Saturday, June 7, 2014

काय सांगू आई मी तूला | Marathi Poems मराठी कविता | Gambhir Kavita | गंभीर कविता | Poems On Life

काय सांगू आई मी तूला ..

( माझी एक जुनी रचना,  जी मी वही मधे लिहलेली होती आणि ती वही घरातच कुठेतरी हरवलेली पण आज ती वही मला सापडली आणि ती रचना मी लगेचच मोबाईल मधे ऊतरवली ..

मागील काही काळात 'सई ची वही' हा काव्यसंग्रह मी वाचलेला होता, तो काव्यसंग्रह वाचताना मन थोडं हलूनच गेलेलं,  मला या काव्याची कल्पना सुद्धा त्या काव्यसंग्रहावरूनच सुचली, आणि शब्द लगेचच समोर आले.)

यौवनात कधी कधी आपल्या हातून काही चुका होऊन जातात,  त्या काळात आपण अगदी भान हरवून जातो, पण नंतर माञ आपल्याला जाणिव होते व आपल्या हातून खुप मोठी चूक झालेली हि आपल्यालाच असह्य होते व जिवनच संपवण्याचा शुंड मार्ग हा काही तरूणी निवडतात,  खरं तर हा अतिशय मुर्खपणाचा निर्णय असतो,  पण जग आपल्या बाबतीत काय विचार करेल या विचारानेच त्या संपून जातात आणि आत्महत्येला सामोरे जातात सदर कवितेतून मी अश्याच तरूणीची कथा मांडलेली आहे ...

.
काय सांगू आई मी तूला
किती मोठी चूक मी केली
बळी पडून खोट्या विश्वासाच्या
माती आयुष्याची मी केली
.
काय सांगू आई मी तूला
गोड दाखवली त्याने स्वप्ने
दाखवून रित नवी जमान्याची
स्वत:च्या नजरेतच केले नग्ने
.
काय सांगू आई मी तूला
खुप विश्वासाने समोर आला तो
गुंतवून विश्वात त्याच्या मला
जणू माझाच ग झाला तो
.
काय सांगू आई मी तूला
त्याच्यात हरवून गेले ग मी
त्याच्या गोड स्वप्नां मधे
खुपच बहरून गेले ग मी
.
काय सांगू आई मी तूला
त्या बहरलेल्या यौवनात
तोल माझा मला न सावरला
हरवून भान माझे मी
आयुश्याचा संपुर्ण खेळच माझा मी आवरला
.
काय सांगू आई मी तूला
नजरेतून माझ्याच मी ऊतरले
बोलण्या साठी तुझ्या सोबत
आता शब्द माझ्या कडे न ऊरले
.
असे पापी केलेले मी कर्म
कुठल्या तोंडाने सांगू मी तूला
लिहून शेवट च्या चार ओळी
संपवून घेतले मी आज स्वत:ला..
संपवून घेतले मी आज स्वत:ला ..
.
©  चेतन ठाकरे
दि : 26-12-13