Sunday, June 15, 2014

माझ्या स्वप्नाची सुदंर परी | Marathi Short Love Poems | Marathi Small Kavita on Prem

माझ्या स्वप्नाची सुदंर परी,
उतर जीवनी माझ्या कधीतरी...
कुठे उडून चालली दुर तु,
जीव वेडा होई तुझ्यापरी...

आता मज कळेनासे झाले,
छेडू लागलो नवे प्रेम रंग...
मनी नव्याने जाणु लागले,
तुझ्या प्रितीचा ओला गंध...

तुझे गोजिरी रुप पाहून,
मनाची कळी उमलून गेली...
मृग नयनाची तीर तुझी,
अंतरास माझ्या छेडूनी गेली...

कधी खट्याळ हसताना तु,
गालावर सुदंर खळी पडायची....
अन् पडलेल्या त्या खळीमुळे,
तु अजुन जरा शोभून दिसायची...

तुझ्या भुवया मधला चंद्रकोर,
मनास माझ्या खुप आवडायचा...
जणु तो चंद्राचा चकोर पण,
वाटे तुझाच प्रेमवेडा असायचा....

कधी येशील जीवनात माझ्या वेडी....
मी वाट पाहतोय.



 स्वप्नील चटगे
  [31-05-2014]

No comments: