Sunday, April 6, 2014

टाईम पास २ Timepass 2 | Matathi Funny Kavita Facebook Share | Marathi Vinodi Facebook Post

टाईम पास २

माधवराव लेले भटाची चाळ सोडुन
पुण्याला राहायला जातात.तिथेच स्थायिक
होतात.प्राजक्ता तिथल्याच एका कॉलेज मध्ये प्रवेश
घेते.पण ती अजून दगडुला विसरलेली नसते.
दगडु बरोबर घालवलेले सोनेरी क्षण तिच्या मनात
आठवण बनुन राहीलेले असतात.ती परत
कोणाच्या प्रेमाचा विचार करू शकत
नाही.त्या दरम्यान वल्लभ
माधवरावांच्या मर्जी विरूध्द स्पृहा शी लग्न करतो.
त्या मुळे माधवराव नाराज होतात.ते वल्लभ
ला घराबाहेर काढतात.वल्लभ व स्पृहा वेगळे
राहायला जातात.त्यामुळे प्राजक्ता ने जर परत काय
चूक केली तर मी आत्महत्या करेन अशी धमकी माधवराव
देतात.३,४ वर्षांचा कालावधी जातो.एक हँडसम,
स्मार्ट मुलगा प्राजक्ताच्या कॉलेज मध्ये
एंट्री करतो.त्याचे नाव असते रॉकी.त्यावेळेस
रॉकी समोर काही मुले एका मुलीची छेड काढत असतात.
ती मुलगी दुसरी कोणी नसुन
प्राजक्ता असते.रॉकी त्या मुलांची धुलाई
करतो.प्राजक्ता रॉकीचे आभार मानायला लागते.पण
रॉकी "ईट्स माय ड्युटी " असं म्हणुन तिथुन निघतो.पुढे
रॉकी प्रा.ची.बर्याच संकटात मदत करतो.त्यामुळे
ती दोघे चांगले मित्र बनतात.एकदा माधवराव
लेलेंच्या गाडी समोर मुलगी आल्याने अपघात होतो.
लोक माधवरावांना मारायला लागतात.पण ऐन
वेळी रॉकी तिथे येऊन त्यांना मदत करून
त्या मुलीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो. त्यामुळे
रॉकीचे इंप्रेशन माधवरावांवर पडते. पुढे रॉ.
प्रा.ला प्रपोज करतो.पण आपली प्राजू रॉकीला नकार
देते.ती म्हणते आपण फक्त चांगले मित्र आहोत व दगडु
बद्दल त्याला सर्व सांगते. मग रॉकी प्राजु ला एक
गिफ्ट देऊन निघुन जातो. ती ते उघडून पाहते तर
त्या मध्ये मोरपंख व तिचा फोटो असतो ती आनंदात
त्याला पळतच जाऊन घट्ट मिठी मारते. व म्हणते.आज
पर्यंत का लपवुन ठेवलेस...
तेव्हा रॉ. म्हणतो मला पहायचं होतं
की मी तुझ्या मनात अजून कितीसा शिल्लक आहे.
प्राजू:-माझे प्रेम टाईम बरोबर पास होणारे नव्हते.
दगडुने सायकल चालवुन नंतर बाईक रेसिंग करुन कसे पैसे
जमा केले व १२ वी मध्ये ८५ टक्के मार्क़स कसे काढले
वगैरे ....वगैरे..
हे सांगताना माधवराव लेले सर्व ऐकत असतात.ते
त्याची माफी मागतात.
पण रॉकी तुमच्या मुली मुळे काहीतरी करु शकलो.
पुढे काय....
दोघांचं लग्न....
व वल्लभ आणि स्पृहा चा स्वीकार....

संपला पिक्चर

1 comment:

Anonymous said...

hahah
funny poem