Sunday, April 6, 2014

मी फक्त तुझाच आहे | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता For Facebook Posts

मी फक्त तुझाच आहे
कारण मी फक्त तुझाच आहे ,
रात्रीचे हे चांदणे तुझ्यासाठी आहे,
हवेतला हा गारवा तुझ्यासाठी आहे,
मला रोज पडणारे एक नवीन स्वप्न
तुझ्यासाठी आहे,
कारण मी फक्त तुझाच आहे ,
माझ्यासाठी तर तू एक स्वप्न आहेस,
पण तरीही मी तुझी मनात एक आठवण
जपली आहे,
माझ्या मनाचा एक कप्पा सदैव
तुझ्यासाठी आहे,
कारण मी फक्त तुझाच आहे ,
तू आठवणीत असलीस तरी मला आठवणीत
जगण्याची इच्छा नाही आहे,
पण इच्छे शिवाय जगण्यास
हि काही अर्थ नाही आहे,
म्हणूनच माझी जगण्याची एक इच्छा तू
आहेस,
कारण मी फक्त तुझाच आहे ,
मनात इच्छा खूप आहेत पण या इच्छेत
असलेली तू सोबत
नाही आहेस,
आणि तू सोबत नाही म्हणून
जगण्यालाही काही अर्थ
नाही आहे,
तू सोबत नसलीस म्हणून काय झाले
तुझी आठवण तर सोबत
आहे,
तुझ्या आठवणीत जगण्यात हि एक वेगळीच
मजा आहे,
कारण मी फक्त तुझाच आहे ...!!!.....

No comments: