Saturday, August 18, 2012

सवय...आहे...

सवय...आहे...
तुझी वाट पहाण्याची,
तू येणार नसतानाही...

सवय... आहे...
तुझ्याशी गप्पा मारण्याची,
तू ऐकत नसतानाही....

सवय... आहे...
तुला पहात बसण्याची,
तू समोर नसतानाही..

सवय...आहे...
रोज रात्री तुझ्या एका sms ची वाट बघण्याची,
तो येणार नसतानाही....

सवय...आहे...
मन मारून झोपण्याची,
झोप येणार नसतानाही...

सवय...आहे...
अशा कित्येक सवयी सोबत घेउन जगण्याची,
तुझ्याशिवाय ...

No comments: