Saturday, June 7, 2014

तू नसतास भेटला तर | Marathi Prem Kavita | Romantic Marathi Kavita | Love You Marathi Poems | Short Marathi Love Poems | Veda Premi

दिवसभर वेड्यासारखी
तुझाच विचार करत बसते
तू नसतास भेटला तर
मी कसे जगले असते

जगण्याच्या साऱ्या दिशांना
अंधाराने कवटाळले होते
प्रकाशाचे किरण काळजात
मला कसे दिसले असते

तू भेटलाच नसता तर
आयुष्य माझे उजळले नसते
माझ्याही नकळत जीवन
माझे कोमेजून गेले असते

या वळणावर भेटलास तू
नियतीचेच असतील संकेत
नाही तर प्रेमाचे क्षितीज
माझ्या मुठीत आलेच नसते
-------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि.१५.५.१४  वेळ : ८.१५ रा .

No comments: