Saturday, June 21, 2014

जाणिव | Marathi Short Poems On Life | Marathi Short Kavita on Life | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता

जाणिव झाली आहे मला हि आता
नाही त्या वाटांवर पुन्हां जायचं,
या मनाला आता तुझ्यामुळे
नाही पुन्हां पुन्हां दुखवायचं.

मनाने घेतलेल्या निर्णयावर
आता सतत ठाम रहायचं,
काटेरी वळणांपासून त्या
स्वत:ला नेहमी दूरच ठेवायचं.

तु दिलेल्या त्या जखमांतूनही
आता नविन काहीतरी शिकायचं,
तुझ्या त्या सर्व आठवणी विसरून
एक नविन आयुष्य उभं करायचं

- संतोषी साळस्कर.

पावले चालत असतात | Motivational Kavita | Marathi प्रेरणादायी कविता | Inspirational Marathi Kavita

दुक्खाला सोसत सोसत ,क्षनभर सुखा करता
पावले चालत असतात.

रुतलेल्या कटयांना काढत, फुलांच्या पथेच्या आशेत
पावले चालत असतात.

दिवस भर परिश्रम करून ,रात्रि च्या आरामा करता
पावले चालत असतात.

उनात फिरून फिरून,सावलीच्या प्रतिक्षेत
पावले चालत असतात.

मी जरी थकलो तरी , लेकराच्या आनंदा करता,
माझे पावले चालत असतात.

 --अजिंक्य देशपांडे(ही कविता माझ्या बाबान  करता )

आयुष्याच्या अल्बममध्ये | Marathi Sad Virah Kavita | Marathi Sad Poems On Life | Marathi Kavita On Life

आयुष्याच्या अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज मात्र शिल्लक नसतात

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर चहाचा घोट घेत
Tom n Jerry पाहिल पाहिजे.

आन्घोळ फ़क्त 10 मिनीटे?
एखाद्या दिवशी 1 तास द्या,
आरश्यासमोर स्वतःला
सुन्दर म्हणता आल पाहिजे.

भसाडा का असेना
आपाल्याच सुरात रमल पाहिजे,
वेडेवाकडे अन्ग हलवत
नाचणसुध्धा जमल पाहिजे.

गीतेच रस्ता योग्यच आहे

पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर पण
Movie सुध्धा enjoy करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या काठावर
उताणे पडले पाहिजे.

सन्ध्याकाळी मन्दिराबरोबरच
बागेत फ़िरल पाहिजे
'फ़ुलपाखरान्च्या' सौन्दर्याला
कधीतरी भुलल पाहिजे.

द्यायला कोनी नसल
म्हणुन काय झाल ?
एक गजरा विकत घ्या
ओन्जळभरुन फ़ुलान्चा नुसता श्वास घ्या .

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला द्या ,
एवढ्या सुन्दर जगण्यासाठी
Thanks नुसत म्हणा ...

लिहिण्यापूर्वी | Motivational Kavita | प्रेरणादायी कविता | Marathi Motivational Short Poems | Prernadai Kavita

कविता लिहिण्यापूर्वी
मनात विचारांचा कहर होतो
कल्पनेच्या झाडाला
मग शब्दांचा बहर येतो

भावनेच्या सागराला
मनात कसं उधाण येतं
विचारांच्या फेसाळल्या दर्यात
मन कसं वाहून जातं

लाटे परि शब्द ते
सारखे येऊन भेट घेतात
जाता जाता काव्य ओळी
मजला ते देऊन जातात

आजूबाजूची शब्द झाडे
मजसमोर डोलती
सांगती गुज मनाचे
शब्द शब्द बोलती

शब्दफुले पाहून मजला
हसतात ती
मी नाही पाहिलं तर
मजवरती रुसतात ती

मग घ्यावया भेट त्यांची
मी तयाजवळ पोचतो
ती हि होतात खुष माझ्यावरती
आणि मी त्यांना वेचतो
                                              -दि.मा.चांदणे

Tuesday, June 17, 2014

एक अधुरी प्रेम कहाणी..Marathi Sad Love Story | Marathi Virah Gosti | Marathi Short Stories | Marathi Prem Stories

(Incomplete Love)
एक अधुरी प्रेम कहाणी..
ते दोघे पहिल्यांदा फेसबुक वर भेटले...
ती:- कसा आहेस..????
तो:- मी मजेत आणि तू..????
ती :- मी पण मजेत..
असंच चाटिंग करता करता तिने
त्याला विचारलं''Do u have any
girlfriend..??"
सगळ्याच मुलांसारख त्याच उत्तर पण तेच
होत...
"NO..
I am not interested in LOve/
relationship... "
ती:- hmmmm,,,
ठीक आहे...
(थोडा वेळ असाच जातो...
कोणीच काही नाही बोलत..
शेवटी तो मुलगाच तिला विचारतो...)
"तुला आहे का कोणी Boyfriend....?? ???"
ती:- बाळा !! माझ लग्न ठरलं आहे..
तो:- What..????????? ??
I'm Shocked...!!!"
sorry मुलीना वय विचारलेल आवडत
नाही पण तुझ लग्न ठरलं आहे...म्हणून विचरतो..
तुझी Age किती आहे..???????..
ती :- hmmm,,, 20..
तो :- मग इतक्या लवकर लग्न..?????????
ती :- अरे मला तो मुलगा पसंत नाहीये...
माझ्या घरचे जबरदस्तीने माझ लग्न
त्याच्यासोबत लावून देत आहेत,,,
तो :- ohhh,,,
तू तुझ्या मम्मी/ पप्पाना संग न
तुला तो मुलगा पसंद नाहीये...
ते ऐकतील तुझ...
ती :- माझ्या पप्पानी एकदा लग्न ठरवलं
आहे,,
आणि आता देव जरी आला तरी ते
स्वताचा शब्द नाही मोडणार..
ते माझ लग्न लाऊनच देतील..
तो :- मी बोलू का तुझ्या घरच्यांशी..????
ती :- ना..
मी कोणत्या मुलासोबत बोलते हे समजल तर
ते माझा जीव घेतील..
तो :- ओ.के . मी नाही बोलत..
माझ्या दीदीला बोलायला सांगू
का तुझ्या पप्पांशी..????? ??
( No reply from her side )
तो :- R u there...????
आहेस न..???
बोल ना..
Plzzz reply...
R u Okay..???????
(No ReplY )
तो :- ओ.के.
मी जातोय..
Bye...
good night..
sweet dreams...
take care...!!
आणि काही मदत लागली तर मला मेसेज कर..
माझा cell no. ८९७६******
___Log Out___
रात्री त्याला तिचा Blank मेसेज येतो...
तो :- who R u..???????
ती :- इतक्यात विसरलास..?????
मी आहे.. शोना..

तो :- hmm,,
sorry,, मी ओळखल नाही..
मगाशी कुठे गायब झालेली...?????? ?
ती :- मला रडायला येत होत...
तो :- पागल,,
रडून काही नाही होत,,
मी आहे ना आता..?????
सो आजपासून रडायचं नाही..
ती :- hmmmm..नाही रडणार..
(पुढे असाच त्यांचा contact वाढत
जातो...
न त्यांच्या मैत्रीच रुपांतर प्रेमात होत...
दोघे एकसाथ जिने मरणे कि कसमे खाते ही...
  )
त्यांचे प्रेम तर वाढत जात..
पण त्या मुलीच लग्न ठरलेल असत..
आणि ते दोघे एकमेक्न्शिवाय
राहू नाही शकत..
रोज त्यांचा Contact चालूच असतो..
असेच दिवस जातात...
आणि त्या मुलीच्या engagement
ची तारीख जवळ येत..
ते दोघे एक प्लान बनवतात..
न त्यानुसार ती मुलगी घर सोडून
त्या मुलासाठी कोल्हापूरला येते..
घर सोडताना ती घरी suicide note
ठेवते..
त्या मुळे तिच्या घरचे तिच्या काळजीत
पडतात,,
पोलीस कम्प्लेनट करतात..
४ दिवस ती मुलगी कोल्हापुरात राहते..
घरच्यांच्या आठवणीने ती मुलगी सतत रडत
असते..
तो मुलगा तिच्या डोळ्यात अश्रू बघू
नाही शकत ..
आणि तो त्या मुलीच्या वडिलांना कोल
करून सगळ सांगून टाकतो..
दुसर्या दिवशी तिचे वडील
कोल्हापूरला येतात..
न स्वताच्या मुलीला घेऊन जातात..
जाताना ते त्या मुलाला बोलतात
कि काहीही झाल
तरी मी माझ्या मुलीच लग्न तुझ्याशीच
लावून देईन..
ह्या गोष्टीला ३/४ महिने होतात..
प्रतेक रिलेशन मध्ये
थोडी misunderstandin g असतेच..
तो दोघांच्या रिलेशन मध्ये पण होती..
त्यावरून त्या दोघांच्यात छोट्याश
गोष्टीवरून थोडा वाद होतो..
न २/३ दिवस त्यांच्यात काहीच contact
नाही होत..
शेवटी तो मुलगा तिच्याशिवाय
नाही राहू शकत..
आणि तो तिला कॉल करतो..
पण ती मुलगी बोलते..
मला तुझ्या सोबत कोणताच रिलेशन
नाही ठेवायचं..
मला विसरून जा..
न तुझी life परत नव्याने सुरुवात कर..
आत मला कोणीही समजावलं
तरी मी माझा निर्णय चेंज
नाही करणार..
तिचे पप्पा पण हेच बोलतात..
सगळ संपत..
Boy --
आज माझ्या प्रियेचे काही SMS
मी वाचले.....
आज माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले,
काही शब्द जाऊन माझ्या हृदयातच टोचले,
काही कठीण यातना झाल्या हृदयास
माझ्या, पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात
साचले, आज माझ्या प्रियेचे काही SMS
मी वाचले.....
प्रेमात तिच्या मी झालो एवढा वेडा,
प्रेमात मला मिळाला एक वेगळाच धडा,
... का माझ्या हृदयाशी शर्यंत्र असे रचले,
पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले,
आज माझ्या प्रियेचे काही SMS
मी वाचले.....
गैरसमज तिच्या मनात एवढे कसे साचले,
का तिने मन माझे नीट नाही वाचले,
स्वप्नांचे घर माझे काही क्षणांत खचले,
पटकन अश्रुंचे थेंब माझ्या डोळ्यात साचले,
आज माझ्या प्रियेचे काही SMS
मी वाचले.....
आज तिने माझ्याशी प्रेमाचे नाते तोडले,
प्रेमाच्या वाटेवर आणून अर्ध्यात सोडले,
तिच्या आठवणींचे काही क्षण
मी आता वेचले, पटकन अश्रुंचे थेंब
माझ्या डोळ्यात साचले, आज
माझ्या प्रियेचे काही SMS मी वाचले.....
आज माझ्या प्रियेचे काही SMS
मी वाचले.....
तो- ओ.के.
जिथे राहशील सुखी राहा..
स्वताची काळजी घे..
आणि पुढे कोणी माझ्यापेक्षा जास्त प्रेम
करणार कोणी भेटलाच तर
लग्न कर..
be happy alwayz ...!!!!
i'll miss u ..
love u forever SHONA ...
:"( :"( :"(
"इथून दूर गेल्यानंतर अनेक वाट
तुझ्या असतील,,
पावलापावलावर आठवणी मात्र माझ्याच
असतील..."

Sunday, June 15, 2014

हे सगळे वेड्या प्रेमातच घडते | Marathi Veda Premi | Short Marathi Kavita | Short Prem Kavita | Small Funny Prem Kavita

आरशा समोर उभे राहून स्वातच स्वाताला हसते
आजु बाजूला त्याला स्वप्नच स्वप्न दिसते
चार चौघात आसून ही मन वेगळेच पाडते
हे सगळे वेड्या प्रेमातच घडते
कल्पनेने ही नुसत्या मन मोहरते
नाव येता तिचे काळीज धडधडटे
फुलपाखरू होऊन मन बेढुंध बगडते
हे सगळे वेड्या प्रेमातच घडते
पावसाच्या थेंबाना झेलावेसे वाटते
इंद्रधनू षयी सप्तरांगासाठी मन तरफडते
आकाशी उडण्यासाठी मन धडपड़ते
हे सगळे वेड्या प्रेमात च घडते
शब्द शब्द तिचा झेलावासा वाटतो
हात तिचा हाती आसावासा वाटतो
दुरून का होईना तिचा चेहरा दिसवासा वाटतो
आपलीच आहे ते मन स्वातच ठरवते
हे सगळे वेड्या प्रेमातच घडते
=========================

सुगंध 

आठवतात ते कॉलेज चे दिवस | Marathi Kavita On College Life | Marathi School Kavita | Poems On College Life

आठवतात ते कॉलेज चे दिवस
पास होण्या साठी करायचो नवस
अठावन ही आली मित्रांची
त्यांच्या सोबत घालविलेल्या त्या क्षणांची

पाहिला तो मी कॉलेज चा कट्टा
त्यावर बसून करायचो आम्ही थट्टा
सर वर्गात शिकवत रहायचे
शिकवलेले सर्व डोक्यावरुण जायचे

वर्गात बसल्यावर गाण लिहायचे
सर गेल्यावर तेच गाने आपण गायायचे
गाताना मात्र सुर तेच ठेवायचे
शब्द मात्र बदलवून गायायचे

कॉलेज च्या शेवटच्या दिवशी मन भरून आले
पाहता पाहता माझ्या डोळ्यात आश्रू आले
कसे ते वर्ष निघून  गेले
आम्हाला कधीच नाही समजले
आम्हाला कधीच नाही समजले.

आपण खरंच इतके एकटे का असतो? | Marathi Short Poems On Life | Marathi Gambhir Kavita | KAvita On Life | Marathi Small Kavita on Life Aayusha

खूप हसताना माणसं हवी असतात सोबतीला
खूप रडावसं वाटताना ती का नकोशी वाटतात मनाला?
हसणं रडणं आयुष्याचाच भाग असताना
आपण असं वेगळ का वागतो?
आपण खरंच इतके एकटे का असतो?

आपल्याला नक्की काय हवं हे माहित असतं प्रत्येकाला
पण ते खरंच योग्य आहे का?, असं का विचारतो दुसऱ्याला?
आपण कसे आहोत हे माहित असताना
दुसऱ्याच्या बोलण्याने मग दु:खी का होतो?
आपण खरंच इतके एकटे का असतो?

आनंदी असताना हि सोबती असतंच ना कोणीतरी
पण लक्ष्यात मात्र राहतो, नैराशेत एकदाच आला असेल कोणी जरी
सहजा सहजी मिळालेल्या प्रेमाची का किंमत नसते कोणाला?
नि आपण नेहमी धावत्याच्याच पाठी का पळत असतो?
आपण खरंच इतके एकटे का असतो?
                           
                                   किरण गोकुळ कुंजीर 

सोडण्यासाठी | Marathi Short Virah Kavita | Marathi Small Sad Poems | Small Virah Marathi Kavita | Sad Kavita

काहीजण आपल्या आयुष्यात
येतातच फक्त परत जाण्यासाठी
आपल्याला आपल्यातुन बाहेर काढण्यासाठी
आपल्या ह्दयाचीचोरी करण्यासाठी

काहीजण येतातच आपल्याला वेडं बनवण्यासाठी
आपल्याला जगण शिकवण्यासाठी
एकटेपणात हसवण्यासाठी
स्वत:चे भान विसरण्यासाठी

काहीजण येतातच आपली किंमत समजावण्यासाठी
काहीजण येतातच आपल्यावर जीव लावण्यासाठी
जवळ येऊन कायमच सोडण्यासाठी
सोडून गेले तरी ह्रदयात कायमच राहण्यासाठी
--
S.SMore

माझ्या स्वप्नाची सुदंर परी | Marathi Short Love Poems | Marathi Small Kavita on Prem

माझ्या स्वप्नाची सुदंर परी,
उतर जीवनी माझ्या कधीतरी...
कुठे उडून चालली दुर तु,
जीव वेडा होई तुझ्यापरी...

आता मज कळेनासे झाले,
छेडू लागलो नवे प्रेम रंग...
मनी नव्याने जाणु लागले,
तुझ्या प्रितीचा ओला गंध...

तुझे गोजिरी रुप पाहून,
मनाची कळी उमलून गेली...
मृग नयनाची तीर तुझी,
अंतरास माझ्या छेडूनी गेली...

कधी खट्याळ हसताना तु,
गालावर सुदंर खळी पडायची....
अन् पडलेल्या त्या खळीमुळे,
तु अजुन जरा शोभून दिसायची...

तुझ्या भुवया मधला चंद्रकोर,
मनास माझ्या खुप आवडायचा...
जणु तो चंद्राचा चकोर पण,
वाटे तुझाच प्रेमवेडा असायचा....

कधी येशील जीवनात माझ्या वेडी....
मी वाट पाहतोय.



 स्वप्नील चटगे
  [31-05-2014]

तुझ्या प्रेमाचा नादचं खुळा ...!! | Marathi Short Love Poems | Short Marathi Kavita | Marathi Short Poems

रस्त्यावर  पाय  की
पायाखाली  रस्ता
शेवटी  सोसायच्या  मला
ऊन्हाच्या   झळा
तुझ्या  प्रेमाचा
नादचं  खुळा ...!!

सुंगधासाठी   फुला  की
वंशासाठी   फळा
शेवटी  सोसायच्या  मला
प्रसवेच्या   कळा
तुझ्या   प्रेमाचा
नादचं   खुळा ...!!

भोपळ्यावर   विळा  की
विळ्यावर   भोपळा
शेवटी   तुझा  फास
माझ्याच   गळा
तुझ्या   प्रेमाचा
नादचं  खुळा ...!!


          । कवि-डी ।
            स्वलिखीत
              दि. 26.  05.2014
              वेळ. रात्री.  09.  50

अजूनही काळजाचा एक ठोका चुकतोच | Marathi Prem Lekh | Marathi Charolya | Marathi Short Love Poems | Marathi Small Prem Kavita

अजूनही काळजाचा एक ठोका चुकतोच .......

अजूनही काळजाचा एक ठोका चुकतोच
जेव्हा तू अचानक समोर दिसतेस ,
मी भानच हरपून  जातो
जेव्हा तू नाजूक हसतेस ,
पडतो विसर मला शब्दांचा
जेव्हा तू टपोरी पद्धत्तीने बोलतेस ,
मी वेगळ्याच दुनियेत जातो
जेव्हा तू मोहक डोळ्यांनी पाहतेस ,
मी माझ्या स्वरात तुझाच सूर शोधतो
जेव्हा तू अबोल होऊन बसतेस ,
पुन्हा मी  तुझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहतो
जेव्हा तू दृष्टीआड होऊन कदीच गेलेली असतेस .

मयुर जाधव
कुडाळ  ( सातारा ).

Sunday, June 8, 2014

कुणी समजून घेत नाही मराठी प्रेम विरह कविता | Marathi Sad Kavita | Marathi Breakup Kavita | Prem Bhang Kavita | Lonely Without You Marathi | Marathi Virah Kavita

कुणी समजून घेत नाही

याची खंत कधीच नव्हती

मीच कुणाशी बोलत नाही

हा आरोप लोकच करतात.

रानफुलातला, प्राजक्तातला फरक त्यांना कळतो,

पाखराताला, फुलपाखरातला फरक त्यांना कळतो,

मग हे का नाही कळत त्यांना की

प्रत्येक माणसाच्या साच्यातही फरक असतो.

हळवे डोळे नेहमी रडवेच नसतात

स्वप्न घेऊन ते ही जगतच असतात,

बंद ओठांची माणसं मूक नसतात खरी

त्यांच्याही मनात वावटळं असतात.

मी तोंड उघडत नाही

दाताखाली जीभ येऊ नये म्हणून,

डोळे वर करून पाहत नाही

प्रकाशाने दिपून जाऊ नये म्हणून.

हसत नाही, कुणी रडू नये म्हणून

रडत नाही, कुणी हसू नये म्हणून

सोबत करत नाही, जाता येत नाही म्हणून

थांबून राहत नाही, थांबता येत नाही म्हणून.

मी तुमच्यातली आहे हे धरून चालू नका,

वाळीत टाका पण टोचून मारू नका

नको करुस इतके, प्रेम माझ्यावर | Marathi Prem Kavita | Romantic Marathi Kavita | Love You Marathi Poems | Short Marathi Love Poems

नको करुस इतके,
प्रेम माझ्यावर.....
प्रेमाची भीती वाटते...!!

नको येऊस जवळ,
माझ्या इतकी.....
दुरावण्याची भीती वाटते...!!

तुझ्या प्रेमावर,
विश्वास आहे माझा.....
पण ???

माझ्या नशिबाचीचं,
मला भीती वाटते....

चेह-यावर चेहरा लावुन जगायचं | Athavan Kavita in Marathi | Miss You Dear Marathi Kavita | Don’t Leave me Marathi Poems | Tuji Aathavan Marathi Kavita

एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं
एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं
एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं
एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं
सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं
आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं
आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं
आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं
मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं...!

चुकूनही कधी समोर नको येउस मराठी प्रेम विरह कविता | Marathi Sad Kavita | Marathi Breakup Kavita | Prem Bhang Kavita | Lonely Without You Marathi | Marathi Virah Kavita

चुकूनही कधी
समोर नको येउस...
नहितर पुन्हा विश्वास
ठेवण्यास
मजबुर होईन मी...
आठवणींचं ओझं एवढं
आहे...
की...
पुन्हा तुझ्या प्रेमात सये...
चुर चुर होईन मी...!!

Saturday, June 7, 2014

का माझ्याच नशिबी वनवास..मराठी प्रेम विरह कविता | Marathi Sad Kavita | Marathi Breakup Kavita | Marathi Virah Kavita

मी नाही कधी केले,
कूठलेही पाप ।
मी नाही कधी कूनाची,
आडवली वाट ।
मी नाही कधी पेरले,
कूणाच्या वाटेवरती काटे ।
मी धरूनी सत्याची कास,
नाही सोडली कधी त्यास ।
का आला रे ,
माझ्या नशिबी वनवास ।
दगड धोंडयांची वाट,
त्यात काटया कूटयाचां प्रवास ।
किती सोसावी कळ,
मी घट्ट धरले मन ।
का माझ्या वाटयाला,
आला रे अधांर ।
मी मागत नव्हते,
सोन्याचा घास ।
फक्त तु द्यावी मजला,
आपूलकिची साथ ।
मी मानुस साधा सूधा,
खेळता येत नाही, मजला सारीपाठ ।

तू नसतास भेटला तर | Marathi Prem Kavita | Romantic Marathi Kavita | Love You Marathi Poems | Short Marathi Love Poems | Veda Premi

दिवसभर वेड्यासारखी
तुझाच विचार करत बसते
तू नसतास भेटला तर
मी कसे जगले असते

जगण्याच्या साऱ्या दिशांना
अंधाराने कवटाळले होते
प्रकाशाचे किरण काळजात
मला कसे दिसले असते

तू भेटलाच नसता तर
आयुष्य माझे उजळले नसते
माझ्याही नकळत जीवन
माझे कोमेजून गेले असते

या वळणावर भेटलास तू
नियतीचेच असतील संकेत
नाही तर प्रेमाचे क्षितीज
माझ्या मुठीत आलेच नसते
-------------------------------
संजय एम निकुंभ , वसई
दि.१५.५.१४  वेळ : ८.१५ रा .

प्रत्येक मैत्री प्रेमात बदलत नाही..| Marathi Kavita on Friendship | मराठी कविता मैत्री | Marathi Best Friend Poems | Marathi Poems On Dosti | Marathi Dosti Kavita | Kavita on College Life

पहीला दिवस कॉलेजचा,
खुप खुप मजा केली,
एकटेपणाची सवय माझी
हळू हळू विरून गेली..

माझ्याच बसमधे,
माझ्याच वर्गात,
जणू आम्ही दोघे,
नव्या मैत्रीच्या शोधात..

मैत्रीसाठी माझा प्रस्ताव,
माझ्या विनंतीला तीचा होकार,
तेव्हा जाणवले आता मैत्रीच्या झाडाला,
नवी पालवी फुटणार..

मैत्री आमची खुप सुंदर,
एकाकीच्या सागरात जिव्हाळ्याच बंदर,
ती म्हणायची राहूया आपण,
असंच सोबती निरंतर…

तीचा माझ्यावर खुप जिव,
हे तिच्या स्वभावातून कळायचं,
माझ्या अपयशाला,माझ्या चुकीला,
तिच्या डोळ्यातून टीप गळायचं..

ती मला सावरायची ,
माझ्या उदासीला दुर लावायची,
आंनदाची ती श्रावणसर ,
माझ्यावर वेळोवेळी कोसळायची..

मैत्री आमची वाढत गेली,
तसं एकतर्फी प्रेम माझ्यात जागं झालं,
पण मैत्रीला काही होणार नाही ना?
असं भितीच वारं माझ्या मनात आलं

अस्वथ व्हायला लागलो,
दिवसे न दिवस विचार करू लागलो,
तिला कसंतरी कळावं म्हणून,
उगाच प्रयत्न करू लागलो…

कॉलेजच्या शेवटच्या दिवशी,
मी तिला माझ्या मनातलं सांगितलं,
खरतरं आमच्या या नितळ मैत्रीला,
मी तेव्हाच दुर लोटलं..

घडणारं घडत राहतं | Marathi Kavita on Life | Life and Relations Marathi Poems | Aayushyavar Marathi Kavita | Short Marathi Poems On Zindagi

घडणारं घडत राहतं
त्यावर कुणी हसतं
तर दुखी मन तेव्हा मात्र रडत राहतं

कुणाचे स्वप्न सत्यात तर कुणाचे
आयुष्यंच   उध्वस्त होतं
आयुष्याच्या खेळात बहुधा
असंच काही  घडत राहतं

कुठे वसलेलं गाव ते
नदीच्या किनारी
वाहत्या पाण्याचा खळखळाट  ही ते
मरणावर एखाद्याच्या चुपचापच निघून   जातं

आंधळी  होते रात्र ही तेव्हा
जीव निघून जातो जेव्हा
दिसू लागतात नजरांना
आपलीच लोक रडतांना
देता ही येत नाही आवाज असण्याचा
कळतं मिळाला मृत्यू तेव्हा

जाळून जातं घर काहींच
विजत नाही अश्रूंनी ती आगही तेव्हा
आली ती लेकरं रस्त्यावर
छत्र मात्र कुठेच नाही
देवाकडे  पाहून मग
विसरून जातो तो माणुसकीही  तेव्हा....

घडणारं घडत राहतं
कुणी हसतं
कुणी रडत राहतं  ............
-
©प्रशांत डी शिंदे ....
दि.२२-०४-२०१४ 

आयुष्यात एक तरी BF(LIFE PARTNER) असावा..Marathi Prem Kavita | Romantic Marathi Kavita | Love You Marathi Poems | Short Marathi Love Poems | Love Feelings

आयुष्यात एक तरी bf असावा...........
Pro करण्या आधी एक चांगला मित्र..............
आणि gf झाल्यावरही एक चांगला bf असणारा..........
एक तरी bf आसावा............

फोनवर तासनतास बोलणारा..........
बोलताना मधेच लाडात येणारा........
तर लाडात येउन किस मागणारा.........
एक तरी bf असावा............



कधी कडाडून भांडणारा..........
पण नंतर तेवढ्याच प्रेमाने sorry म्हणून माफ़ी मागणारा .............
आणि आपल्याला chocolates देऊन मनवनारा
एक तरी bf असावा...........


त्याच्याशी कितीही रागाने बोललो तरी प्रेमाने बोलणारा.........
आपल्या चुकांना साम्भालुन घेणारा..........
वेळीच ओरडणारा ..........
एक तरी bf असावा...........

पण कधी स्वतःच  विनाकारण रागाने फुगणारा...........
आपल्याला त्रास देणारा............
आपल्याला रडवणारा..........
पण आपले अश्रू पुसणारा.............
एक तरी bf असावा.............
 आपल्या जिवाला स्वतःपेक्षा जास्त जपनारा..........
आपल्या जिवनातील स्वतःच स्थान जाणणारा.............
आपल्या दू:खाला दू:ख आणि सुखाला सुख मानणारा.......
एक तरी bf असावा...........


कधी आपल्या सोबत मस्ती करणारा.........
कधी आपले लाड पुरवनारा............
कधी डोळयात कचरा गेला तर प्रेमाने फुंकर मारणारा...........
एक तरी bf असावा...........


आपल्या बर्थडेला सर्वात आधी विश करणारा............
नंतर surprise gift देणारा...........
आपल्याला आनंदी पाहु बघणारा...........
एक तरी bf असावा..............

कधी आपल्या friends सोबत फिरायला येणारा
त्यांचा सोबत मिळून आपली मस्करी करणारा...........
आपले गालगुच्चे घेणारा............
एक तरी bf असावा...........

आई ओरडल्यावर आपली समजूत घालणारा...........
तर कधी hug देऊन मनाला relax करणारा...........
एक तरी bf असावा..........


आपल्या सोबत movie ला येणारा.........
जाताना हातात हात घालणारा...........
आणि मधुनच तोच हात खांद्यावर टाकणारा..........
एक तरी bf असावा..............

पावसाळ्यात पावसाचा आनंद लुटणारा................
दोघानी एकाच छत्रीतून जाण्याचा हट्ट धरणारा............
चालताना मधेच पाणी उडवणारा............
अणि नंतर i love you म्हणणारा.............
एक तरी bf असावा...................

आपला future कस असाव हे imagine करणारा...............
पण आपल्याला खोट स्वप्न न दाखवणारा........
आपल्यावर जिवापाड प्रेम करणारा ............
एक तरी bf असावा ......................

स्वप्नामधेच का रे तू भेटशी?Marathi Prem Kavita | Romantic Marathi Kavita | Love You Marathi Poems | Short Marathi Love Poems

स्वप्नामधेच का रे तू भेटशी?

आयुष्य थांबल्याचा हलकाच भास झाला
तेव्हा सुरु नव्याने माझा प्रवास झाला ….

स्वप्नामधेच का रे तू भेटशी? कळेना!
प्रत्येक रात्र, दिनही माझा उदास झाला ….

माझ्या मनास वेड्या चाहूल लागली अन्
असशील भोवती तू हळुवार भास झाला ….

शोधीत श्वास, गंधित क्षण ते, तुझ्यात होते
पण व्यर्थ का असा रे सारा प्रयास झाला ….

मी जीवना तुझा रे! जेव्हा हिशोब लिहीला
त्याचा उगाच माझ्या जगण्यास त्रास झाला ….

मिलिंद कुंभारे

आठवण येई प्रत्येक क्षणोक्षणाला....प्रिये तुझ्या आठवणीत | Athavan Kavita in Marathi | Miss You Dear Marathi Kavita | Don’t Leave me Marathi Poems | Tuji Aathavan Marathi Kavita

स्वप्न पाहिले मी तुझे,
जे नाही झाले कधी सत्य,
कळलं नाही मला,
प्रेम झालं तुझ्यावर फक्त,
ह्दयात आहेस फक्त तूच,
नाही तुझ्याविना कोणी,
स्वप्नांच्या दुनियेत नेहमीच येतीस
तू,
नाही दाखविले स्वप्न या नयनी,
आपली पहिली भेट एक आठवण बनून
गेली,
तुझे ते पाहणं आणि माझं हरवणं,
कसं एकदाच घडून गेली,
आलीस जीवनात एक
स्वप्नपरी बनून,
जीवन बदलून टाकलीस,
हे वेडं विसर देत ना तुला,
आठवण येई प्रत्येक
क्षणोक्षणाला.
- स्वप्नील चटग

तो कामावर जातो | Marathi Poems मराठी कविता | Gambhir Kavita | गंभीर कविता | Poems On Life | Marathi Kavita On Reality

तो कामावर जातो
तेव्हा तिला वाटते
किती बरे होईल
तो परत नाही आला तर
आणि ते एकच
दिवा स्वप्न पाहत
ती जगते दिवसभर
नऊ ते सहा
वेळ जातो भरभर
सहा वाजतात
दारावर बेल वाजते
तिचे स्वप्न खळकन फुटते
आणि मग ते दुस्वासाचे
तुच्छ कटाक्षाचे
वाकड्या शब्दांचे
तिरसट आवाजाचे
सहजीवन सुरु होते
रात्री निजे पर्यंत
कदाचित स्वप्नांतही ..
.......
कधी कधी तिला वाटते
ती वेडी तर नाही झाली
भिंतीवर डोके आपटत
जगणाऱ्या कैद्यागत
भरसमुद्रात भरकटलेल्या
एकट्या खलाश्यागत
अन हे जगणे म्हणजे
होणारा भास असावा
त्या भयाण एकांतात

विक्रांत प्रभाकर 

हेच सत्य आहे | Marathi Poems मराठी कविता | Gambhir Kavita | गंभीर कविता | Poems On Life | Marathi Kavita On Reality

पैसा सर्वस्व नाही
नातेच सर्व आहे
कोण सांगणार त्यांना
ज्यांना गर्व आहे
देवाने दिले सर्व
एक गोष्ट नाही
मरणानंतर हा देहही
मातीतच जाई
जगा आनंदाने तुम्ही
वेळ थांबत नाही
नंतर पाश्चातापही
सोबत करत नाही
आपल्यामुळे त्रास लोकाना
हा अपराध आहे
नंतर हाती काहीच नसते
हेच सत्य आहे
हेच सत्य आहे...

... अंकुश नवघरे©
दि. 19/04/2014
वेळ. 9:40 pm

काय सांगू आई मी तूला | Marathi Poems मराठी कविता | Gambhir Kavita | गंभीर कविता | Poems On Life

काय सांगू आई मी तूला ..

( माझी एक जुनी रचना,  जी मी वही मधे लिहलेली होती आणि ती वही घरातच कुठेतरी हरवलेली पण आज ती वही मला सापडली आणि ती रचना मी लगेचच मोबाईल मधे ऊतरवली ..

मागील काही काळात 'सई ची वही' हा काव्यसंग्रह मी वाचलेला होता, तो काव्यसंग्रह वाचताना मन थोडं हलूनच गेलेलं,  मला या काव्याची कल्पना सुद्धा त्या काव्यसंग्रहावरूनच सुचली, आणि शब्द लगेचच समोर आले.)

यौवनात कधी कधी आपल्या हातून काही चुका होऊन जातात,  त्या काळात आपण अगदी भान हरवून जातो, पण नंतर माञ आपल्याला जाणिव होते व आपल्या हातून खुप मोठी चूक झालेली हि आपल्यालाच असह्य होते व जिवनच संपवण्याचा शुंड मार्ग हा काही तरूणी निवडतात,  खरं तर हा अतिशय मुर्खपणाचा निर्णय असतो,  पण जग आपल्या बाबतीत काय विचार करेल या विचारानेच त्या संपून जातात आणि आत्महत्येला सामोरे जातात सदर कवितेतून मी अश्याच तरूणीची कथा मांडलेली आहे ...

.
काय सांगू आई मी तूला
किती मोठी चूक मी केली
बळी पडून खोट्या विश्वासाच्या
माती आयुष्याची मी केली
.
काय सांगू आई मी तूला
गोड दाखवली त्याने स्वप्ने
दाखवून रित नवी जमान्याची
स्वत:च्या नजरेतच केले नग्ने
.
काय सांगू आई मी तूला
खुप विश्वासाने समोर आला तो
गुंतवून विश्वात त्याच्या मला
जणू माझाच ग झाला तो
.
काय सांगू आई मी तूला
त्याच्यात हरवून गेले ग मी
त्याच्या गोड स्वप्नां मधे
खुपच बहरून गेले ग मी
.
काय सांगू आई मी तूला
त्या बहरलेल्या यौवनात
तोल माझा मला न सावरला
हरवून भान माझे मी
आयुश्याचा संपुर्ण खेळच माझा मी आवरला
.
काय सांगू आई मी तूला
नजरेतून माझ्याच मी ऊतरले
बोलण्या साठी तुझ्या सोबत
आता शब्द माझ्या कडे न ऊरले
.
असे पापी केलेले मी कर्म
कुठल्या तोंडाने सांगू मी तूला
लिहून शेवट च्या चार ओळी
संपवून घेतले मी आज स्वत:ला..
संपवून घेतले मी आज स्वत:ला ..
.
©  चेतन ठाकरे
दि : 26-12-13

का मरू मी या जगात | Marathi Kavita on Life | Life and Relations Marathi Poems | Aayushyavar Marathi Kavita | Short Marathi Poems On Zindagi

का मरू मी या जगात ,
पापीच आहेत या भागात  ..

का भरू आनंद या जगात ,
दुखाच सावट राहिलंय या भागात ..

का मिळेल स्वर्ग या जगात ,
नर्का पेक्ष्या बत्तर आहेत या भागात ..

का लुटतोयेस या जगात ,
लुटलय तुलाच या भागात ..

@ डोंगरी ( मयुर रणदिवे )

तुझी वाट.....मराठी प्रेम विरह कविता | Marathi Sad Kavita | Marathi Breakup Kavita | Prem Bhang Kavita | Lonely Without You Marathi | Marathi Virah Kavita Waiting for you

तुझी वाट पाहता पाहता..
हळूच मिटले गं डोळे..
विसरली असशील का गं..
तू कालचे सारे..
मीच वेडा आहे..
तुला एवढे बोललो...
कोवळ्या जिवाचं मन समजुन
घेण्याऐवजी काहिपण बोललो...

पाणावलेले डोळे
रात्री घट्ट मिटून घेतले..
स्वप्नात तरी आता तू येशील म्हनून..
तुला अगदी जवळून..
पाहता यावं म्हनून..
डोळ्याला डोळाही
लागेना
एक कुस बदलुन दुसऱ्या कुशीवर विसावलो....

कळतनकळत कधी झोप लागली,
स्वप्नांच्या नगरीत
शेवटी तु आलीच..
हसली दुरुन..
कालं जे झालं गेलं..
ते सारं विसरुन..

काय रे वाट का वाट पाहतोस.. काल तर पाहात
नव्हतास..
किती बोलत होतास...
मि खरं ते सर्व
सांगितले रे
पण तु काहि ऐकल नाही...

माझी परिक्षा घेण्याच्या.. प्रयत्नात
होतास..?
तू दाखवत नसलास..
तरी मला कळते..

तुझी वाट पाहण्याची कला.. मला खुप छ्ळते...
झालं ना काल बोलून तुझं..
आता मला बोलायचयं काही.. उद्या वाट पाहू
नकोस..

माझं येणं शक्य नाही..
तू वाट पाहू लागलास की
पाऊल नकळत तुझ्याकडे वळते..
मन वेडं तुझ्या सभोवती येऊन घुटमळते...

खुप खुप आठवेन रे आपली कर्जत ची भेट
तो खाल्लेला वडापाव अन घेतलेली लस्सी
खरंतर मि यातंच फसली..!

आता सावरायला हवं रे मला
निरोप दे आता..
आज तुला पाहुन घेऊ दे..
रात्र ही अस्ताला जाता जाता..

:- तुषार भारती (TUSH)

आई होऊ की करीअर करू ?Marathi Kavita on Life | Life and Relations Marathi Poems | Aayushyavar Marathi Kavita | Short Marathi Poems On Zindagi

तिझी  आणि   माझी  ती  भेट  मला  आजही  आठवतेय . ती  माझी  प्रेयसी  होती.  मला  जीवापैक्षाही  प्रिय  होती .  ती  म्हणाली , मी  तुझ्याशी  लग्न करण्यासाठी तयार  आहे  पण  मला  मुल  नको  आहे .  कारण  मी  करीअर  करू  का  मुलाचं ? तेच ते  रांधा  वाढा  उष्टी  काढा  असल  मला  नाही  जमणार.  त्यामुळे  मी  फक्त  करीअरच  करणार  आहे.  याबाबत  तुला  पुर्ण  माहिती  असावी  म्हणून  सांगतेय.   याबाबत  तुझ  हो  असेल  तर  आपण  लग्न  करू.  या  प्रश्नावर  तिला  माझ्याकङून  उत्तर  हव  होत.   मी  तर हे ऐकूनच हादरून  गेलो.  आज  एवढी  स्री  शिकली  प्रगती  झाली.  पुरूषांच्या  खांद्याला खांदा  लावून  काम करू  लागली.  पण  जगातील  सर्वांत  सुंदर अस वरदान  जे  फक्त  स्री ला  लाभले आहे.  ते म्हणजे  आई  होणे ,  तेच  तिला  नको  आहे . कारण  मिळणार्‍या  त्या  चार  पैशासाठी . खरचं आम्ही  स्वतःला  खूपच  भाग्यवान  समजतो  की  आमची आई   घरी  होती .  तिचं   प्रेम ,  तिच  हातान भरवन  हे  सगळ  अनुभवल होतं.  आताच्या  आई बाबांना  त्यांच्या  करीअर , काॅम्युटर , मोबाईल  मुळे  मुलांना  बोलण्यासाठी  वेळ च  नाही  बाकीच्या  गोष्टी  तर  सोडाच.
        ही  आजची  पिढी  कुठं  चालली  आहे .  नुकत्याच  मात् दिनाच्या  शुभेच्छा  देऊन  किंवा   कविता  करून  काय  उपयोग आहे.  पैशाच्या  आणि  करीअरच्या  नादी  लागून  स्री  घराबाहेर  पडली . तुमची  सोन्यासारखी ,  हिर्‍यासारखी  मुल  घरात  एकटीच  आहेत. काहीना  तर  ते ही  मुल  नको आहेत .काय  संस्कार  देणार  आहात  तुम्ही  पैसा  कमवून आणि  त्याला  एकट  घरी  ठेवून ?
     कधी  मिळेल  त्याला  त्याची  आई , कधी  मिळेल  त्याला त्याच्या  हक्काचं  प्रेम,  कधी  मिळेल  त्याला त्याच्या  आईच  दूध, ?

          खरचं   जिजाऊ  आज  घरात  पाहिजे  तरच   प्रत्येक  घरात  शिवबा   जन्म  घेईल   नाही  तर  नुसती  भेकड  मेंढर    पैदा   केली  म्हणून  समजा .

सलाम त्या  मातेला .  लाख लाख   शुभेच्छा  त्या   मातेला   जिन  स्वतच  रक्त   आटवून  दुध   पाजलं .



                                       । कवि-डी ।
                                         स्वलिखीत
                                        दि. 11.  05.  2014
                                     वेळ.  दुपारी.  01.  52