Tuesday, April 22, 2014

मी एव्हडा वेडा नव्हतो कधी !! | Marathi Kavita | मराठी कविता | Prem Kavita | प्रेम कविता Facebook Share Poems

एकसारखा तुला पाहत होतो आधी
तुझी प्रत्येक गोष्ट ऐकत होतो आधी
तुझ्या येण्याची वाट पाहत होतो आधी
मी एव्हढा वेडा नव्हतो कधी !!

तुझाच विचार करत होतो आधी
तुझ्या हसण्यात माझा आनंद होता आधी
तुझ्या दुःखात माझ दुःख होत आधी
मी एव्हढा वेडा नव्हतो कधी !!

तुझा आवाज ऐकायला तरसत होतो आधी
तुला मनवायला धावत होतो आधी
तुला हसवायला जोकर बनत होतो आधी
मी एव्हडा वेडा नव्हतो कधी !!

$vidyakalp$

No comments: