावया भेट त्यांची
मी तयाजवळ पोचतो
ती हि होतात खुष माझ्यावरती
आणि मी त्यांना वेचतो
                                              -दि.मा.चांदणे

No comments: