आता असं वाटतं, की मी स्वतःलाच समजून घेऊ शकलो नाही....
मिटलेल्या पापण्यांवरची ओली स्वप्नं,कधी वेचुन घेऊ शकलो नाही....
फुलपाखरामागे वेडावून धावताना,
फुलांचे रंग जाणूच शकलो नाही....
भावनेच्या बंधात गुरफटून जाताना,
नात्यांचे स्पंद जपूच शकलो नाह
मिटलेल्या पापण्यांवरची ओली स्वप्नं,कधी वेचुन घेऊ शकलो नाही....
फुलपाखरामागे वेडावून धावताना,
फुलांचे रंग जाणूच शकलो नाही....
भावनेच्या बंधात गुरफटून जाताना,
नात्यांचे स्पंद जपूच शकलो नाह
ी....
माझ्या श्वासांची किंमत केलीच नाही कधी कुणी,
आणि माझे निश्वास मी कधी रोखूच शकलो नाही....
माझ्या फुटकळ आसवांना डोळ्यांत सजवताना,
वेदनेला माझ्या मी थोपवूच शकलो नाही....
मृत्यूवरही माझ्या, रडणारे आहेत मोजकेच,
चार हक्काचे जिवलग, मी कधी जमवूच शकलोनाही....
खरंच! मी स्वतःला कधी ओळखूच शकलो नाही...

No comments:
Post a Comment